Home » Diwali : धनत्रयोदशीला कुबेर पूजन करण्यामागे आहे खास कारण

Diwali : धनत्रयोदशीला कुबेर पूजन करण्यामागे आहे खास कारण

by Jyotsna Kulkarni
0 comment
Diwali
Share

यावर्षी १८ ऑक्टोबर शनिवारी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान कुबेरांची पूजा केली जाते आणि सोने, चांदी इत्यादी वस्तू खरेदी केल्या जातात. लक्ष्मी आणि धन्वंतरी यांच्या पूजनासोबतच कुबेर पूजनाला देखील मोठे महत्व आहे. लक्ष्मी आणि धन्वंतरी यांच्याबद्दल बऱ्यापैकी लोकांना माहित आहे. मात्र कुबेर हे भरपूर श्रीमंत देव आहे, एवढीच माहिती कुबेर यांच्याबद्दल लोकांना आहे. (Diwali 2025)

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला धनत्रयोदशीच्या निमित्ताने कुबेर देवाची पूजा धनत्रयोदशीला का केली जाते, हे सांगणार आहोत. भगवान कुबेर हे संपत्ती, वैभव आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. भगवान कुबेर यांना ‘यक्षांचा राजा’ आणि ‘देवांचा खजिना’ म्हणूनही ओळखले जाते. यामुळेच दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबत कुबेर यांची पूजा केली जाते. (Kuber Puja)

कुबेर यांच्याबद्दल काही आख्यायिका प्रसिद्ध आहेत, त्यापैकी एका आख्ययिकेनुसार भगवान कुबेर हे आधी चोर होते. पण मग असे काय झाले की ते थेट चोरावरून सर्वच संपत्तीचे राखणदार बनले? चला जाणून घेऊया. हिंदू धर्मातील महत्त्वाच्या अशा स्कंदपुराणानुसार, कुबेर देवाचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला आणि त्यांचे नाव गुणनिधी होते. पण त्याच्यात एक दोष होता तो म्हणजे चोरी करणे. ही बाब वडिल महर्षी विश्रव यांना कळताच त्यांनी गुणनिधी यांना घराबाहेर हाकलून दिले. घरातून काढल्यामुळे भटकत असताना त्याला एक शिवमंदिर दिसले आणि त्याने मंदिरातील प्रसाद चोरण्याचा प्रयत्न केला. बाजूला झोपलेल्या पूजाऱ्याला हे कळू नये यासाठी गुणनिधीने दिव्याचा प्रकाश कपडाने झाकला. जेणे करुन प्रकाशामुळे आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून. तरी देखील पूजाऱ्याने त्याला चोरी करताना पकडले आणि हाणामारीत गुणनिधीचा मृत्यू झाला. (Dhantrayodashi)

========

Dhanteras : धनतेरसला पुजल्या जाणाऱ्या कुबेर देवाची रंजक माहिती

========

Diwali

मृत्यूनंतर यमदूत गुणनिधीला घेऊन जात असताना पलिकडून भगवान शिवाचे दूतही येत होते. भगवान शिवाच्या दूतांनी गुणनिधीला ओळखत त्याला महादेवासमोर हजर केले. चोरी करताना गुणनिधींनी कापड पसरवून मंदिरात जळणारा दिवा विझण्यापासून वाचवला असे भोलेनाथांना वाटले. यावर प्रसन्न होऊन भगवान शिवाने गुणनिधींना कुबेर ही पदवी देत देवांच्या संपत्तीचा खजिनदार होण्याचा आशीर्वादही दिला. तेव्हापासून गुणनिधी धन कुबेर म्हणून ओळखले जाऊ लागले. (Top Marathi Stories)

पुढील जन्मात कुबेरांनी माता लक्ष्मी, ब्रह्मा आणि शिवशंकर यांची कठीण तपश्चर्या केली. कुबेरांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन लक्ष्मीजींनी त्यांना अपार संपत्ती दिली आणि लक्ष्मीजींच्या विनंतीवरून ब्रह्माजींनी हा खजिना त्यांच्याकडे सोपवला आणि त्याच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर दिली. तर शिवशंकरांनी त्यांना पूर्वजन्मात धनाची कमतरता भासू नये म्हणून वरदान दिले होते. अशाप्रकारे देवी-देवतांच्या कृपेने कुबेर धनाची देवता बनले. संपत्तीचा देव कुबेर हा शिवाचा द्वारपाल देखील मानला जातो. (Marathi News)

कुबेराचा विवाह सूर्याची कन्या भद्रा हिच्याशी झाला होता. कुबेरांना नलकुबेर आणि मणिग्रीव असे दोन पुत्र होते. कुबेर यांना मीनाक्षी नावाची मुलगी देखील होती. अनेक पौराणिक कथांमध्ये, नलकुबेरने अप्सरे रंभाशी लग्न देखील केले. कुबेर हा यक्षांचा राजा होता आणि तो त्याच्या समृद्धी आणि संपत्तीसाठी ओळखला जातो. असे मानले जाते की कुबेर मंदिरांमध्ये पुरलेल्या खजिन्याचे रक्षण करतात. जेव्हा केव्हा कुठेतरी पुरातन खजिना गाडलेला आढळतो तेव्हा कुबेराचे साथीदार सापांच्या रूपात खजिन्याचे रक्षण करतात. (Top Marathi Headline)

धनत्रयोदशीला सोने, चांदी, वाहने, घर आणि मौल्यवान वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की धनत्रयोदशीला लक्ष्मीसोबत कुबेरजींचीही पूजा केली जाते. कुबेर हा संपत्तीचा रक्षक मानला जातो, म्हणून धन कुबेराची पूजा एखाद्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी केली जाते. विशेषतः कुबेरजींना सोन्याचे रक्षक मानले जाते. (Latest Marathi News)

कुबेर किन्नरांचा अधिपती, दिक्पाल म्हणजे उत्तर दिशेचा रक्षक, मंदिराच्या संपत्तीचा रक्षक आणि अक्षय निधीचा स्वामी आहे. कुबेर हे यक्ष आहेत, देव नाही. यक्ष संपत्तीचा उपभोग घेऊ शकत नाही. त्याचे रक्षण करतात. भगवान महादेवांनी कुबेर यांना उत्तर दिशेचा स्वामी बनवले आहे. म्हणजेच ते दिक्पाल आहेत. त्यामुळे जुन्या मंदिरांमध्ये यक्षाच्या मूर्ती बाहेरील बाजूस चारही दिशांना बनवल्या गेल्या आहेत. ते मंदिरांच्या संपत्तीचे संरक्षक म्हणून काम करतात. ते ९ निधींचेही स्वामी आहेत. म्हणूनच ब्रह्मदेवाने त्यांना अक्षय निधीचा स्वामी बनवले आहे. (Todays marathi Headline)

भगवान कुबेर यांना संपत्तीची देवता म्हटले जाते. देवी लक्ष्मीसोबत कुबेराची पूजा केल्यास आयुष्यभर कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. कुबेर मंत्राचा जप केल्याने अपार धन आणि ऐश्वर्य प्राप्त होते. जाणकारांच्या मते, कुबेर मंत्राचा जप केल्याने भगवान कुबेराची कृपा प्राप्त होते. यामुळे कुटुंबात धन, समृद्धी आणि सुखाचा वास राहील. (Marathi Trending Headline)

Diwali

अष्टलक्ष्मी कुबेर मंत्र जप पद्धत – सकाळी आंघोळ करून चौरंगावर महालक्ष्मी आणि श्री कुबेर यांच्या मूर्तीची स्थापना करावी. यानंतर तुपाचा दिवा, धूप आणि अगरबत्ती लावावी. मूर्तीला फुले अर्पण करून लाल कुंकवाचा टिळा लावावा. यानंतर उजव्या हातात १०८ मण्यांची जपमाळ घेऊन नामजप सुरू करावा. खालील मंत्राचा जप करावा. ‘ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥’ कुबेर देवाचा अजून एक मंत्र आहे, जपतामुं महामन्त्रं होमकार्यो दिने दिने| दशसंख्य: कुबेरस्य मनुनेध्मैर्वटोद्भवै|| या मंत्राचा जप केल्यानंतर सर्व संकटे दूर करण्यासाठी हात जोडून देवाला प्रार्थना करा. कुटुंबाची आर्थिक उन्नती करा, अशी मनोभावे मागणी करा. यानंतर कुटुंबासह देवी लक्ष्मी आणि श्री कुबेर यांची आरती करावी. शेवटी त्यांना नमस्कार करावा. (Top Stories)

कुबेर देवाची आरती
ॐ जय यक्ष कुबेर हरे, (Marathi Top Headline)
स्वामी जय यक्ष जय यक्ष कुबेर हरे।
शरण पड़े भगतों के,
भण्डार कुबेर भरे।
॥ ॐ जय यक्ष कुबेर हरे…॥
शिव भक्तों में भक्त कुबेर बडे,
स्वामी भक्त कुबेर बडे।
दैत्य दानव मानव से,
कई-कई युद्ध लड़े ॥
॥ ॐ जय यक्ष कुबेर हरे…॥
स्वर्ण सिंहासन बैठे,
सिर पर छत्र फिरे,
स्वामी सिर पर छत्र फिरे।
योगिनी मंगल गावैं,
सब जय जय कार करैं॥
॥ ॐ जय यक्ष कुबेर हरे…॥ (Latest Marathi Headline)

========

Dhanteras : जाणून घ्या धनत्रयोदशी या सणाचे महत्व

Gajalakshmi : घरात गजलक्ष्मीची पूजा केल्याने होतात ‘हे’ लाभ

========
गदा त्रिशूल हाथ में, (Top Trending News)
शस्त्र बहुत धरे,
स्वामी शस्त्र बहुत धरे।
दुख भय संकट मोचन,
धनुष टंकार करे॥
॥ ॐ जय यक्ष कुबेर हरे…॥
भांति भांति के व्यंजन बहुत बने,
स्वामी व्यंजन बहुत बने।
मोहन भोग लगावैं,
साथ में उडद चने॥
॥ ॐ जय यक्ष कुबेर हरे…॥
यक्ष कुबेरजी की आरती,
जो कोई नर गावे,
स्वामी जो कोई नर गावे ।
कहत प्रेमपाल स्वामी,
मनवांछित फल पावे।
॥ ॐ जय यक्ष कुबेर हरे…॥ (Social News)

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.