Home » Dussehra : दसऱ्याला केल्या जाणाऱ्या सरस्वती पूजनाचे महत्त्व

Dussehra : दसऱ्याला केल्या जाणाऱ्या सरस्वती पूजनाचे महत्त्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dussehra
Share

दसऱ्याचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. दसरा म्हणजे नवरात्राची समाप्ती. दसऱ्यालाच विजयादशमी या नावाने देखील ओळखले जाते. याचे कारण म्हणजे याच दिवशी रामाने रावणाचा वध केला आणि सीता मातेला पुन्हा मिळवले. तर आदिशक्ती देवी दुर्गाने महिषासुर राक्षसाचा वध करत संपूर्ण सृष्टीला त्याच्या क्रूरतेपासून वाचवले होते. दसऱ्याला असलेले महत्व सर्वानाच ज्ञात आहे. या दिवशी असत्याचा सत्यावर आणि वाईटाचा चांगल्यावर विजय साजरा केला जातो. असा हा दसरा साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. (Dussehra)

दसऱ्याच्या दिवशी अनेक प्रकारच्या पूजा केल्या जातात. शस्त्र पूजा, शमी पूजा आदी पूजा करतात. या सोबतच या दसऱ्याला अजून एक पूजा केली जाते आणि ती म्हणजे सरस्वतीची. दसऱ्याला सरस्वती पूजनाला मोठे महत्व आहे. या दिवशी घरांमध्ये सरस्वतीचे पूजन करून उत्तम बुद्धिसाठी प्रार्थना केली जाते. मग या सरस्वती पूजनामागचा इतिहास आणि याचे महत्व आज आपण जाणून घेऊया. सरस्वती पूजन हे वसंत पंचमी आणि विजयादशमी या दोन दिवशी केले जाते. उत्तर भारतात सरस्वती पूजन वसंत पंचमीच्या दिवशी करतात तर महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन केले जाते. (Marathi News)

दसऱ्याला सरस्वती पूजन हे महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर केले जाते. तसे पाहिले तर सरस्वती ही विद्येची देवता आहे. तिचे पूजन केल्याने अनेक लाभ होतात. सरस्वती, विद्या, बुद्धी, कला आणि सृजनशक्तीची देवी, यांची पूजा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केली जाते. सरस्वती पूजनामुळे विद्यार्थ्यांना अनेक लाभ होतात. दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन केल्याने विद्यार्थ्यांना उत्तम बुद्धी प्राप्त होते. सोबतच शिक्षणात यश मिळते. सरस्वती पूजनामुळे जीवनातील अज्ञानरूपी अंधाराचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो. या दिवशी लहान मुलांकडून सरस्वती देवीचे पूजन करून घेतले जाते. शिवाय या शुभ दिवशी अक्षरारंभ देखील करण्याची प्रथा आहे. (Todays Marathi Headline)

Dussehra

सरस्वती पूजनासाठी आधी पाटीवर किंवा वहीवर सरस्वतीचे चित्र काढावे किंवा येत नसल्यास त्याचा फोटो वापरावा. पाटावर आपली सर्व पुस्तकं मांडावी. पाटाला रांगोळी काढावी. दिवा लावावा. सरस्वतीला आणि पुस्तकांना हळद कुंकू आणि अक्षता वाहाव्या. सरस्वती मातेला पांढरी फुलं वाहावी. त्यांनतर दिवा ओवाळावे आणि अगरबत्ती ओवाळावी. सरतेशेवटी नैवेद्य दाखवून चांगल्या बुद्धिसाठी आणि उत्तम ज्ञानसाठी प्रार्थना करावी. पुढील मंत्रांचा या पूजनादरम्यान जप करावा. (Marathi Trending Headline)

सरस्वती पूजन मंत्र – “या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता | या वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता | सामां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥”
सरस्वती गायत्री मंत्र:- “ॐ ऐं वाग्देव्यै विद्महे कामराजाय धीमहि। तन्नो देवी प्रचोदयात्॥”।
महासरस्वती मंत्र: – “ॐ ऐं ह्रीं क्लीं महासरस्वती देव्यै नमः”।
सरस्वती मूल मंत्र: – “ॐ ऐं सरस्वत्यै ऐं नमः” किंवा “ॐ सरस्वत्यै नमः”।
सरस्वती ध्यान मंत्र: – “ॐ सरस्वती मया दृष्ट्वा, वीणा पुस्तक धारणीम्। हंस वाहिनी समायुक्ता मां विद्या दान करोतु मे ॐ।”।
विद्या मंत्र: – “सरस्वति महाभागे विद्ये कमललोचने। विद्यारूपे विशालाक्षि विद्यां देहि नमोऽस्तु ते॥”। (Latest Marathi Headline)

दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी शमीच्या झाडाचे देखील पूजन करण्याची पद्धत आहे. खासकरून क्षत्रिय समाजात या पूजेला जास्त महत्त्व आहे. शमीच्या झाडाचा थेट संबंध पांडवांशी जोडण्यात आला आहे. महाभारताच्या युद्धात पांडवांनी आपली शस्त्रे याच शमीच्या झाडावर लपवली होती अशी पौराणिक कथा आहे. शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्याने कुटुंबात सुख-शांती येते. (Top Marathi News)

शमीच्या झाडाशी संबंधित एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. महर्षी वर्तंतू यांचे शिष्य कौत्स होते. महर्षींनी आपली शिक्षा पूर्ण झाल्यावर शिष्य कौत्स यांच्याकडे गुरुदक्षिणा म्हणून चौदा कोटी सोन्याची नाणी मागितली होती. महर्षींना गुरुदक्षिणा देण्यासाठी कौत्स महाराज रघु यांच्याकडे गेले. त्यांनी महाराजांकडे सोन्याची नाणी मागितली. त्यावेळी राजाचा खजिना रिकामा होता. म्हणून राजाने कौत्स यांना तीन दिवसांचा वेळ मागितला. राजा धन जमा करण्यासाठी उपाय शोधू लागले. राजाने कुबेराकडे मदत मागितली, पण कुबेराने मदत करण्यास नकार दिला. (Top Trending News)

=========

Dussehra : वाईटचे प्रतीक असणाऱ्या रावणामध्ये देखील होते ‘हे’ सद्गुण

Dussehra : दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते?

=========

त्यानंतर राजा रघूंनी स्वर्गलोकावर आक्रमण करून धन मिळवण्याचा निर्णय घेतला. राजाच्या या विचाराने देवराज इंद्र घाबरले. त्यांनी कोषाध्यक्ष कुबेराला राजा रघुच्या राज्यात सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पाडण्याचा आदेश दिला. इंद्राच्या आदेशानुसार, कुबेराने राजा रघुच्या राज्यात शमीच्या झाडाची पाने सोन्यात बदलली. ज्या दिवशी सोन्याचा पाऊस पडला तो दिवस विजयादशमीचा होता असे मानले जाते. या घटनेनंतर विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.