Home » Oily Food : ऑयली फूड खाल्ल्याने खरोखर पिंपल्स वाढतात का? जाणून घ्या संपूर्ण सत्य

Oily Food : ऑयली फूड खाल्ल्याने खरोखर पिंपल्स वाढतात का? जाणून घ्या संपूर्ण सत्य

by Team Gajawaja
0 comment
Oily Food
Share

Oily Food : पिंपल्स म्हणजे तरुणाईचा मोठा त्रास. चेहऱ्यावर एकदादा आले की दिवसाचा मूडच बिघडतो. बहुतांश लोकांना वाटते की तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पिंपल्स होतात, म्हणून ऑयली फूडला दोष दिला जातो. पण काय हे पूर्णपणे खरं आहे? याच संशयावर त्वचारोग तज्ज्ञांनी प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, केवळ ऑयली फूडमुळे पिंपल्स होतात असे नाही, परंतु तेलकट आहार पिंपल्स निर्माण होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने वाढवतो आणि त्वचेची स्थिती खराब करू शकतो.

फक्त तेल नव्हे, पण संपूर्ण आहार जबाबदार त्वचा तज्ज्ञांच्या मते, केवळ तेलकट पदार्थ खाण्यामुळे पिंपल्स होत नाहीत. प्रत्यक्षात जंक फूड, तळलेले पदार्थ, बटर, चीज, मेयोनीज सारख्या जास्त फॅट असलेल्या खाद्यपदार्थांचे प्रमाण वाढले तर शरीरात सीबम (तेल) जास्त प्रमाणात स्रावित होतो. यामुळे त्वचेचे पोर्स ब्लॉक होतात आणि पिंपल्स निर्माण होतात. तसेच अशा पदार्थांमध्ये रिफाइंड कार्ब्ज आणि साखर जास्त असल्याने शरीरात इन्फ्लेमेशन वाढते, जे पिंपल्सला मोठ्या प्रमाणात ट्रिगर करते.(Oily Food)

 

Oily Food

Oily Food

कोणत्या ऑयली सवयी पिंपल्सला आणखी वाढवतात? तज्ज्ञांच्या मते खालील गोष्टी त्वचेवर वाईट परिणाम करू शकतात

 वारंवार चिप्स, समोसा, पिझ्झा, फ्राईड चिकन, वडापाव यांसारखे पदार्थ खाणे
 अत्याधिक मसालेदार आणि तूप/तेलावर आधारित जेवण
 जास्त साखर आणि मिल्क प्रॉडक्ट्सचे सेवन
 कमी पाणी पिणे
झोपेची कमतरता आणि ताणतणाव

आहार योग्य नसेल तर त्वचेतील तेलाचे उत्पादन वाढते आणि पिंपल्सची समस्या सतत राहते.  पिंपल्स टाळण्यासाठी आहारात काय बदल करावेत? एक्सपर्ट सुचवतात की त्वचा स्वच्छ ठेवण्यासोबतच हेल्दी डायट फॉलो करणे खूप महत्त्वाचे आहे. खालील गोष्टींचा आहारात समावेश केल्यास फायदा होऊ शकतो (Oily Food)

 फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य
 नारळ पाणी, पाणी आणि डिटॉक्स फ्लुइड्स
 ओमेगा-3 असलेले पदार्थ बदाम, अक्रोड, फ्लॅक्ससीड
 प्रोबायोटिक फूड दही, किमची, इडली-दोसा
 मसाले कमी, तळलेले पदार्थ कमी, साखर कमी

====================

हे देखिल वाचा :

Winter : शरीराला उबदार ठेवणाऱ्या ‘या’ चविष्ट सूप रेसिपी नक्की तरी करा

Momos : हेल्दी आणि टेस्टी पालक मोमोज बाकी मोमोज विसराल, घरच्या घरी बनवा पौष्टिक रेसिपी!

Pickle Oil : हिवाळ्यात लोणच्याचे तेल का सुकते? जाणून घ्या ते पुन्हा पूर्वीसारखे मऊ आणि वापरण्यायोग्य कसे कराल

====================

याशिवाय त्वचा स्वच्छ ठेवणे, मेकअप रात्री काढणे आणि पिलो कव्हर वारंवार बदलणेही अत्यंत आवश्यक आहे. फक्त “तेलकट पदार्थ खाल्ले म्हणून पिंपल्स होतात” असे म्हणणे चुकीचे आहे. परंतु ऑयली, मसालेदार आणि प्रोसेस केलेल्या अन्नामुळे सीबम उत्पादन, हार्मोनल असंतुलन आणि इन्फ्लेमेशन वाढत असल्यामुळे पिंपल्स येण्याचा धोका निश्चितच वाढतो. त्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहार आणि स्किनकेअर दोन्हीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(Oily Food)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.