बांगलादेशात अलिकडच्या दोन महिन्यात येणा-या भूकंपाच्या संख्येत वाढ झाली आहे. सतत येणा-या या भूकंपामुळे भूंकपशास्त्रज्ञांनी या भागात संशोधन सुरु केले. यातून आलेला निष्कर्ष हा बांगलादेशसाठी जसा भीतीदायक आहे, तसाच तो भारतासाठी सुद्धा काळजी वाढवणार आहे. कारण भारत आणि बांगलादेश दरम्यान नवीन भूकंपप्रवण फॉल्ट लाइन शोधण्यात आली आहे. या नवीन फॉल्ट लाइनमुळे फक्त बांगलादेशातील ढाका शहराताच नाही तर भारतातील कोलकाता शहरही धोक्यात आले आहे. संशोधकांनी बांगलादेश ते कोलकाता पर्यंत ४०० किलोमीटर लांबीची एक नवीन सक्रिय फॉल्ट लाइन शोधली आहे. या फॉल्ट लाइनमुळे ६ तीव्रतेपर्यंतचे भूकंप निर्माण होऊ शकतात. सध्या या भागात सातत्यानं जे भूकंपाचे धक्के बसत आहेत, या भूकंपाच्या धक्क्यात वाढ होण्याचीही शक्यता आहे, शिवाय ६ हून अधिक तीव्रतेचा भूकंपही भागात येण्याची भीतीही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. (Bangladesh)

गेल्या दोन महिन्यापासून बांगलादेश आणि परिसरातून भूकंप होत असल्याच्या बातम्या येत आहेत. हे भूकंपाचे धक्के भारतातील कोलकत्ता आणि दिल्ली भागातही जाणवले आहेत. या सातत्यानं येणा-या भूकंपामुळे या भागातील भौगोलिक रचनेचा अभ्यास करण्यात आला. त्यातून आलेल्या अहवालामुळे भारतासह बांगलादेशची चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय भूकंप संशोधन पथकाने बांगलादेशमध्ये एक नवीन सक्रिय भूमिगत फॉल्ट लाइन शोधली आहे. ही या दोन्हीही देशांना काळजीत टाकणारी बातमी आहे. (International News)
कारण ही फॉल्ट लाइन बांगलादेशातील जमालपूर आणि मैमनसिंग येथून उगम पावते आणि भारताच्या कोलकातापर्यंत पसरली आहे. या फॉल्ट लाइनची लांबी अंदाजे ४०० किलोमीटर आहे. मुख्य म्हणजे, ही एक सक्रिय फॉल्ट लाइन असल्याने, या भागाला भूकंपाचा धोका कायम रहाणार आहे. बांगलादेशमधील फॉल्ट लाइनचा एक भाग भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय आहे. ही फॉल्ट लाइन ६ तीव्रतेपर्यंतचे भूकंप निर्माण करण्यास सक्षम आहे. मात्र हे भूकंप ६ रिक्टल स्केलपर्यंतच येतील असेही स्पष्ट नाही. कारण त्यांचे सातत्य किती आहे, यावरच त्याची तीव्रता किती असेल हे ठरणार आहे. या भागात भूकंप सातत्यानं झाले, तर त्याची तीव्रता वाढण्याची भीतीही या संशोधनातील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. (Bangladesh)
बांगलादेशमध्ये दोन मुख्य फॉल्ट लाइन आहेत. एक डावकी फॉल्ट लाइन आणि दुसरी इंडो-बर्मा मेगाथ्रस्ट आहे. याव्यतिरिक्त, देशात सीताकुंड कोस्टल फॉल्ट लाइन, मधुपूर, शाहजीबाजार, जाफलोंग आणि कोमिल्ला सारख्या इतर फॉल्ट लाइन देखील आहेत. यामध्ये आता आणखी एका फॉल्ट लाइनचा समावेश झाला आहे. बांगलादेशमध्ये आतापर्यंत झालेल्या भूकंपात १० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शिवाय येथील घरांना त्याचा फटका बसला आहे. (International News)
मात्र सातत्यानं भूकंप झाल्यास या भागातील बांधकामांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे या भागातील घरे आणि अन्य इमारती, किती तीव्रतेचे भूकंप सहन करु शकतात, याची तपासणी करण्याचीही गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठा भूकंप आल्यास त्यात मोठी मनुष्य आणि वित्त नाही होण्याची भीती आहे. बांगलादेशातून निघणा-या या नवीन फॉल्ट लाइनचा धोका भारतालाही तेवढाच आहे. विशेषतः कोलकाताचा भाग या लाइनच्या हद्दीत येत आहे. येथेही आत्तापर्यंत अनेक लहान भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे या भागातील रहिवाशी इमारती आणि अन्य बांधकामांची पाहणी करण्याची मागणी आहे. (Bangladesh)
========
हे देखील वाचा : Benei Menashe : कोण आहेत ? बेनेई मेनाशे ज्यू….ज्यांना इस्रायल परत नेणार !
========
हे भूकंप कधी आणि किती तीव्रतेचे येणार हे सांगता येत नसले तरी, त्यातून होणारी हानी ही मोठी असेल, असा इशारा देण्यात आला आहे. या सर्व अभ्यास मंडळात बांगलादेशसह अमेरिका, फ्रान्स, तुर्की येथील अनेक संशोधक होते. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ही फॉल्ट लाइन तीन भागांमध्ये विभागली गेली आहे. एका भागात कमी तीव्रतेच्या भूकंपांचा धोका आहे, दुसऱ्या भागात उच्च तीव्रतेच्या भूकंपांचा धोका आहे आणि तिसऱ्या भागात कोणताही धोका नाही. मात्र यापैकी कोणते क्षेत्र जास्त धोकादायक आहे आणि कोणते कमी धोकादायक आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
