सतत बाहेरच्या खाण्यामुळे, जंक फूड, जेवणातील मैद्याच्या वाढत्या प्रमाणामुळे आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पोटाचे विविध विकार जडताना दिसत आहे. यातलाच एक आजार म्हणजे पोटात गॅस तयार होणे. तरूणांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. पोटात गॅस तयार झाल्याने छातीत जळजळ, डोकंदुखी आणि पुढे बद्धकोष्ठतेची समस्याही निर्माण होते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. (Marathi News)
विषारी घटक साचून राहिल्यामुळे सतत गॅस होणे, उलट्या, अपचन किंवा इतरही समस्या उद्भवू लागतात. पोटात गॅस साचून राहिल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. यामुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते. पावसाळा आणि हिवाळ्याच्या काळात ही समस्या आणखी वाढते. तेलकट, तळलेले, मसालेदार अन्न खाणे, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, खूप कमी पाणी पिणे, राग येणे, काळजी करणे, निष्क्रिय राहणे ही पोटात गॅस निर्माण होण्याची प्रमुख कारणे आहेत. डॉक्टरांकडे जाऊन अनेक औषधं घेऊन देखील जर तुम्हाला फरक पडत नसेल तर तुम्हाला तुमची दिनचर्या बदलावी लागेल. दररोज सकस आहार, व्यायाम, भरपूर पाणी पिणे, जड आणि जंक फूड टाळणे आदी बदल करावे लागतील. यासोबतच तुम्ही गॅसेसपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील करू शकतो ते कोणते पाहूया. (Health Care)
ओवा
तुम्हाला पोटात गॅसची समस्या निर्माण झाली असेल तर भाजलेला ओवा खाणे लाभदायक असते. ओव्याचे सेवन केल्याने गॅसपासून लवकर सुटका मिळते. ओव्यामध्ये थायमॉल नावाचे यौगिक आहे, जे गॅस्ट्रिक रसाचा स्राव करते आणि पचनक्रियेसाठी मदत करते. गॅसची समस्या असेल तर अर्धा चमचा ओवा खावा. (Marathi News)
लसूण
जर तुम्हाला अपचन किंवा गॅसच्या समस्यांचा त्रास होत असेल, तर रोज सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाच्या १-२ पाकळ्या चावून खा. पोटासाठी हा उपाय खूपच फायदेशीर आहे. लसूण आपल्या पचनसंस्थेला सुधारण्यास आणि गॅस कमी करण्यास मदत करतो. (Todays Marathi Headline)
बडीशेप पाणी
रात्री एक ग्लास पाण्यात बडीशेप मिसळा आणि सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्या. या उपायामुळे तुम्हाला काही दिवसातच फरक दिसेल. जर रात्री बडीशेप भिजवायला विसरलात, तर सकाळी बडीशेपचा चहा बनवून प्या. दोन्हीचे सारखेच फायदे मिळतील. हे पचन हार्मोन्सला उत्तेजित करते, ज्यामुळे पोटात पाचक ऍसिड तयार होते आणि पचनक्रिया मजबूत होते, तसेच आतड्यांना आराम मिळतो. (Latest Marathi Headline)
कोरफड ज्यूस
गॅस, बद्धकोष्ठता किंवा ऍसिडिटीचा त्रास असेल, तर काही दिवस कोरफडीचा ज्यूस प्यावा. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी प्या. कोरफड आतड्यातील कोणत्याही प्रकारची जळजळ दूर करेल आणि पाचक रस तयार करण्याची प्रक्रिया वाढवेल. यामुळे तुम्हाला खूप फायदा मिळेल.
ताक
नियमित ताक पिण्याने गॅसची समस्या कमी होते. ताक पिण्याने पोटातील pH पातळी योग्य राहते आणि अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका देऊ शकते. याचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि हातापायाची जळजळही कमी होते हे महत्त्वाचे आहे. (Top Marathi News)
ऍपल सायडर व्हिनेगर
एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा आणि सकाळी लवकर प्या. यामुळे पोटात ऍसिड तयार होण्याची प्रक्रिया कमी होते आणि पचनक्रिया मजबूत होते. (Marathi Latest News)
========
Health : निरोगी आयुष्यासाठी, प्रभावी उपचारपद्धती : पंचकर्म
========
कोमट पाणी प्या
गॅसपासून मुक्त होण्यासाठी कोमट पाणी प्या. हे गॅस पास करण्यास अनुमती देईल आणि आराम देईल. युरोपियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल अँड मेडिकल रिसर्चमधील एका अभ्यासानुसार, नियमितपणे आणि विशेषत: सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्थेला योग्य प्रकारे काम करण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस किंवा इतर कोणत्याही समस्येपासून आराम मिळू शकतो. (Top Trending News)
यासोबतच जर तुम्हाला सकाळी नाश्ता न करण्याची सवय असेल तर ती आजच बदला. याशिवाय तुम्ही तुमच्या भुकेच्या गरजेहून जास्त खात असाल तरीही तुम्हाला गॅस होऊ शकतो. त्यामुळे जेवढी गरज असेल त्यापेक्षा थोडे कमीच खाणे चांगले असते. सोबतच जास्त तळलेले आणि सतत खाल्याने सुद्धा गॅसचा त्रास होतो. सतत बसून राहिल्याने पोटात गॅस धरतो. सतत बैठं काम करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. एकाच जागेवर बसल्याने खाल्लेले अन्न पचत नाही. त्यातून गॅसची समस्या उद्भवते. त्यामुळे थोड्या-थोड्या वेळानं पाय मोकळे करण्याची सवय लावून घ्या. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics