आपण वर्षभरात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक खास दिवस अर्थात डे मोठ्या जल्लोषात साजरे करत असतो. याच डे मधील एक महत्त्वाचा डे म्हणजे ‘जागतिक पुरुष दिन’. आता जागतिक पुरुष दिनाबद्दल खूपच कमी लोकांना माहिती असेल. अनेकांना तर असाही एक दिवस असतो हे ऐकूनच हसायला आले असेल. मात्र आपण किती नाकारले तरीही समाजातील पुरुषाचे स्थान खूपच महत्त्वाचे आहे. आपला देश तर कायम पुरुषप्रधान संस्कृती जपणारा आणि मानणाराच आहे. पुरुष हा प्रत्येक घराचा पाया आहे. जर घराचा पाया पक्का असेल तर त्यावर तुम्ही कितीही उंच इमारत उभी केली तरी ती डगमगणार नाही. पुरुष देखील असाच आहे. (Men’s Day)
पुरुषाचाच जीवावर आपण आपली अनेक महागडी स्वप्न पूर्ण करत असतो, मात्र तो कधीच काहीही बोल्ट नाही. स्वतःची हौस, इच्छा, आकांशा मारून केवळ आपल्या कुटुंबासाठी जगतो. असा हा पुरुष कायम मागेच राहतो. आजही आपल्याला कोणी विचारले की, महिला दिन कधी असतो आपण सर्व पटकन बोलू ८ मार्च. मात्र पुरुष दिनाबद्दल आजही भरपूर लोकं अनभिज्ञ आहेत. यासाठीच जागतिक पुरुष दिन साजरा केला जातो. कायम महिलांच्या हक्क आणि कर्तव्यांबद्दल बोलले जाते, सांगितले जाते. (Marathi)
मात्र पुरुषांसाठी देखील अनेक हक्क आणि कर्तव्य आहेत, ज्याची चुकूनही कोणी वाच्यता करत नाही. बरीच ठिकाणी महिलांप्रमाणे पुरुषांवर देखील अत्याचार होतात. पुरुष देखील अन्याय सहन करतात. शोषण, पक्षपात, हिंसा, असमानता याची झळ पुरुषांनाही बसते. पुरुषांचं मानसिक आरोग्य, पुरुषत्वाच्या सकारात्मक गुणांचं कौतुक, समाजातील आदर्श पुरुषांना मुख्य प्रवाहात आणणं आणि लैंगिक समानता हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. दरवर्षी १९ नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन साजरा केला जातो. (Top Marathi HEadline)

जगभरातील ६० पेक्षा जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. १९९९ मध्ये पहिला पुरुष दिन साजा करण्यात आला. भारतात त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजेच १९ नोव्हेंबर २००७ रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा पाया १९९९ मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे रचला गेला. वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम टीलकसिंग यांनी जगभरातील सकारात्मक पुरुष आदर्शांना प्रेरणा देण्यासाठी हा दिवस प्रस्थापित केला. डॉ. टीलकसिंग यांनी १९ नोव्हेंबर हा दिवस निवडला कारण तो त्यांच्या वडिलांचा वाढदिवस होता. (Latest Marathi News)
यंदा अर्थात २०२५ च्या जागतिक पुरुष दिनाची थीम ही “Celebrating Men and Boys” म्हणजेच पुरुष आणि मुलांचा गौरव”. ही थीम जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पुरुष आणि मुलांनी निभावलेल्या सकारात्मक भूमिकांना अधोरेखित करते. पुरुषांच्या मानसिक आरोग्याचे महत्त्व, बालकांमधील भावनिक शिक्षण, कुटुंबासाठी आणि समाजासाठी केलेली भूमिका, या सर्व बाबींवर अधिक जागरूकता निर्माण करण्यावर भर आहे. या थीमचे उद्दिष्ट एकच आहे, आणि ते म्हणजे, पुरुष आणि मुलांबद्दल कृतज्ञता, समज आणि संवेदनशीलता वाढवणे. आजच्या बदलत्या काळात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन पुरुषांनी समाजाला दिलेल्या योगदानाची दखल घेतो आणि त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकतो. (Marathi News)
पुरुषांनाही अनेक प्रकारचे संघर्ष आणि आव्हानांना सामोरे जावे लागते, याची आठवण हा दिवस करून देतो. या दिवशी आपण केवळ पुरुषांच्या आरोग्यावर चर्चा करत नाही, तर पुरुषांना भेडसावणारा भेदभाव आणि विषमतेचे मुद्देही मांडतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश असा समाज निर्माण करणे आहे जिथे सर्वांना समान अधिकार आणि संधी मिळतील. (Top Marathi News)

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनी समाजात पुरुषांच्या कल्याणासाठी आणि आरोग्याबाबत जागरुकता निर्माण केली जाते. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा सहा स्तंभांवर आधारित आहे, जे समाजातील पुरुषांची सकारात्मक प्रतिमा प्रतिबिंबित करतात. हा दिवस समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि पर्यावरणात पुरुषांचे योगदान साजरे करण्यावर भर देतो. या दिवशी समाजात पुरुषांविरुद्ध होत असलेल्या भेदभावावरही प्रकाश टाकला जातो. देशात बऱ्याच ठिकाणी आंतरराष्ट्रिय पुरुष दिन साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रम उभारले जातात. या कार्यक्रमात पुरुषांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर चर्चा केली जाते. (Latest Marathi Headline)
पुरुषांच्या विकासावर तसेच त्यांना होत असलेल्या त्रासावर चर्चा केली जाते. त्याचे समाधान शोधले जाते. आत्महत्या, कामाचा ताण, आणि सामाजिक अपेक्षांशी संबंधित दबाव यावर चर्चा केली जाते. पुरुषांचे सामाजिक योगदान यावर चर्चा केली जाते, तसेच कौटुंबिक योगदान यावर भाष्य केले जाते. तसेच पुरुष आणि महिलांमध्ये समतोल साधणे आणि समाजात सकारात्मक संवादाला प्रोत्साहन देणे, हे या कार्यक्रमांचे मुख्य उद्दिष्टे असते. यासोबतच पुरुष आदर्शांना प्रोत्साहन देणे. समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि पर्यावरणात पुरुषांचे सकारात्मक योगदान साजरे करणे. पुरुषांचे आरोग्य आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करणे. पुरुषांना सामाजिक, भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिकरित्या मदत करणे. अधिक सुरक्षित, चांगले आणि अधिक संतुलित जग निर्माण करण्यासाठी कार्य करणे. (Top Trending News)
========
Maharashtra Election : ‘पिपाणी’मुळे ‘तुतारी’चे पुन्हा बारा वाजता वाजता राहिले!
========
परदेशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस विविध पद्धतीने साजरा केला जातो. भारतात मधल्या काही काळापासूनच या दिवसाला सोशल मीडियामुळे प्रसिद्धी मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करताना आपल्या घरातील पुरुष सदस्यांना ते खास असल्याची जाणीव करुन द्या. त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवा, गिफ्ट द्या किंवा छान मेसेज असलेलं कार्ड देऊनही तुम्ही हा दिवस साजरा करु शकता. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
