विवाह पंचमी हा सण हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानला जातो. विवाह पंचमी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी केली जाते. मान्यतेनुसार या दिवशी राम आणि माता सीतेचा विवाह झाला होता. असे मानले जाते की या दिवशी राम आणि सीतेची मनोभावे पूजा केल्याने वैवाहिक जीवन आनंदी आणि सुखकर होते तसेच इच्छित जीवनसाथी आणि सौभाग्य लाभते. सोबतच ज्यांचे लग्न जुळण्यास अडचण येते त्यांचे लग्न देखील लवकर जुळते. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला विवाह पंचमी साजरी केली जाते. (Vivah Panchami)
यंदा ही विवाह पंचमी वैदिक कॅलेंडरनुसार, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून २२ मिनिटांनी सुरू होईल आणि २५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजून ५६ मिनिटांनी संपेल. यावर्षी विवाह पंचमी २५ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. विवाह पंचमीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करण्याला मोठे महत्त्व आहे. मात्र विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा का केली जाते? यामागे नक्की कोणते कारण आहे, चला जाणून घेऊया. (Lord Vishnu)
घरामध्ये केळीचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते अशी पौराणिक मान्यता आहे. हे भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि बृहस्पतींशी संबंधित आहे. केळी हे भगवान विष्णूंचे आवडते झाड आहे असे मानले जाते. घराच्या अंगणात किंवा बागेत केळीचे झाड लावल्यास त्याचे शुभ फळ मिळते. असे मानले जाते की यामुळे घरात सुख-समृद्धी येते विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. (Marathi News)

केळीचे झाड खूप शुभ मानले जाते आणि भगवान विष्णूच्या पूजेमध्ये विशेषत: सत्यनारायणाच्या पूजेमध्ये नक्की वापरले जाते. याशिवाय गृह प्रवेशाच्यावेळी दरवाजाच्या दोन्ही बाजूला केळीची रोपे लावणे खूप शुभ मानले जाते. बरेच लोक इतर दिवसातही सुख-समृद्धीचे प्रतीक म्हणून घराच्या मुख्य दारावर केळीचे रोप लावतात. केळी हे विष्णू देवतेचे प्रतीक मानले जात असल्याने पूजेत त्याला धार्मिक महत्त्व आले आहे. (Marathi Top News)
विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा का केली जाते?
विवाह पंचमीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते कारण केळीचे झाड हे भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यात समृद्धी आणि शुभतेचे वास आहे. या पूजेमुळे वैवाहिक जीवनात आनंद, समृद्धी येते आणि लग्नातील अडथळे दूर होतात असे मानले जाते. या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि बृहस्पती प्रसन्न होतात, ज्यामुळे गुरु ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात आणि विवाहिक संबंधात येणाऱ्या अडचणी कमी होतात. आणि घरात सुख-समृद्धी नांदते. केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात असे मानले जाते. (Latest Marathi Headline)
विवाह पंचमीला केळीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा केल्याने गुरु ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात. देवतांचा गुरु बृहस्पती हा विवाह, संतती, धर्म यासारख्या बाबींसाठी महत्त्वाचा मानला गेला आहे. ज्या लोकांच्या लग्नात अडथळे येत आहेत किंवा त्यांचे वैवाहिक जीवन चांगले जात नाही त्यांनी विवाह पंचमीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने जोडीदारासोबतचे नाते मधुर होते आणि गुरुच्या नकारात्मक प्रभावापासूनही मुक्ती मिळते. (Top Trending News)
==========
==========
केळीच्या झाडाची पूजा करण्याचा विधी
विवाह पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. केळीच्या झाडाभोवती पिवळे वस्त्र गुंडाळा किंवा पिवळे धागे बांधा, ज्यामुळे वैवाहिक सुसंवाद आणि समृद्धी येईल. धूप आणि तुपाचा दिवा लावावा आणि श्रीरामाच्या मंत्राचा जप करावा. श्रीराम हे भगवान विष्णूंचे रूप आहे म्हणून केळीच्या झाडाची पूजा करताना लक्ष्मीनारायणाचे ध्यान करावे. ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा १०८ वेळा किंवा शक्य असल्यास जास्त वेळा जप करावा. यानंतर अक्षदा, पंचामृत, सुपारी, दिवा अशा वस्तू अर्पण करावे. यानंतर केळीच्या झाडाची २१ वेळा प्रदक्षिणा माराव्या. भगवान श्रीराम आणि माता सीता यांचे स्मरण करा आणि त्यांचे आशीर्वाद मागून प्रार्थना करा. या पूजेमुळे वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी येते. (Social News)
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
