मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला श्रीदत्त जयंती साजरी केली जाते. यंदा ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होत आहे. श्री दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप आहे. अत्री ऋषी देवी अनुसूया यांच्या पोटी दत्तात्रयांचा जन्म झाला. आता दत्त जयंती म्हटल्यावर अनेक घरांमध्ये या काळात श्री गुरुचरित्राचे पारायण केले जाते. दत्त जयंतीच्या निमित्ताने ‘श्री गुरुचरित्र’ या पोथीचे पारायण करण्याची मोठी परंपरा आहे. ५२ अध्याय असलेल्या या पोथीचे अनेक लोकं पारायण करतात आणि दत्त जयंतीला त्याचे पारणे करतात. ७,३,१ अशा दिवसांमध्ये हे पारायण केले जाते. गुरु चरित्राचे पारायण सुरु करण्यापूर्वी संकल्प पूजा करणे आवश्यक असते. अर्थात जी व्यक्ती पारायण करणार आहे, तिने ‘इतक्या इतक्या दिवसात मी गुरुचरित्राची पोथी वाचून पूर्ण करणार आहे.’ असे म्हणणे. मग हा संकल्प कसा करावा? पाहूया. (Datta Jayanti)
सर्वप्रथम आपले देवघर स्वच्छ करा. जिथे तुम्ही हे पारायण करणार आहेत ती जागा स्वच्छ असावी. पारायण एकाच जागी बसून करावे. रोज जागा बदलू नये. एक स्वच्छ कापड, चौरंग, दत्त महाराजांचा फोटो, गुरुचरित्र ग्रंथ, शुद्ध तुपाचा दिवा, हळद, कुंकू, अक्षता, फुले-हार, तांदूळ- सुपारी, कलश, तांबे, शंख, घंटा, बसण्यासाठी आसन, नैवेद्य, दीप, उदबत्ती आदी साहित्य जवळ घेऊन बसावे. (Marathi Latest News)
आता आसन ग्रहण करुन संकल्प करा. दत्तगुरूंचे स्मरण करून उजव्या हातात पाणी, हळद, कुंकू, अक्षता आणि फुल घेऊन प्रार्थना करावी. श्री गुरुदेव दत्त, मी माझ्या कुटुंबाच्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारायणाची सेवा करत आहे. याला यशस्वी करा आणि सर्व मनोकामना पूर्ण करा. मग तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. आपल्या पहिल्या तीन बोटांनी आपल्या कपाळाला, छातीला आणि दोन्ही भुवयांना भस्म लावा. कलशावर कुंकूवाच्या रेषा काढून त्या कलशाची पूजा करावी. मग या शुद्ध जलाने भरलेल्या कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुल, एक सुपारी टाका आणि त्यावर विड्याची पाच पाने ठेवा. (Marathi News)

चौरंगावर गणपतीची स्थापना करुन शेजारी थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर कलश स्थापित करा. उजव्या हाताला शंखाची आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करुन पूजा करा. कलशासमोर विड्याच्या पानावर एक सुपारी, हळकुंड आणि एक बदाम ठेवा. देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती स्थापित करा. दत्त गुरूंना शुद्ध पाणी, पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान घालावे. नंतर पुरुषसूक्ताचा अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. गुरुंना हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि भस्म अर्पण करा. चौरंगाच्या पुढे गुरुचरित्राच्या पोथीसाठी अजून एक पाट किंवा चौरंग ठेवा. त्यावर स्वच्छ वस्त्र ठेवून त्यावर थोडी अक्षता आणि त्यावर गुरुचरित्राची पोथी ठेवा. पोथीची पूजा करावी. (Top Marathi News)
आसनावरच ठेवून पोथीचे वाचन सुरु करावे. पोथी वाचताना अखंड दिवा प्रज्वलित करा आणि सतस उदबत्तीचा सुवास दरवळू द्या. पारायणाच्या काळात दिवा विझू देऊ नका. रोज वाचन झाल्यानंतर सकाळ-संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला आणि दत्त महाराजांना घरात बनवलेल्या आहाराचा नैवेद्य दाखवा. सकाळी- संध्याकाळ दोन्ही वेळा आरती करावी. (Latest Marathi Headline)
गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन
शेवटच्या दिवशी संपूर्ण वाचन पूर्ण झाल्यावर व्रताचा दिवस असल्याने उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे अधिक चांगले. उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ कपडे घालावे. सुगंधी धूप लावावा. दररोज प्रमाणे पूजा करावी. दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये समाविष्ट करा. पूजा पूर्ण झाल्यावर गाईला नैवेद्य दाखवा. आरती करा आणि संकल्पाप्रमाणे मेहुण, ब्राह्मणाला भोजन आणि दानधर्म करा. दुसऱ्या दिवशी सकाळी, संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध अक्षता आणि फुले वाहून पूजा हलवा. कलशातून तांब्यात घेतलेले पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडा. नारळ फोडून प्रसाद बनवा. इतर साहित्य पाण्यात विसर्जित करा. (Top Trending News)
========
Datta Jayanti : दत्त जयंती- श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याचे नियम आणि पद्धत
Datta Jayanti : यंदा दत्त जयंती कधी आहे? जाणून घ्या या दिवसाचे महत्व
========
श्री दत्तात्रयाची आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रेलोक्य राणा ।।
नेती नेती शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।।१।।
जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता। आरती ओवाळिता हरली भवचिंता। जय देव जय देव। (Top Stories)
सबाह्य अभ्यंतरीं तू एक दत्त। अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।।
परा ही परतली तेथे कैंचा हा हेत । जन्मरमरण्याचा पुरलासे अंत ।।२।। जय देव जय देव
दत्त येऊनिया उभा ठाकला । सद्भावे साष्टांग प्रणिपात केला ।।
प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला । जन्ममरण्याचा फेरा चुकविला ।।३।। जय देव जय देव
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान। हारपले मन झाले उन्मन ।।
मीतूंपणाची झाली बोळवण । एका जनार्दनीं श्री दत्त ध्यान ।।४।। जय देव जय देव (Social News)
(टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. आम्ही त्याची हमी देत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
