नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस म्हणून दसऱ्याला ओळखले जाते. यंदा दसरा २ ऑक्टोबर, गुरुवार रोजी साजरी केला जाणार आहे. दसरा म्हणजे साडे तीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. यासाठीच या दिवशी अनेक शुभ आणि मोठे कामं करण्याला प्राधान्य दिले जाते. दसर्याला धन, ज्ञान यांची पूजा केली जाते. धनाचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याच्या पानांचे पूजन केले जाते तर ज्ञान म्हणून पाटी-पुस्तके अर्थात् सरस्वतीदेवी आणि शस्त्रास्त्रे यांचे पूजन करण्यात येते. नवरात्रोत्सवात बसवलेल्या देवीच्या मूर्ती आणि घट यांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. (Marathi)
दसऱ्याला देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला तसेच याच दिवशी रामाने रावणाचा वध केला. म्हणूनच दसऱ्याला अनेक ठिकाणी रावण दहन करण्याची देखील मोठी परंपरा आहे. अनेक ठिकाणी दसऱ्याला परंपरागत चालत आलेले कुलाचार केले जातात. सीमोल्लंघन केले जाते. यासोबतच दसऱ्याच्या अजून एक महत्वाची परंपरा म्हणजे आपट्याच्या पानांचे वाटप करणे. दसर्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून आहे.(Navratri)
दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा करायची असतात. (Dssehra)
महाभारतानुसार अर्जुनाने आपल्या अज्ञातवासात शमी वृक्षाच्या पाठीमागे आपली शस्त्रे लपवून ठेवली होती. विजयादशमीच्या दिवशी त्यांनी ही शस्त्रे काढून विराट युद्धात विजय मिळवला. त्यामुळे शमी वृक्षाला खूप महत्त्व प्राप्त झाले. शमी वृक्षाला देवीचे स्वरूप मानले जाते. या वृक्षाची पूजा केल्याने देवी प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात असे मानले जाते. महाभारतानुसार अर्जुनाने आपल्या अज्ञातवासात शमी वृक्षाच्या पाठीमागे आपली शस्त्रे लपवून ठेवली होती. (Marathi News)
विजयादशमीच्या दिवशी त्यांनी ही शस्त्रे काढून विराट युद्धात विजय मिळवला. त्यामुळे शमी वृक्षाला खूप महत्त्व प्राप्त झाले. या पानांची देवाणघेवाण केल्याने घरात समृद्धी येते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात असा विश्वास आहे. दसऱ्याच्या दिवशी पान देणे आणि घेणे ही फक्त पारंपरिक प्रथा नाही, तर सौभाग्य, नातेसंबंध आणि समृद्धी टिकवण्याचा संदेश देखील देते.
आपट्याची पूजा करताना पुढील मंत्र म्हणतात –
अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।। (Todays Marathi Headline)
दसर्याला आपट्याची पानचं सोनं म्हणून का लुटतात ?
दसऱ्याच्या दिवशी मात्र सोन्याचे महत्त्व असणाऱ्या आपट्याच्या पानाची एक दंतकथा आहे. ही दंतकथा रघुवंशाचा आद्य रघुराजा राज्य करत असतानाच्या काळातील आहे. कौत्स नावाचा एक ब्राह्मण होता. कोत्स हा वरतंतु ऋषींचा शिष्य होता. कोत्साला आपल्या गुरुला दक्षिणा द्यायची होती. शिष्याच्या प्रगतीवरच समाधानी असणाऱ्या वरतंतु ऋषींनी प्रथम गुरुदक्षिणा घेण्यास नकार दिला, पण शिष्याच्या आग्रहाखातर अखेरीस त्यांनी सांगितले की, मला एकाच स्रोताकडून मिळालेल्या १४ कोटी सुवर्णमुद्रा अर्पण कर. (Marathi Headline)
कौत्स हा गरीब होता. त्याला गुरुंना गुरुदक्षिणा कशी द्यावी हे समजत नव्हते. अखेर त्याने रघुराजाकडे जाऊन मदत मागितली. पण, रघुराजाने त्याची सर्व संपत्ती यज्ञात दान केल्याने त्याला कौत्साची मदत करता येत नव्हती. पण, दारी आलेल्या याचकाला रिकाम्या हाती पाठवणे रघुराजाच्या मनाला पटत नव्हते. म्हणून त्याने ठरवले की, कुबेरावर हल्ला करून त्याची संपत्ती मिळवायची आणि कोत्साला दान करायची. कुबेराला हे समजताच त्याने राजाला निरोप पाठवला की, “तो स्वखुशीनेच त्याची मागणी मान्य करेल आणि कोत्साला सुवर्णमुद्रा मिळतील.” (Top Marathi Headline)
विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. कोत्साने गुरुदेवांना हव्या होत्या तितक्याच १४ कोटी मुद्रा घेतल्या आणि गुरुदक्षिणा म्हणून दिल्या. उरलेल्या सुवर्णमुद्रा पानासह तोडून सर्वांना वाटल्या. ज्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव झाला ते झाड होते आपट्याचे. या प्रसंगापासून सोन्याचं पावित्र्य त्या आपट्याच्या पानांना लाभलं म्हणून या पानांना हिरण्यगर्भा असेही म्हणतात. तेव्हापासून आपट्याचे पान सोनं म्हणून लुटण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. (Top Trending News)
=======
Durga Puja : सप्तमीपासून सुरु होणाऱ्या दुर्गा पूजेची संपूर्ण माहिती
Uttar Pradesh : या मंदिरात होते, देवीच्या पाळण्याची पूजा !
=======
आपट्याच्या पानांचे महत्त्व
आपट्याला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा आहे. दसर्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात. (Latest Marathi News)
जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान-प्रदान होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते ते आवश्यक तत्त्व जिवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसर्याच्या दिवशी वायूमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानांतून तेजतत्त्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा, असे सांगितले जाते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics