Home » Ujjain : पांढ-या हत्तीवर स्वार झालेली माता गजलक्ष्मी !

Ujjain : पांढ-या हत्तीवर स्वार झालेली माता गजलक्ष्मी !

by Team Gajawaja
0 comment
Ujjain
Share

भगवान महाकालची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैनच्या नैपेठ या भागातील लक्ष्मी मातेचे मंदिर येणा-या नवरात्रीसाठी सजवण्यात येत आहे. गजलक्ष्मी माता मंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. नवरात्र आणि दिवाळीमध्ये या माता गजलक्ष्मी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. येथे माता गजलक्ष्मीला दुधानं अभिषेक करण्यात येतो. पांढ-या हत्तीवर, म्हणजेच ऐरावतावर स्वार झालेल्या या माता गजलक्ष्मीचे दर्शन घेणे हे भाग्याचे समजले जाते. (Ujjain)

मातेच्या दर्शनानं सुख, संपत्ती आण ऐश्वर्यात वाढ होते, अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे देवीचे दर्शन घेण्यासाठी भारतभरातून भाविक येतात. दोन हजार वर्ष पुरातन असलेल्या या मंदिराचा इतिहास हा सम्राट विक्रमादित्य यांच्याशी संबंधित आहे. सम्राट विक्रमादित्य हे या माता गजलक्ष्मीची राजलक्मीच्या रुपात पुजा करायचे. स्कंद पुराणातही या मंदिराचे वर्णन आहे. आता याच माता गजलक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. यासाठी मातेचे मंदिर फुलांनी सजवण्यात येत आहे. भगवान महाकालची नगरी असलेल्या उज्जैनच्या प्रत्येक कोप-यावर एक मंदिर आहे. याच उज्जैनच्या मध्यवर्ती सराफा बाजारात माता गजलक्ष्मीचे मंदिर असून या मंदिरातही देवीचे दर्शन घेण्यासाठी भारतभरातून भाविक गर्दी करतात. माता गजलक्ष्मीची मूर्ती दोन हजार वर्षे जुनी असून ती स्फटिकापासून बनलेली आहे. (Social News)

ही मूर्ती सुमारे पाच फूट उंच आहे आणि एकाच दगडावर कोरलेली आहे. ही माता गजलक्ष्मीची मूर्ती पद्मासन मुद्रेत ऐरावत हत्तीवर स्वार आहे. या मूर्तीची आणखी एक वैशिष्टपूर्ण गोष्ट म्हणजे, सम्राट विक्रमादित्यांची माता गजलक्ष्मीवर मोठी श्रद्धा होती. सम्राट विक्रमादित्य राज्याच्या सूख-संपत्ती आणि भरभराटीसाठी देवीची नित्यनियमानं पूजा करीत असत. देवी राजलक्ष्मीच्या रुपात सम्राट या देवीची पूजा करीत असल्याचे दाखले येथील पुजारी अभिमानानं देतात. अतिशय प्राचीन अशा या मंदिराचा महिमा अफाट आहे. गजलक्ष्मी ही माता लक्ष्मीच्या 8 रूपांपैकी एक आहे. येथे एकम ते निर्जला एकादशीला भाविकांची गर्दी असते. सोबतच नवरात्रही येथे मोठ्या उत्सहात साजरी होते. नवरात्रीचे नऊ दिवस मातेची अनेकरुपात पूजा केली जाते. नवरात्रीच्या अष्टमीला येथे मोठा होम आणि भंडा-याचे आयोजन केले जाते. या मंदिरात दस-यालाही भाविक मोठया संख्येनं येतात. येथील दसरा महोत्सव पाहण्यासाठीही दूरवरुन भाविक येतात. (Ujjain)

या सर्वात मंदिरामध्ये फुलांची सुंदर सजावट करण्यात येते. रंगबिरंगी फुलांमध्ये सुवासिक फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यामुळे माता गजलक्ष्मी मंदिर आणि परिसरातील वातावरण सुगंधी होऊन जाते. माता गजलक्ष्मी मंदिरात मातेच्या मोहक मूर्तीसह काळ्या दगडावर बनवलेली विष्णूची दशावताराची एक अद्भुत मूर्ती देखील आहे. या मूर्तीमध्ये भगवान विष्णूच्या 24 अवतारांचे लहान स्वरूपात वर्णन केले आहे. या मंदिरात येणारे भाविक भगवान विष्णूचेही दर्शन घेतात. मातेसह भगवान विष्णूचे दर्शन हा एक सुवर्ण योग मानला जातो. त्यातही माता गजलक्ष्मी पांढ-या हत्तीवर स्वार असल्यानं माता आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद एकत्र मिळत असल्यानं भाविक येथे मोठ्या संख्येनं गर्दी करतात. या मंदिरात दिवाळीला 5 हजार लिटर दुधानं मातेचा अभिषेक केला जातो. (Social News)

========

Navratri :श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेची सुरुवात; जाणून घ्या या प्रथेचे महत्व

========

दिवाळीनिमित्त राज्यभरातून भाविक माता गजलक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात. दिवाळीला मातेचे दर्शन घेतल्यास संपूर्ण वर्ष संपन्नतेचे जाते, अशी धारणा आहे. या मंदिरात माता ज्या ऐरावतावर स्वार झाली आहे, त्याबाबतही एक कथा सांगितली जाते, त्यानुसार माता ज्यावर स्वार झाली आहे, हा पांढरा हत्ती तोच ऐरावत हत्ती आहे जो समुद्र मंथनाच्या वेळी प्रकट झाला होता. त्यामुळे या ऐरतावर स्वार झालेल्या मातेला इच्छापूर्ती माता असेही म्हटले जाते. दिवाळी, दसरा, नवरात्र या सणांमध्ये माता गजलक्ष्मी मंदिर हे भाविकांसाठी 24 तास खुले असते. तसेच मंदिरात अहोरात्र पूजा आणि हवन चालू असते. देशभरातून मंदिरात आलेल्या भाविकांना आशीर्वाद म्हणून पिवळे तांदूळ आणि हळदीचे गोळे देण्यात येतात. पिवळा रंग हा सोन्याचा रंग असल्यामुळे मातेकडून संपन्नता मिळाली, अशी भाविकांची श्रद्धा आहे. (Ujjain)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.