Home » या हॉटेलचा पाचवा मजलाच गायब आहे

या हॉटेलचा पाचवा मजलाच गायब आहे

by Correspondent
0 comment
Share

जगभरात अनेक असे रहस्य आहे जे आज पर्यंत कोणीच सोडवू शकले नाही. असे नाही आहे की या गुंतीला कोणी सोडवण्याचे प्रयत्न केले नाही आहे. अनेकांनी आपले नशिब या बाबत आजमावले आहे, मात्र वैज्ञानिक आणि शोधकर्त्यांनी जितक्या वेळा या मध्ये हात घातला आणि सोडवण्याचा प्रयत्न केला तितक्या वेळा तो कोडाने लोकांना गोंधळात टाकून दिले. आज आपण जाणून घेऊया उत्तर कोरियातील अश्याच एका हॉटेल संदर्भात.

उत्तर कोरिया मध्ये असेच एक हॉटेल आहे जे आपल्या रहस्यमयी गोष्टींने भरले आहे. उत्तर कोरिया जगभरात आपल्या आगळ्यावेगळ्या गोष्टींसाठी देखील ओळखले जात आहे. जेवढं खतरनाक आणि वेगळा हा देश आणि याचे नियम आहेत तेवढंच वेगळं याचे हे एक हॉटेल आहे.

आपण कुठे फिरायला गेलो तर एखाद्या हॉटेल मध्ये आपण रूम घेतल्यावर संबंधित हॉटेलच्या कोणत्याही मजल्यावर बिंदास फिरू शकतो. मात्र उत्तर कोरियाच्या या हॉटेल मध्ये काही वेगळंच दृश्य पाहायला मिळणार.

उत्तर कोरियातील एका हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर जाण्यास कोणाला हि परवानगी नाही आहे. लोकांचं म्हणणे आहे की या गोष्टीचा मागे एक अत्यंत मोठं रहस्य आहे. आपण ज्या हॉटेल बाबत बोलत आहोत त्या हॉटेलचे नाव आहे यंगाकडो, हे हॉटेल उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे आहे. जे ताएडॉन्ग नदीच्या मधोमध में यांगाक आइलैंड वर आहे. या हॉटेलच्या ४७ मजल्यांवर तब्बल १००० खोल्या आहेत. तसच या हॉटेल मध्ये ४ रेस्टॉरंट, बॉलिंग एले आणि स्पा देखील आहे.

ही हॉटेल बनवायला १९८६ मध्ये सुरुवात झाली आणि तब्बल ६ वर्षांनी १९९२ मध्ये संपूर्णपणे तयार झाली. यंगाकडो हॉटेलच्या लिफ्ट मध्ये देखील ५ व्या मजल्यावर जाण्यासाठीचे बटनच नाही आहे. शक्यतो कोणीच या हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर जाण्याची हिम्मत करत नाही. चुकून एखाद्या वेळेस जर कोणी परदेशी नागरिक गेलाच तर त्याला तुरूंगात पाठवलं जातं.

एका अमेरिकन नागरिकाच्या अनुसार या हॉटेल मध्ये एखाद्या बँकर प्रमाणे लहान लहान खोल्या बनवून ठेवल्या आहेत आणि त्या सर्व खोल्यांना टाळा आहे. या खोल्यांमध्ये अमेरिका आणि जपानच्या विरोधातले काही पैंटिंगस आहे. या व्यतिरिक्त उत्तर कोरियाचे तानाशाह किम जॉन उन च्या वडिलांचे देखील फोटो आहेत. असे म्हंटले जात आहे की तिथे असलेली प्रत्येक पेंटिंगवर असा उल्लेख आहे की अमेरिकेत बनलेली प्रत्येक वस्तू आपला शत्रू आहे आणि आम्ही हजार वेळा याचा मोबदला घेऊच. तर दुसऱ्या बाजूला उत्तर कोरियाच सरकार हॉटेल मध्ये पाचवा मजलाच नाही आहे असा उल्लेख करत आहेत. आता या मध्ये नेमकं खरं काय आहे हे अजून ही अस्पष्ट आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.