भारताला लोकशाही संविधान देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन….! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज शनिवार, ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. हा दिवस भारतीय समाजासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी देशभरातील बाबासाहेबांचे अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर जमतात आणि त्याच्या स्मृतीला उजाळा देतात. यंदाचा महापरिनिर्वाण दिन ६९ वा आहे. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते. (Mahaparinirvan Din)
याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांचे विचार आजही प्रत्येकाला उभारणी देणारे, प्रेरणा देणारे आणि सामाजिक परिवर्तनाचा दृढ मार्ग दाखवणारे आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. आजच्या या खास दिवशी बाबासाहेबानी समाजाला उपयुक्त असे काही प्रेरणादायी विचार सांगितले आहेत. ते कोणते जाणून घेऊया.
– शिक्षण हेच मनुष्याचे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे त्यांनी दाखवून दिले. शिक्षण हे स्वातंत्र्याची गुरुकिल्ली मानली जाते. शिक्षण हेच व्यक्तीला बुद्धी, विवेक आणि आत्मविश्वास देणारे साधन आहे. (Todays Marathi Headline)
– समानतेची ही भावना समाजातील भेद मिटवून नवा मानवतावादी दृष्टिकोन देणारी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जात, पंथ किंवा जन्मामुळे श्रेष्ठता येत नाही. मनुष्याची ओळख त्याच्या कर्तृत्वात आणि सद्गुणांध्ये असते. हा त्यांचा विचारांचा मुलभूत संदेश आहे.
– “नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा.”आपण जे करतोय किंवा आपल्यात जी ताकद आहे ती ओळखायला शिका. नशिबावर निर्भर राहू नका.
– “दुसऱ्याच्या सुख दुखाःत भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.”इतर लोकांना मदत करत राहा. त्यांच्या सुख दुखःत सहभागी व्हा. यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील.

– आपले उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे तुम्हाला दररोज आठवण राहील की ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत. ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहान सहान संकुचित ध्येय नाही. थोड्याश्या नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही. आमच्या अंतःकरणातील आकांक्षा फार मोठ्या आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय. (Top Stories)
– शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. (Top Marathi Headline)
– जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत. इतिहास कधी विसरायचा नसतो. त्यातून अनेक गोष्टी शिकायच्या असतात. ज्या चुका इतिहासात झाल्या त्या पुन्हा होऊ द्यायच्या नसतात. त्यावेळीच तुम्ही इतिहास घडवू शकता.
– आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.
– बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे. (Latest Marathi Headline)
– स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा.
– कोण कोणत्या कुटुंबात जन्मला यावरून त्याची महती ठरवू नये, तर त्याने आपल्या जीवनात काय कर्तृत्व केले यावरून त्याचे मोठेपण ठरवावे.
– लोकशाहीत केवळ बहुमताच्या मताचा आदर करणे पुरेसे नाही, तर अल्पसंख्याकांच्या हक्कांचे आणि हितांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
======
Homeguard : पोलिस दलाचे पूरक दल म्हणजेच ‘होमगार्ड’
======
– समाजात रूढ असलेल्या अन्यायकारक रूढी, परंपरा आणि भेदभावांच्या बेड्या तोडल्याशिवाय व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही, असे त्यांचे मत होते. (Top Trending News)
– जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल.
– “बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे”आपण नेहमी काहीतरी शिकत राहिले पाहिजे. आपले ज्ञान वाढविण्यावर भर दिला पाहिजे. (Scoial News)
