लवकरच कार्तिक महिना संपून मार्गशीर्ष महिना सुरु होणार आहे. मार्गशीर्ष हा मराठी दिनदर्शिकेतील नववा महिना. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. आता मार्गशीर्ष महिना म्हटले की चंपाषष्ठी, मार्गशीर्ष गुरुवार आणि दत्त जयंती हे महत्त्वाचे सण. चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण २७ नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हां जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात. या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर मार्गशीर्षातल्या गुरुवारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची जुनी परंपरा आहे. (Marathi)
मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना आहे आणि तो भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की “मासानां मार्गशीर्षोहं” याचा अर्थ “महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे” असा होतो. या महिन्यात केलेल्या पूजा, व्रत, जप, दानधर्म आणि भक्तीला विशेष महत्त्व आहे आणि यामुळे श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. प्राचीन धार्मिक ग्रंथांनुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो. या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असल्याचे सांगितले जाते. त्यामुळं या महिन्यात विविध प्रकारच्या पूजा आणि शुभ कार्य केल्याने ते अधिक फलदायी ठरतात. अनेकजण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात. (Margashirsha Guruvar)
मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्व मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते असे मानतात. मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जातो. असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानं भक्तांना लक्ष्मी-नारायणाची कृपा प्राप्त होते. देवी लक्ष्मीच्या कृपेनं सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. (Todays Marathi Headline)

लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात. त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करुन कुटुंबात समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते. (Top Marathi Headline)
गुरुवार २० नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावस्या असणार आहे. यानंतर शुक्रवार २१ नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होईल. हा महिना धार्मिक पूजापाठ आणि विधींसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी देवी महालक्ष्मीचे व्रत करण्याची पद्धत आहे. यंदा मार्गशीर्षमध्ये एकूण ४ गुरुवार येतील. पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा २७ नोव्हेंबरला असणार आहे. यंदा २०२५ मध्ये मार्गशीर्ष महिना २१ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा २७ नोव्हेंबरला आहे तर या दिवशी व्रत सुरु करावे. (Latest Marathi Headline)
मार्गशीर्ष गुरुवार २०२५
पहिला मार्गशीर्ष गुरुवार : २७ नोव्हेंबर
दुसरा मार्गशीर्ष गुरुवार : ४ डिसेंबर
तिसरा मार्गशीर्ष गुरुवार : ११ डिसेंबर
चवथा मार्गशीर्ष गुरुवार : १८ डिसेंबर
मार्गशीर्ष महिन्यात विवाहित महिला देवी महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करतात. मार्गशीर्ष महिन्यात जितके गुरुवार येतील त्या गुरुवारी व्रत करून देवी महालक्ष्मीची चौरंगावर पूजा मांडली जाते. त्यानंतर व्रताची कथा वाचून आरती करतात व देवीला खिरीचा नैवेद्य दाखवून व्रत सोडतात. शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. ७ सुवासिनी स्त्रियांना घरी बोलावून त्यांना शृंगाराचे सामान महालक्ष्मी व्रताचे कथा पुस्तक व केळी ओटीत घालून त्यांना नमस्कार केला जातो. तसेच या सुवासिनींना जेवू घातले जाते त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत पूर्ण होतात. (Top Trending News)
==========
Champashashti : मल्हार मार्तंडाचे नवरात्र आणि चंपाषष्ठीचे महत्त्व
==========
या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीच्या कृपेसाठी हे व्रत महत्त्वाचे मानले जाते. या महिन्यातील गुरुवारी घरात महालक्ष्मीचे प्रतीक म्हणून घटस्थापना केली जाते आणि घटाला महालक्ष्मीच्या रूपात सजवले जाते. महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने लक्ष्मी-नारायणाची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येते. लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात. त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनं मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. (Social News)
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
