Home » Cricket : कोण आहेत झिम्बाब्वेचे अँडी पायक्रॉफ्ट? ज्यांना पाकिस्तानने हटवण्याची केली होती मागणी

Cricket : कोण आहेत झिम्बाब्वेचे अँडी पायक्रॉफ्ट? ज्यांना पाकिस्तानने हटवण्याची केली होती मागणी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Cricket
Share

सध्या क्रिकेट कमालीचे गाजताना दिसत आहे. एकतर आशिया कप स्पर्धा दुबईमध्ये चालू आहे आणि दुसरे कारण म्हणजे, नुकताच पार पडलेला भारत – पाकिस्तानचा सामना. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खूपच विवादित ठरला. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारतातूनच या सामन्याला मोठा विरोध झाला. हा सामना रद्द करण्याची देखील मोठी मागणी झाली. मात्र हा सामना झाला. या सामन्यादरम्यान देखील मोठा वाद झाला. (Cricket News)

कारण सामन्याच्या वेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आगाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. त्यानंतर, सामना संपल्यानंतर सुद्धा टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळणे आणि टीम थेट ड्रेसिंग रूममध्ये गेली आणि दरवाजा बंद करून घेतला. या सर्व घटनांनंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा पोस्ट मॅच मुलाखतीसाठी देखील आला नाही. आता, पाकिस्तानने या सर्व प्रकरणामध्ये मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांना जबाबदार धरत त्यांना हटवण्याची मागणी केली आहे. (Marathi News)

पाकिस्ताने अँडी पायक्रॉफ्ट यांना आशिया कपमधून बाहेर केले तरच आम्ही खेळू अशी थेट धमकीच आयसीसीला दिली होती. पण आयसीसीने पाकिस्तानच्या या धमकीला उडवून लावले आहे. आयसीसीने अँडी पायक्रॉफ्ट यांना काढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आयसीसीच्या या भूमिकेमुळे पाकिस्तान तोंडावर पडले आहे. आयसीसीने देखील अँडी पायक्रॉफ्ट यांना पाठिंबा दिला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये अँडी पायक्रॉफ्ट यांचे नाव सतत कानावर पडत आहे. त्यांच्या नावाला या घटनेमुळे खूपच प्रसिद्धी मिळाली आहे. नक्की अँडी पायक्रॉफ्ट हे आहेत तरी कोण चला जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

Cricket

अँडी पायक्रॉफ्ट कोण आहे?
६९ वर्षीय अँडी पायक्रॉफ्ट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले आहेत. अँडी प्रायक्रॉफ्ट हे झिम्बाब्वेचे खेळाडू होते, त्यांनी तीन कसोटी आणि २० वनडे सामने खेळले होते. अँडी यांच्या नावावर ४४७ धावा आहेत. १९८३ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी देशाचे नेतृत्व केले होते. अँडी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिेकेटला अलविदा केला आणि त्यानंतर ते आयसीसीमध्ये आले. २००९ पासून ते आयसीसीमध्ये कार्यरत आहेत. (Sports News)

आतापर्यंत आयसीसीचे मॅच रेफरी म्हणून त्यांनी तब्बल १०३ कसोटी, २४८ वनडे, याव्यतिरिक्त, त्यांनी २१ महिला टी-२० सामन्यांमध्येही मॅच रेफ्री म्हणून काम केले आहे. सोबतच १८३ टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सामनाधिकारी म्हणून भूमिका बजावली आहे. त्यामुळे अँडी यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे जर अँडी यांनी एखादी गोष्ट सांगितली असेल तर ती महत्वाची असेल, याची कल्पना आयसीसीला आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई न करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला असावा. (Top Trending News)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने विजय मिळवला असला तरी या विजयापेक्षा सर्वात जास्त चर्चा होते ती भारताने पाकिस्तानी खेळाडूंसोबत न केलेल्या हॅन्डशेकची. या सामन्याचा जेव्हा टॉस झाला तेव्हा, सामना भारताने जिंकल्यानंतर देखील भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानशी हस्तांदोलन करण्याचे टाळले. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा हा भारताच कर्णधार सूर्यकुमार यादवशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करत होता. पण सूर्याने हाताची घडी सोडलीच नाही. सलमान आगाकडे पाहिलेही नाही. या सामन्यापूर्वी अँडी यांनी दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन करायचे नाही, असे सांगितले होते. त्यामुळेच पाकिस्तानने अँडी पायक्रॉफ्ट यांना आशिया कपच्या बाहेर करण्याची मागणी केली होती. पण आयसीसीने पाकिस्तानची मागणी फेटाळली. (Top Stories)

=======

London : लंडनमध्ये स्थलांतरितांचा मुद्दा पेटणार !

George Soros : ट्रम्पची तलवार आता सोरोसच्या दिशेनं !

=======

अँडी पायक्रॉफ्ट हे झिम्बाब्वेचे खेळाडू होते, ज्यांनी १९८३ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले होते. याच वर्ल्ड कपमध्ये भारताचा करो या मरो सामना झाला तो झिम्बाब्वेशी. या सामन्यात भारताने कपिल देव यांच्या १७५ धावांच्या खेळीवर भारताला विजय मिळवला होता. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.