पितृपक्ष संपल्यानंतर लगेच नवरात्रौत्सवाची सुरूवात होते. आता पितृपक्षचा देखील शेवटचा आठवडा सुरु झाल्यामुळे सगळीकडे नव्रातरच्या तयारीने वेग घेतला आहे. शारदीय नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर. या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. सोबतच देवीचे पाठ, जप, विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते. महिला वर्गाचा हा तर अतिशय आवडता सण आहे. कारण या नवरात्रीच्या काळात त्यांना दररोज वेगवेगळ्या साड्या, ड्रेस घालायला मिळतात. कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी नऊ रंग ठरलेले असतात. या रंगानुसार जर त्या त्या दिवशी आपण तसे कपडे घातले तर देवीचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे. (Navratri 2025)
येत्या २२ सप्टेंबरपासून अर्थात अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र साजरे केले जाते. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा तर होतेच शिवाय त्या त्या दिवशी देवीला आणि त्या दिवसाला समर्पित असे नऊ रंग देखील सांगितले जातात. नवरात्रामध्ये हे रंग आपण सांगितलेल्या दिवशी परिधान केल्यास आपल्याला सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच सोबत देवीचा आशीर्वाद देखील मिळतो. मग यंदा नऊ दिवसांचे नऊ रंग कोणते चला पाहूया. (marathi News)
२२ सप्टेंबर २०२५, सोमवार – पहिली माळ – रंग पांढरा
पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो. तसेच हा रंग निर्मळ, शुद्धता, शांतता, सुरक्षिततेची भावना, पवित्रतेचे प्रतीक आहे. (Marathi News)
२३ सप्टेंबर २०२५, मंगळवार – दुसरी माळ – लाल रंग
दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. लाल रंग हा देवीचा आवडता रंग मानला जातो. लाल हा रंग आवड, शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक आहे. (Top Marathi Headline)
२४ सप्टेंबर २०२५, बुधवार – तिसरी माळ – निळा
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग हा आकाशाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा करणाऱ्यांना आनंद आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. (Navratri Festival)
२५ सप्टेंबर २०२५, गुरुवार – चौथी माळ – पिवळा
चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग हा स्नेहाचे प्रतीक आहे. नवरात्रीत या रंगाचे कपडे घालणे खूप शुभ असते. आईच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. (Top Stories)
२६ सप्टेंबर २०२५, शुक्रवार – पाचवी माळ – हिरवा
पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. हिरवा रंग हा विविध क्षेत्रातील यशासाठी आवश्यक असलेल्या वाढीचे आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक आहे. हा रंग जीवनात नवीन आनंद आणतो. (Todays Marathi Headline)
२७ सप्टेंबर २०२५, शनिवार – सहावी माळ – राखाडी
सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. राखाडी रंग संतुलन दर्शवितो. नवरात्रीत या रंगाचे कपडे घालून पूजा केल्याने इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती मिळते. (Top Marathi News)
२८ सप्टेंबर २०२५, रविवार – सातवी माळ – केशरी
सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. केशरी रंग उत्साह, उत्कटता आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. हा रंग जीवनात उत्साह आणि उत्साह भरतो. (Latest Marathi News)
=======
Vishwakarma Puja : भाद्रपदामध्ये साजऱ्या होणाऱ्या भगवान विश्वकर्मा जयंतीचे महत्व
=======
२९ सप्टेंबर २०२५, सोमवार – आठवी माळ – मोरपंखी
आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. मोरपंखी रंग हा निळा आणि हिरवा रंगाचे सुंदर मिश्रण आहे, जो जीवनात ताजेपणा, आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. (Top Trending News)
३० सप्टेंबर २०२५, मंगळवार – नववी माळ – गुलाबी
नवव्या आणि शेवटच्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा प्रेम, दया आणि करुणेचे प्रतीक आहे. हा रंग नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि सुसंवाद राखण्याचा संदेश देतो. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics