Home » Protein : प्रोटीन पावडर घेणे खरंच आरोग्यासाठी लाभदायक?

Protein : प्रोटीन पावडर घेणे खरंच आरोग्यासाठी लाभदायक?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Protein
Share

आजच्या काळात अनेक लोकांचा ओढा हा जिमकडे वाढताना दिसत आहे. जिममध्ये जाऊन बॉडी बनवण्यासाठी पुरुषच नाहीतर महिला देखील आघाडीवर आहेत. जिममध्ये जाऊन व्यायाम करणारे जवळपास सर्वच लोकं नियमित प्रोटीन पावडर घेताना दिसतात. आपण टीव्हीवर देखील विविध ब्रँड्सच्या प्रोटीन पावडरच्या जाहिराती बघत असतो. अनेक कलाकार, क्रिकेटर्स देखील प्रोटीन पावडर घेताना दिसतात. मात्र नक्की ही प्रोटीन पावडर नेमकी काय असते? तिचे सेवन करणे किती योग्य असते? प्रोटीन पावडरचे फायदे आणि तोटे काय असतात? आदी सर्वच गोष्टींची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. (Protein)

शरीराला आवश्यक असलेल्या प्रथिनांचा पुरवठा करण्यासाठी प्रोटीन पावडरचे सेवन केले जाते. शरीराच्या अनेक कार्यांमध्ये प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात, म्हणूनच रोजच्या आहारात प्रथिने असणे आवश्यक आहे. आपल्या आहारात प्रथिनांना महत्त्वाचे स्थान आहे यात काही शंका नाही. आपल्या स्नायूंच्या वाढीसाठी आणि त्यांची झीज भरून काढण्यासाठी, हाडे मजबूत ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी, मेंदू-हृदय आणि त्वचा योग्यरित्या कार्यरत राहण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. प्रथिनेसाठी अंडी, दूध, दही, मासे, डाळी, मांस, सोयाबीन, फळे, बिया यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. (Marathi News)

प्रोटीन पावडर केवळ जीममध्ये जाणाऱ्या लोकांनीच प्यायची असते, असे नाही. ज्या लोकांची नियमित जेवणातून शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची कमतरता पूर्ण होऊ शकत नाहीत त्यांना डॉक्टर सप्लिमेंट म्हणून प्रोटीन पावडर घेण्याची शिफारस करतात. शरीराला आवश्यक असलेल्या प्रथिनांचा पुरवठा करण्यासाठी याचे सेवन केले जाते. काही वेळा आपल्या आहारतून शरीराला आवश्यक असलेले प्रथिने मिळू शकत नाही, ज्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. त्या समस्या दूर सारण्यासाठी प्रोटीन पावडर घेतली जाते. तुम्हाला दररोज किती प्रथिनांची गरज आहे हे तुमच्या शरीरावर, वजनावर आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते. (Health)

जी लोकं शारीरिक श्रम अधिक करतात त्या लोकांसाठी, प्रतिकारशक्ति कमी असलेल्या लोकांसाठी रोज मुबलक प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. कारण शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आणि शरीर ऊर्जावान बनवण्यासाठी त्याची आवश्यकता असते. मात्र अनेकदा प्रथिनांची कमतरता भासत असल्याने शरीराला याचा अपेक्षित पुरवठा होत नाही. त्यामुळे व्यक्तीला सांधेदुखी, थकवा, रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे आदी आजारांना सामोरे जावे लागते. असे होऊ नये म्हणून प्रोटीन पावडरच्या माध्यमातून बाहेरून प्रथिने घेतली जातात. मात्र ही प्रथिने प्रोटीन पावडरच्या रूपात घेणे किती योग्य पाहूया. (Todays Marathi Headline)

Protein

साधी जीवनशैली असलेल्या लोकांनी शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम ०.८ ग्रॅम प्रथिने दररोज घ्यायला हवी. मात्र आहाराद्वारे ही प्रथिने मिळत नसतील तर शरीरातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रोटीन पावडर घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे दररोज प्रोटीन पावडर वापरणे सुरक्षित असल्याचे तज्ञ सांगतात. साधारणपणे प्रोटीन पावडर डाळी, ड्रायफ्रुटस, ओट्स, दूध, अंडी आदी गोष्टींपासून बनवली जाते. प्रोटीन पावडर घेण्याचे फायदे कोणते? (Top Marathi HEadline)

प्रोटीन पावडरचे फायदे
प्रोटीन पावडर रोज घेण्यात तसे चुकीचे काहीच नाहीये, मात्र सप्लिमेंट म्हणून प्रोटीन पावडर घेण्याआधी त्याची गरज अन्नातूनच भागवली गेली पाहिजे. पण तरीही कधीकधी प्रथिनांची कमतरता पूर्ण होत नसेल, तर प्रोटीन पावडर घेणे योग्य ठरते. प्रोटीन पावडर पोट भरलेले ठेवते, त्यामुळे इतर काहीही खाण्याची गरज लागत नाही. तसेच यामध्ये कमी कॅलरीज असतात. त्यामुळे कमी कॅलरीजमध्ये जास्त प्रथिने मिळतात परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. प्रोटीन पावडरमुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले ९ आवश्यक अमीनो ऍसिड मिळतात जे स्नायूंसाठी आवश्यक असतात. व्हे प्रोटीन आणि सोया प्रोटीनमध्ये सर्व अमीनो ॲसिड असतात, त्यामुळे ते घेणे फायदेशीर ठरते. (Latest Marathi NEws) 

प्रोटीन पावडर घेण्याचे तोटे
काही प्रोटीन पावडरमध्ये अत्यधिक साखर आणि कॅलोरीज असतात. यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो आणि रक्तातील शर्करा पातळी अनियंत्रित होऊ शकते. त्यामुळे, जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर अधिक प्रोटीन पावडर घेणं चांगले नाही. प्रोटीन पावडर चवदार बनवण्यासाठी भरपूर साखर वापरली जाते. याच्या सेवनाने इन्सुलिन वेगाने वाढते आणि वजन वाढते. यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. प्रोटीन पावडरमध्ये जड धातू, बिस्फेनॉल-A, कीटकनाशके आणि इतर हानिकारक घटक असू शकतात. या पदार्थांचा नियमितपणे सेवन केल्याने आपल्या शरीरावर दीर्घकालीन हानी होऊ शकते. यामुळे आपल्याला तोंडातील गंध, त्वचेचे विकार, आणि किडनीसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. (Trending Marathi HEadline)

Protein

प्रोटीन ही पावडर तयार करण्यासाठी डेअरी किंवा वनस्पती आधारित प्रथिने वापरली जातात. काही लोकांच्या पचनसंस्थेला ते पचवण्यात खूप अडचणी येतात. ज्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि पोटात क्रॅम्पची समस्या होऊ शकते. अनेक प्रथिने पावडरमध्ये कृत्रिम गोडवा, स्वाद आणि रंग असतात, जे आतड्याच्या आरोग्यास हानी पोहोचवतात. या गोष्टी पोटात असलेल्या निरोगी आतड्यांतील बॅक्टेरियाचे असंतुलन करू शकतात आणि पचन बिघडू शकतात. काही प्रोटीन पावडर ब्रँड्समध्ये जड धातूंचं प्रमाण खूप जास्त असतो, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे, प्रोटीन पावडरचे अतिरेकी सेवन करणे धोकादायक ठरू शकते. (Top Marathi News)

होममेड प्रोटीन पावडरमध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार आणि गरजेनुसार गोष्टी घालू शकता. हे केवळ पूर्णपणे सुरक्षितच नाही तर पोषक तत्वांनी देखील परिपूर्ण आहे. प्रोटीन पावडर तयार करण्यासाठी आपल्याला प्रोटीन आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या घटकांची आवश्यकता असते. ही पावडर तयार करताना मूग डाळ, मसूरडाळ, सोयाबीन, बदाम, काजू, अक्रोड, चिया बियाणे, फ्लॅक्स बियाणे, ओट्स आणि क्विनोआ, दूध पावडर आदी गोष्टींचा वापर करू शकता. घरगुती प्रोटीन पावडर कशी बनवावी? (Latest Marathi Headline)

=========

Blood Sugar : अचानक कमी होणारे शुगर लेवल कोणत्या आजाराचे संकेत? तज्ज्ञांचे महत्त्वाचे इशारे

Health Care : व्यायाम केल्याने लवकर वजन कमी होते असे मानता? आधी वाचा या गोष्टी                

=========

मल्टीग्रेन प्रोटीन पावडर रेसिपी
१ वाटी सोयाबीन, १/२ कप मूग डाळ, १/२ कप मसूर डाळ, १/४ कप चणा डाळ या सर्व डाळी आणि सोयाबीन धुवून उन्हात वाळवावे. नंतर मंद आचेवर हलके भाजून घ्या जेणेकरून ओलावा पूर्णपणे निघून जाईल. भाजलेली डाळ ग्राइंडरमध्ये टाकून पावडर बनवा. यानंतर हवाबंद डब्यात साठवून दूध किंवा पाण्यात मिसळून प्यावे. (Top Trending News)

यासोबतच तुम्ही ड्रायफ्रूट्स प्रोटीन पावडर देखील बनवू शकतात. १/२ कप बदाम, १/२ कप काजू, १/४ कप अक्रोड, २ चमचे चिया बियाणे, २ चमचे फ्लॅक्स सीड्स मंद आचेवर सर्व ड्रायफ्रूट्स आणि बिया हलक्या परतून घ्या. यानंतर थंड झाल्यावर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. त्यात कोको पावडर किंवा वेलची पूड घालून चवीसाठी साठवून ठेवा. (Social News)

(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.