Home » Solar Eclipse : आता सूर्यग्रहणाचे वेध !

Solar Eclipse : आता सूर्यग्रहणाचे वेध !

by Team Gajawaja
0 comment
Solar Eclipse
Share

नुकत्याच झालेल्या चंद्रग्रहणानंतर, आता वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी येणार याची उत्सुकता आहे. 7 सप्टेंबर रोजी झालेले चंद्रग्रहण हे भारतातील अनेक राज्यांमध्ये दिसले. पितृपक्षाच्या सुरुवातीला झालेल्या या चंद्रग्रहणानंतर पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी सूर्यग्रहण होणार आहे. 21 सप्टेंबर रोजी हे वर्षातले सूर्यग्रहण होणार असून ते भारतात मात्र दिसणार नाही. वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण कन्या आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होणार असून ते भारतात दिसणार नसल्यानं त्याचा सुतक काळ वैध राहणार नाही. यासोबतच भारतातून 2026 मध्ये होणा-या दोन सूर्यग्रहणेही दिसणार नाहीत. वर्षातील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण भाद्रपद पौर्णिमा म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी झाले होते. आणि आता त्याच्या बरोबर 12 दिवसांनी सूर्यग्रहण होणार आहे. हे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण असून या दिवशी भारतात पितृ अमावस्या आहे. 21 सप्टेंबर रोजी होणारे हे वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण रात्री 11 वाजल्यापासून 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3.22 वाजेपर्यंत राहील. (Solar Eclipse)

सूर्यग्रहण न्यूझीलंड, अंटार्क्टिका, फिजी, पॅसिफिक महासागर, हिंद महासागर आणि ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागातून दिसणार आहे. मात्र भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. शिवाय पाकिस्तान, श्रीलंका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, नेपाळ, अफगाणिस्तानसह अनेक देशांमध्ये वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिसणार नाही. या कारणास्तव, या देशांमध्ये त्याचा सुतक काळ वैध राहणार नाही किंवा कोणताही शुभ किंवा अशुभ परिणाम दिसणार नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आश्विन अमावस्येला पूजा-पाठ आणि अन्य धार्मिक विधी करण्यावर कुठलेही बंधन नाही. वास्तविक वैज्ञानिक दृष्टिकोनातून, ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. परंतु भारतामध्ये ग्रहणाला धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून बघितले जाते. सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सुतक काळ मानला जातो, तर चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक काळ लागू होतो. (LATEST NEWS)

2025 मधील या शेवटच्या सूर्यग्रहणानंतर पुढच्यावर्षी होणारी सूर्यग्रहणही भारतातून दिसणार नाहीत. 2026 मध्ये दोन पूर्ण सूर्यग्रहणे होणार आहेत. त्यातील पहिले 17 फेब्रुवारी 2026 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होईल. तर 12 ऑगस्ट 2026 रोजी होणारे दुसरे ग्रहण हे पूर्ण सूर्यग्रहण असेल. 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. यावेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी झाकून टाकेल आणि अग्नीच्या वलयासारखे स्वरूप निर्माण होईल. हे सूर्यग्रहण अंटार्क्टिका, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आसपासच्या महासागरांच्या काही भागातून दिसणार आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी पूर्ण सूर्यग्रहण होईल. यामध्ये सूर्य पूर्णपणे चंद्राने झाकलेला असेल. हे ग्रहण ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, रशिया आणि पोर्तुगालच्या काही भागातून पूर्णपणे दिसणार आहे. (Solar Eclipse)

युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि अनेक महासागरांमध्ये आंशिक स्वरुपात ग्रहण दिसणार आहे. भारतातून सूर्यग्रहण ज्यांना बघायचे आहे, त्यांना 2027 ची प्रतीक्षा करावी लागेल. 2027 मध्ये एक सूर्यग्रहण होईल जे भारतात अंशतः दिसेल, परंतु पूर्ण दिसणार नाही. हे सूर्यग्रहण 2 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा यासारख्या पश्चिम आणि वायव्य भारतातील काही भागांमध्ये हे खंडग्रास ग्रहण पाहता येणार आहे. याशिवाय 2026 मध्ये दोन चंद्रग्रहणे होणार आहेत. त्यातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी असून ते भारतातून दिसणार आहे. पहिले चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी होईल. हे चंद्रग्रहण आंशिक असून दिवशी फाल्गुन पौर्णिमा आहे. (LATEST NEWS)

========

Chandragrahan : चंद्रग्रहणाचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व

========

संध्याकाळी 6.26 ते संध्याकाळी 6.46 या दरम्यान 20 मिनिटे 27 सेकंदाचे हा ग्रहण काळ असणार आहे. हे ग्रहण भारतासह आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे. 2026 वर्षात दुसरे चंद्रग्रहण 28 ऑगस्ट रोजी होईल. हा पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या दोन खगोलीय घटना आहेत. मात्र भारतात या दोन्हीही घटनांना मोठे धार्मिक महत्त्व आहे. या ग्रहण काळात देशातील प्रमुख मंदिरे बंद ठेवण्यात येतात. तसेच ग्रहण सुटल्यावर या मंदिरांचे शुद्धीकरण करुन मग भाविकांना प्रवेश देण्यात येतो. तसेच ग्रहण सुटल्यावर नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठीही भाविकांची मोठी गर्दी होते. (Solar Eclipse)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.