मार्गशीर्ष महिन्या अवघ्या काही दिवसातच आता संपणार आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देखील आता संपत आहे. उद्या अर्थात १८ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार संपन्न होत आहे. साधारणपणे मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार येतात आणि चौथ्या, शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करण्याची प्रथा आहे. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. (Margshirsha)
देवीची स्थापना करून, पूजा करून कथा वाचन होते आणि उपवास केला जातो. असे हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत प्रत्येक महिला मनोभावे करते. पण याच व्रताचे उद्यापन करणे देखील आवश्यक असते. मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी हे उद्यापन केले जाते. मात्र मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कसे करावे? याबद्दल खूप महिलांना जास्त माहिती नसते. यासाठीच आज आपण याच मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाचा विधी जाणून घेणार आहोत. (Margshirsha Guruvar)
मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे महाक्ष्मीला समर्पित आहे. सुवासिनी महिला कुटुंबातील सुख-शांतीसाठी या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व्रत करतात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करुन पूजा केली जाते. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करण्याची प्रथा आहे. या दिवशी सुवासिनी महिला विधीवत पूजन करत संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मृगाशिरा नक्षत्रात असतो. त्यामुळे या महिन्याला मार्गशीर्ष म्हणतात. याच महिन्यात भगवान श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह झाल्याचा पुराणात उल्लेख आहे. यासह या महिन्यात देवी महालक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. (Marathi News)

मार्गशीष गुरुवार व्रताचे उद्यापन
मार्गशीष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नानादी करुन व्रताचा संकल्प घ्यावा आणि पूजेची मांडणी करावी. चौथ्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणे पुजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी. विधिवत पूजन करत व्रत कथा वाचन आणि आरती करा. संध्याकाळी उद्यापनावेळी महिलांना, कुमारिका यांना घरी बोलवावे. त्या दिवशी त्यांना लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यांना देवीचे रुप मानून स्वागत आणि त्यांचे आदरातिथ्य करावे. त्यांना असनावर बसवून हळदी कूंकू द्यावे. सुवासिनींना देवीस्वरूप समजून त्यांची पुजा करावी. त्यांना फळे द्यावी. तसेच फुलं, गजरा महालक्ष्मी व्रताचे पुस्तक आणि एखादी भेटवस्तू देत त्यांची ओटी भरावी. (Latest Marathi Headline)
मार्गशीष महिन्यातील गुरुवारी किंवा शेवटच्या गुरुवारी कन्यापूजन देखील करण्याची अनेकांच्या घरात पद्धत असते. यासह ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्नानादी करुन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करत व्रत कथा वाचून देवीची आरती करावी. त्यानंतर कळत नकळत झालेल्या चूकांची क्षमा मागत देवीची कृपादृष्टी सदैव कुटुंबावर रहावी अशी प्रार्थना करावी. नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे बोलून घटातील नारळ उचलून ठेवावे. किंवा देवीची कृपा असावी म्हणून प्रार्थना करावी. नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे म्हणत मूर्ती किंवा यंत्र तसेच कळश हालवून नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करावा. इतर साहित्य गरजूंना दान करु शकता. कळशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे. दरम्यान, दुर्वा, नारळ इतर निर्माल्य वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे. (Top Marathi News)
=======
Horoscope : आठवड्याचा सुरुवातीला या राशींना होणार लाभ तर या व्यक्तींनी रहा सावध, वाचा राशी भविष्य
=======
काही कारणामुळे गुरुवारी पूजा-आरती-कहाणी करणे शक्य नसेल, तर दुसऱ्याकडून करवून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. यंदा शेवटच्या गुरुवारी अमावस्या प्रारंभ होत असल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे. मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही जण चुकीची माहिती प्रसारीत करून इतरत्र संभ्रम निर्माण करतात. त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे १८ डिसेंबर रोजीच व्रताचे उद्यापन करा. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
