Home » Fitness : सायली संजीव करत असलेला ‘तक्रकल्प’ उपाय म्हणजे काय?

Fitness : सायली संजीव करत असलेला ‘तक्रकल्प’ उपाय म्हणजे काय?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Fitness
Share

कलाकार नेहमीच त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या फिटनेसमुळे सतत चर्चेत येत असतात. प्रत्येक कलाकाराचा कमालीचा फिटनेस पाहून लोकांना देखील त्यांचा हेवा वाटतो. कलाकार काम मिळवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी नेहमीच फिटनेसकडे लक्ष देत असतात. त्यांचा आहार, व्यायाम आदी गोष्टी ते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत शेअर करत असतात. उत्तम फिटनेस मिळवण्यासाठी किंवा आपला फिटनेस जपण्यासाठी कलाकार विविध उपाय करतात. (Marathi News)

कलाकरांना स्क्रीनवर उत्तम दिसण्यासाठी कायम आपला फिटनेस जपावाच लागतो. आपण जर पाहिले तर कलाकार हे कायम आरोग्यासाठी अनेक उपाय करतात. काही कलाकार एकच वेळेला जेवतात, काही कलाकार गहू आणि साखर अजिबातच खात नाही, काही दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाही आदी बरेच नानाविध प्रकारचे डाएट करतात. मात्र मराठी मनोरंजनविश्वातील एक अभिनेत्री तिच्या फिटनेस महिन्यातले ती दिवस केवळ ताकच पिते. या तीन दिवसांमध्ये ती ताकाशिवाय ती काहीच खातही नाही आणि पितही नाही. (Trending News)

मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव कमालीच फिटनेस फ्रिक आहे. ती उत्तम फिटनेस सकस आहार, योगा या सगळ्या गोष्टी ती फॉलो करते. यासोबतच ती फिट राहण्यासाठी विविध उपाय देखील करते. एका मुलाखतीमध्ये सायलीने तिच्या कमालीच्या उत्तम फिटनेसचे एक सिक्रेट सगळ्यांना सांगितले आहे. सायली तिच्या फिटनेस मागील बऱ्याच वर्षांपासून ‘तक्रकल्प’ नावाचा एक उपाय करते. या उपायांबद्दल सायलीने संपूर्ण माहिती दिली आहे. जाणून घेऊया सायलीच्या या ‘तक्रकल्प’बद्दल. (Top Marathi News)

Fitness

सायलीने सांगितले की, “तक्रकल्प म्हणून आयुर्वेदात एक उपाय सांगितला गेला आहे. हा उपाय करून व्यक्ती उत्तम आरोग्य आणि फिटनेस मिळू शकतो. या उपायांमध्ये आपल्याला तीन दिवस ताकावर राहायचे असते. हे मी अनेक वर्ष फॉलो करते. म्हणजे अगदी ११ वी, १२ वी मध्ये असल्यापासून मी हे फॉलो करते. महिन्यातील तीन दिवस फक्त ताक प्यायचे. तेही ताज ताक बनवून. टेट्रा पॅक मधले ताक प्यायचे नाही. दही फ्रिजमध्ये ठेवून मग त्याचे ताक बनवले तरी चालेल. पण जेव्हा ताक प्यायचे आहे तेव्हा दही फ्रिजमधून काढून ताक बनवून त्यात काळ मिठ टाकायचे आणि प्यायचे. (Marathi Latest News)

सर्यास्तानंतर ताक पिऊ नये किंबहुना दह्याचे कोणतेही पदार्थ सूर्यास्तानंतर खाऊ नये. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्हाला जितके पाहिजे तितके ताक प्या. जेव्हा जेव्हा भूक लागते तेव्हा ताक प्यायचे. जर पाणी प्यावसे वाटत असेल तर पाणी प्यायचे. सलग तीन दिवस ताक प्यायचे असते. मात्र तीन दिवसांनी जेव्हा तुम्ही तुमचा हा उपाय सोडता तेव्हा मात्र जरा काळजीपूर्व काही गोष्टी पाळल्या पाहिजे. (Fitness Tips)

=========

Skin Care : संवेदनशील त्वचेला हेल्दी बनवायचे असल्यास कोणत्या सवयी सोडाव्यात?

Chocolate : जागतिक चॉकलेट डे: चॉकलेट खाण्याचे फायदे

=========

‘तक्रकल्प’ सुरू करण्याची एक खास टेक्निक आहे. तुम्ही सकाळी नाश्ता करायचा आणि मग हा तक्रकल्प सुरू करायचा. कारण एसिडिक गोष्टींचा काहींना त्रास होऊ शकतो. मला त्रास होत नाही कारण मला त्याची सवय झाली आहे. त्यानंतर हा उपाय सोडतानाही असेच सोडायचे नाही. सकाळी नाश्ता करायचा, जेवावसे वाटले तर थोडे जेवायचे पण मध्ये मध्ये थोडं थोडं ताक देखील पित राहायचे. जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा थोडं थोडं खायचे. यामुळे तुमची त्वचा आणि पोट सगळं क्लिन्झ होतं. संपूर्ण बॉडी क्लिन्झिंगच काम तक्रकल्प करते.”  (Top Stories)

मात्र तुम्हाला कोणाला हा उपाय करण्याचा असेल तर तुम्ही आधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. त्यानंतरच हा उपाय करा. दरम्यान सायली संजीव मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री असून, तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.