Home » Dry Begging : रिलेशनशिपमध्ये वाढत चाललेला ‘ड्राय बेगिंग’चा ट्रेंड! हे आहे मोठे रेड फ्लॅग

Dry Begging : रिलेशनशिपमध्ये वाढत चाललेला ‘ड्राय बेगिंग’चा ट्रेंड! हे आहे मोठे रेड फ्लॅग

by Team Gajawaja
0 comment
Dry Begging
Share

Dry Begging : आजच्या आधुनिक नातेसंबंधांमध्ये अनेक नवीन ट्रेंड पाहायला मिळतात. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे जोडप्यांमधील संवाद, अपेक्षा आणि वागणूक यांमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. अशाच बदलांमधून तयार झालेला एक धोकादायक पॅटर्न म्हणजे ड्राय बेगिंग. हे नाव ऐकायला नवीन वाटू शकते, परंतु त्याचा परिणाम नातेसंबंधावर अत्यंत नकारात्मक असतो. रिलेशनशिप एक्स्पर्ट्सच्या मते, ड्राय बेगिंग हा एक इमोशनल मॅनिप्युलेशनचा फॉर्म आहे आणि तो दिसला की तो मोठा रेड फ्लॅग मानला जातो. (Dry Begging)

ड्राय बेगिंग म्हणजे नेमकं काय? साध्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पार्टनरकडून सहानुभूती, लक्ष, प्रेम किंवा मदत मिळवण्यासाठी थेट काही न मागता, अप्रत्यक्षपणे स्वतःला बळी दाखवते, त्याला ड्राय बेगिंग म्हणतात. हे लोक स्वतःला खूप दुःखी, एकटे, किंवा निराश दाखवतात, ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला अपराधी वाटावे आणि त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी करावे. ही पद्धत नात्यातील विश्वास, समतोल आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करते.

Dry Begging

Dry Begging

रिलेशनशिप कोच सांगतात की ड्राय बेगिंग करणारी व्यक्ती स्वतःला नेहमीच ‘बळी’ म्हणून सादर करते. ते अनेकदा असे वाक्य वापरतात की, कोणी माझी काळजी घेत नाही, मी नेहमी एकटाच राहतो, माझ्यासाठी कोणी वेळच नाही, किंवा तू व्यस्त आहेस म्हणून मला कोणीच नाही. अशा प्रकारचे वाक्ये सतत ऐकू येत असतील, तर ते तुमच्यासाठी एक गंभीर इशारा आहे. यामुळे दुसऱ्या पार्टनरला सतत गिल्ट-ट्रिप केले जाते, ज्यामुळे तो/ती भावनिकदृष्ट्या कमकुवत होत जातात. अशा नात्यात एकतर्फी भावनिक ओझे वाढत जाते. (Dry Begging)

ड्राय बेगिंगमुळे होणारा सर्वात मोठा धोका म्हणजे नात्यातील इमोशनल बॅलन्स बिघडणे. एका बाजूला सतत अपेक्षा ठेवणारी व्यक्ती असते, तर दुसऱ्या बाजूला अपराधी भावना सहन करणारा पार्टनर. अशा नात्यांमध्ये वेळेनुसार तणाव, राग, निराशा आणि भावनिक थकवा निर्माण होतो. दीर्घकाळ चालणाऱ्या या पॅटर्नमुळे नाते तुटण्याची शक्यता देखील वाढते. तज्ज्ञांच्या मते, अशा नात्यात असणाऱ्या व्यक्तीला स्वतःची किंमत कमी वाटू लागते आणि त्यांचा आत्मविश्वासही ढासळतो.

हा रेड फ्लॅग ओळखण्यासाठी काही संकेत जाणून घेणे आवश्यक आहे. पार्टनर वारंवार स्वतःची दयनीय प्रतिमा तयार करतो का? तुमचा वेळ, प्रयत्न आणि भावना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो का? तुम्हाला सतत अपराधी वाटवतो का? तुमच्या छोट्या गोष्टींवरही भावनिक प्रतिक्रिया देऊन तुम्हाला ‘माझ्यासाठी काही करत नाहीस’ असे जाणवून देतो का? जर उत्तर ‘होय’ असेल, तर ते ड्राय बेगिंगचे स्पष्ट उदाहरण आहे. या पॅटर्नला दुर्लक्षित केल्यास पुढे त्याचे गंभीर मानसिक परिणाम दिसू शकतात.

=====================

हे देहकील वाचा :

PPF Scheme : महिन्याला फक्त ७,००० रुपयांच्या गुंतवणुकीत तयार होईल तब्बल ५७.७२ लाखांचा सुरक्षित फंड                                    

Pre-marital Counseling : लग्नापूर्वी कपल्सने काउंसिलिंग करावी का? वाचा फायदे

 Instagram : इंस्टाग्राम हॅक होऊ नये म्हणून फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स                                  

=====================  

तज्ज्ञांचा सल्ला असा की अशा परिस्थितीत संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. पार्टनरशी मोकळेपणाने चर्चा करणे, मर्यादा ठरवणे आणि भावनिकदृष्ट्या स्वतःला मजबूत ठेवणे गरजेचे आहे. काही वेळा अशा नात्यांमध्ये काउन्सेलिंगचीही मदत घ्यावी लागते. नातेसंबंध परस्पर आदर, समजूतदारपणा आणि समान योगदानावर टिकतात  भावनिक ब्लॅकमेल किंवा मॅनिप्युलेशनवर नाही. (Dry Begging)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.