भारतापासून ४७०० किमी अंतरावर असलेल्या थायलंड आणि कंबोडियामध्ये पुन्हा एकदा एका शिवमंदिरावर संघर्ष सुरु झाला आहे. कंबोडिया हा देश भगवान शिवाला समर्पित या मंदिराला आपल्या समृद्ध इतिहासाचा एक भाग मानतो, तर थायलंड हा देश या मंदिराला आपल्या प्रतिष्ठेचा विषय मानतो. गेल्या ११८ वर्षांपासून सुरु असलेल्या या संघर्षात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या चार महिन्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन देशांमध्ये युद्धबंदीसाठी मध्यस्थी करत आपण आणखी एक युद्ध थांबवल्याचा दावा केला होता. (Thailand VS Cambodia)

पण या घोषणेला काही दिवस होत असतांनाच पुन्हा एकदा थायलंड आणि कंबोडिया यांच्यावादग्रस्त सीमेवर हवाई हल्ले सुरू झाले आहेत. या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देश एकमेकांवर युद्धबंदी भंग केल्याचा आरोप करीत आहेत. थायलंड आणि कंबोडिया या शेजारी देशांमध्ये सीमेवर असलेल्या शिवमंदिरावरुन अनेक वर्षापासून वाद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ऑक्टोबरमध्ये या युद्धाबाबत मध्यस्थी करुन हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. ऑक्टोबरमध्ये क्वालालंपूरमध्ये विस्तारित युद्धबंदी करारावर स्वाक्षरी झाली. यावेळी ट्रम्प आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम उपस्थित होते. 26 ऑक्टोबर 2025 रोजी स्वाक्षरी केलेला हा करार 44 दिवसही टिकला नाही. (International News)
आता या दोन्ही देशांमधील सीमेजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची जमवाजमव सुरु झाली आहे. थाई सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल विंथाई सुवारी यांनी थायलंडच्या अनेक भागात कंबोडियन सैन्याने प्रथम गोळीबार केल्याचा दावा केला. या दाव्याचे खंडन कंबोडियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते माली सोचेता यांनी करुन थाई सैन्याने कंबोडियन सैन्यावर हल्ला केला, असे सांगून आम्ही फक्त आमचा बचाव केल्याचा प्रतीदावा केला आहे. थायलंड आणि कंबोडियामधील ८१७ किलोमीटर लांबीची जमीन सीमा शतकाहून अधिक काळ वादग्रस्त आहे. ही सीमा पहिल्यांदा १९०७ मध्ये फ्रान्सने कंबोडियावर राज्य करताना मॅप केली होती. तेव्हापासून या दोन्ही देशांमध्ये वाद सुरु झाला आहे. त्याच सीमावर्ती भागात एक शिवमंदिर आहे. हे मंदिर एका हिंदू राजाने बांधले आहे. भगवान शंकराचे हे मंदिर ११ व्या शतकातील असून त्याला प्रेह विहार मंदिर असे म्हणतात. (Thailand VS Cambodia)
भगवान शिवाला समर्पित असलेले प्रेह विहार मंदिर, थायलंड-कंबोडिया सीमेवरील डांगरेक पर्वतरांगेच्या माथ्यावर आहे. कंबोडियाचा प्रेह विहार प्रांत आणि थायलंडचा सिसाकेट प्रांत या दरम्यानच्या डोंगराळ प्रदेशात हे प्राचीन मंदिर आहे. १९०७ मध्ये कंबोडियावर फ्रेंच वसाहतवादी राजवटीत काढलेल्या नकाशावरून हा वाद सुरु झाला. कंबोडियामध्ये हे मंदिर दाखवण्यात आले आहे. मात्र थायलंडने तत्कालीन फ्रेंच वसाहतकारांनी तयार केलेला नकाशा मान्य करण्यास कायम नकार दिला आहे. हा सीमेचे प्रकरण १९६२ मध्ये, कंबोडिया सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले. तिथे न्यायालयाने घोषित केले की, मंदिर कंबोडियन हद्दीत आहे. मग थायलंडने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागून मंदिराभोवतीचा अंदाजे ४.६ चौरस किलोमीटरचा भाग आपला असल्याचा दावा केला. (International News)
यानंतर २००८ मध्ये, कंबोडियाने प्रेह विहार मंदिराला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले. अर्थात यामुळे थायलंडमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर थायलंडने न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राला नकार दिला आणि हा मुद्दा अधिक वादात सापडला. इथे प्रेह विहार मंदिराचा प्राचीन वारसा किती मोठा आहे, हेही जाणून घेण्यासारखे आहे. प्रेह विहार मंदिर हे चार धामांपैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराच्या सुमारास बांधले गेले. त्याची आज दिसणारी रचना ११ व्या शतकात ख्मेर साम्राज्याचा राजा सूर्यवर्मन पहिला याने बांधली असल्याची माहिती आहे. मात्र हे मंदिर ९ व्या शतकापासून असल्याचा दावाही आहे. भगवान शिवाला समर्पित, हे मंदिर शास्त्रीय ख्मेर वास्तुकलेचे एक सुंदर उदाहरण आहे. त्यात एक शिवलिंग, एक मुख्य मंदिर आणि एक ग्रंथालय आहे. मंदिराच्या मोठ्या संकुलात यात्रेकरूंसाठी मोठा मंडप आहे. शिवाय महायान बौद्ध अभयारण्य आणि रुग्णालय देखील आहे. ख्मेर संस्कृतीचे प्रतीक म्हणून थायलंडसाठी, हे मंदिर प्रतिष्ठेचा विषय आहे. (Thailand VS Cambodia)

याच मंदिरावरुन जुलैमध्ये या दोन्ही देशांमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाल्यावर चीन आणि अमेरिका सारख्या देशांनी हस्तक्षेप केला. यात जवळजवळ 2,00,000 लोक विस्थापित झाले. त्यानंतर, 28 जुलै रोजी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांशी चर्चा केली आणि प्राथमिक युद्धबंदीची मध्यस्थी केली. पण आता हे दोन्ही देश पुन्हा या मंदिरावरुन समोरासमोर आले आहेत. गेल्या महिन्यात भूसुरुंग स्फोटात एक थाई सैनिक जखमी झाला. त्यानंतर, थाई सरकारने कंबोडियासोबतचा युद्धविराम करार रद्द करुन चार सीमावर्ती जिल्ह्यांतील ३,८५,००० हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. त्यावरुनच आता थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्ध सुरु झाल्यास ते किती विकोपाला जाऊ शकते, याची कल्पना येत आहे. (International News)
========
हे देखील वाचा : America : इल्हान उमरला अमेरिकेतून हद्दपार करणार !
========
आता प्रश्न असा आहे की, थायलंड आणि कंबोडियामधील संघर्षाचे कारण काय आहे? तर, हे जाणून घ्या की दोन्ही देशांमधील सीमा वाद अनेक वर्षे जुना आहे. विशेषतः, फ्रेंच वसाहत काळात काढलेल्या नकाशांवर आधारित दोन्ही देशांनी स्वतःचा दावा केलेल्या मंदिरे आणि पुरातत्वीय स्थळांवर जुलै २०२५ मध्ये पाच दिवसांचे युद्ध सुरू झाले. जोरदार गोळीबार झाला, ज्यामुळे ४३ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ३,००,००० लोकांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. (Thailand VS Cambodia)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
