Home » Santa Claus : ख्रिसमसच्या दिवशी लहान मुलांमध्ये गिफ्ट्स वाटणारा सांताक्लॉज नेमका आहे तरी कोण?

Santa Claus : ख्रिसमसच्या दिवशी लहान मुलांमध्ये गिफ्ट्स वाटणारा सांताक्लॉज नेमका आहे तरी कोण?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Santa Claus
Share

अवघ्या काही दिसवात संपूर्ण जगामध्ये ख्रिसमसचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. २५ डिसेंबर रोजी येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला होता. त्यामुळे येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस ‘ख्रिसमस’ म्हणून साजरा करतात. ख्रिश्चन धर्माचे लोक येशू ख्रिस्तांना ईश्वराचा मुलगा मानले जाते. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हा पासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जोसेफ आणि मेरी यांच्या पोटी बेथलेहेम येथे येशूचा जन्म झाला होता. (Santa Claus)

प्रभू येशूंनी संपूर्ण समाजाला प्रेम आणि मानवतेची शिकवण दिली. येशू हे ख्रिस्ति धर्माचे संस्थापक मानले जातात. येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेम शहरात झाला. हे इस्राईल देशातील एक छोटेसे गाव आहे. ह्याच गावात ख्रिस्तांचा अर्थात प्रभू येशू यांचा जन्म झाला. ख्रिसमसचा शब्दश: अर्थ आहे ‘क्राइस्ट्स मास’ अर्थात येशुच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना. ख्रिस्ती लोकांसाठी हा सण आनंदाचा आणि हर्षाचा सण आहे, जशी पौर्णिमा व अमावस्या या तिथी जश्या चंद्रावर अवलंबून असतात. तसा प्रकार ख्रिस्ति कालगणनेत नाही, ख्रिस्ति कालगणेत सूर्याला अधिक महत्व दिले जाते. (Marathi)

ख्रिसमस या सणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘सांताक्लॉज’. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लाडका व्यक्ती म्हणून सांताक्लॉजला ओळखले जाते. खासकरून लहानमुलांसाठी तर सांताक्लॉज त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा, त्यांना भरभरून गिफ्ट्स देणारा, त्यांना फिरवणारा, त्यांचे लाड करणारा व्यक्ती आहे. सांताक्लॉज म्हटले की, लगेच डोळ्यासमोर लाल ड्रेस, जाडजूड, पांढरे केस पांढरी दाढी, मोठे पोट, पाठीवर गिफ्ट्सने भरलेली लाल बॅग, हरणांच्या गाडीवर फिरणारा व्यक्ती अशी प्रतिमा उभी राहते. अतिशय प्रेमळ आणि हसतमुख व्यक्ती म्हणजे सांताक्लॉज. नाताळ सण आणि सांताक्लॉज या पूरक गोष्टी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मात्र हा सांताक्लॉज नक्की आहे तरी कोण?, तो का सर्वांना गिफ्ट्स देतो? जाणून घेऊया याबद्दल. (Marathi News)

लहान मुलांमध्ये तर सांताक्लॉजविषयी विशेष आकर्षण पाहायला मिळते. नाताळच्या रात्री सांताक्लॉज गुपचूप येऊन गिफ्ट अर्थात भेटवस्तू देतो, असे मानले जाते. त्यामुळे नाताळच्या काळात भेटवस्तू देण्यास विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार मुलांचा लाडका सांताक्लॉज फिनलॅन्डच्या लेपलॅन्ड प्रदेशात राहतो. रोवानिमी हे त्याच्या गावाचे नाव. तसे पाहिले तर प्रभू येशूंचा जन्म आणि सांताक्लॉज यांचा कोणताही थेट संबंध नाही. तरीही सांताक्लॉज आणि नाताळ हे अतूट समीकरण जगप्रसिद्ध आहे. (Todays Marathi Headline)

Santa Claus

सांताक्लॉजबद्दल काही कथा प्रसिद्ध आहेत. यातली एक कथा म्हणजे, सांताचे खरं नाव संत निकोलस असं आहे. संत निकोलस यांचा जन्म प्रभू येशूच्या मृत्यूनंतर सुमारे २८० वर्षांनी मायरा इथल्या एका श्रीमंत कुटुंबात झाला. निकोलस लहान असताना त्यांच्या आई-वडिलांचं निधन झाले. त्यांची लहानपणापासून प्रभू येशूवर नितांत श्रद्धा होती. संत निकोलस यांच्याशी संबंधित एक कथा सांगितली जाते. एक गरीब माणूस होता. त्याला तीन मुली होत्या. (Latest Marathi Headline)

या मुलींच्या लग्नासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याच्या मुलींना मजुरी करावी लागत असे. जेव्हा ही गोष्ट निकोलस यांना समजली, तेव्हा ते मध्यरात्री त्या व्यक्तीच्या घरी गेले. दारातून जाण्याऐवजी ते त्याच्या घरात चिमणीच्या पाइपमधून गेले आणि सोन्याने भरलेली पिशवी चिमणीजवळ कोरड्या मोज्यांमध्ये ठेवली. त्यानंतर या व्यक्तीची गरीबी दूर झाली. त्या दिवसापासून, मुलं नाताळच्या रात्री आपले मोजे घराबाहेर टांगून ठेवतात. सांताक्लॉज त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टी देईल, असे मानले जाते. सांताक्लॉज गरजू आणि गरीब मुलांना नाताळच्या दिवशी भेटवस्तू देतो, असे समजले जाते. (Top Stories)

दुसऱ्या एका कथेनुसार, नेदरलँडचे लोक जेव्हा न्यू वर्ल्डच्या वसाहतींमध्ये राहायला गेले तेव्हा त्यांनी सांताच्या कथा सांगण्यास सुरुवात केली. सांता हे सेंट निकोलसचे डच भाषांतर आहे. १७०० पर्यंत, सांताच्या उदारतेच्या कथा अमेरिकेत दूरवर पोहोचल्या आणि तिथल्या पॉप संस्कृतीने त्यांची प्रतिमा बदलली. कालांतराने त्यांच्या मृत्यूनंतर त्याचे नाव सांताक्लॉज म्हणून प्रसिद्ध झाले. (Top Marathi Headline)

दरम्यान सांताक्लॉज राहत आसल्या फिनलॅन्डमध्ये डिसेंबरमध्ये ‘कामोस’ म्हणजे ध्रुवप्रदेशीय रात्रीचा काळ आहे. या दरम्यान सुर्योदय होतच नाही २४ तासांमध्ये फक्त २ तासांसाठी आकाश थोडेसे उजळते आणि पुन्हा रात्रीसारखा अंधार पडतो पण इथे बाराही महिने ख्रिसमसचे वातावरण असते. कारण सांताक्लॉज येथेच रहातो. येथे रेनडियर नावाचे प्राणीही आहेत. हेच प्राणी सांताक्लॉजच्या गाडीचे वाहन आहेत. सांताचे मदतनीस ‘एल्फ’ रोज खेळणी पॅक करायचे काम करत असतात. तापमान शून्याखाली -१० ते -२० डिग्री सेल्सियस असले तरी येथे ख्रिसमसची मजा काही आगळीच असते. या सांताला वर्षभर जगभरातून मुलांची पत्रे येतात. त्यांची संख्या जाते जवळजवळ ७ लाखापर्यंत. तरीही प्रत्येकाला तो उत्तर पाठवतो. ही उत्तरेही ‘एल्फ’ अक्षरात लिहिलेली असतात आणि ‘उत्तर ध्रुव पोस्ट ऑफिसचा’ शिक्काही त्यावर असतो. इथे दरवर्षी ४-५ लाख लोक सांताला भेटायला येतात. (Latest Marathi News)

========

Christmas : येशू ख्रिस्तांचा जन्मदिन असलेल्या ख्रिसमस सणाचे महत्त्व

========

आधुनिक काळातील सांता १९३० साली अस्तित्वात आला. हेडन सँडब्लोम नावाच्या एक कलाकाराने कोका-कोलाच्या जाहिरातीमध्ये सांताक्लॉजची भूमिका साकारली होती. जवळपास ३५ वर्ष तो सांता म्हणून टीव्हीवर झळकला. लाल कपड्यांमध्ये पांढरी दाढी असलेल्या सांताचे हे नवीन रूप मुलांना खूप आवडले. त्यानंतर सांताची क्रेझ वाढत गेली आणि तो लहान मुलांचा आवडता बनला. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.