भगवान विश्वकर्मा यांच्याबद्दल अनेकांनी ऐकले असेल. देवी देवतांचे घरं, महाल भगवान विश्वकर्मा बांधायचे असे आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये लिहिले आहे. हिंदू धर्मामध्ये सर्वच नानाविध देवी देवतांच्या पूजेला अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. प्रत्येक देवाचे महत्व आणि महती अगाध आहे. त्यामुळे भगवान विश्वकर्मा देखील याला अपवाद नाही. देवतांचे कारागीर अशी ओळख असलेल्या भगवान विश्वकर्मा यांची जयंती दरवर्षी देखील मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात येते. (Marathi)
विश्वकर्मा जयंतीच्या तारखेबाबत मतभेद आहेत. देशातील काही ठिकाणी दिवाळीत, तर काही ठिकाणी माघ महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. मात्र, बहुतांश ठिकाणी भाद्रपद वद्य संक्रांतीला विश्वकर्मा पूजनाची परंपरा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. या दिवशी भगवान विश्वकर्मा यांची पूजा करून प्रार्थना केली जाते. विश्वकर्मा हे ब्रह्मदेवतेचे सातवे पुत्र मानले जातात. या दिवशी यंत्राशी संबंधित काम करणारे कामगार यंत्रांची आणि भगवान विश्वकर्माची पूजा करतात. (Bhgwan Vishwakarma Jayanti)
पंचांगानुसार, यंदा अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात अर्थात १७ सप्टेंबर रोजी पहाटे १२.२१ वाजता सुरू होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी रात्री ११.३९ वाजता ही तिथी संपणार आहे. पंचांगानुसार १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा पूजा केली जाणार आहे. ज्यावेळी सूर्य कन्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. यावेळी सूर्य कन्या राशीमध्ये १६ सप्टेंबर रोजी रात्री १.४७ वाजता प्रवेश करणार आहे. भगवान विश्वकर्मा हे निर्माता देव म्हणून ओळखले जातात. सृष्टी, सृष्टीचा विकास आणि उन्नती हा त्यांच्या उपासनेचा मूळ उद्देश मानला जातो. यामुळेच भगवान विश्वकर्माच्या पूजेसाठी सर्व प्रकारच्या उत्पादन क्षेत्रात विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. (Marathi News)
पुराणातील माहितीनुसार विश्वकर्मा यांनीच देवतांचे अस्त्र-शस्त्र, महल, स्वर्ग, इंद्रपुरी, यमपुरी, महाभारत काळाची द्वारिका, त्रेतायुगाची हस्तिनापुर आणि रावणाच्या लंकेच निर्माण केले होते. प्रभू विश्वकर्माबाबत “ देवतांचा कारागीर’ असे संबोधले जात असले तरी वेद, पुराण, उपनिषदे, व इतर ग्रंथांप्रमाणे प्रभू विश्वकर्मा केवळ देवतांचे कारागीरच नसून सृष्टिनिर्मितीची बीजे निर्माण करणारे व जड चेतन सृष्टी निर्माण करणारे विश्वनिर्माता आहे. ब्रह्मांच्या इच्छेनुसार विश्वकर्मांनी नवीन औजारे शोधलीत. (Todays Marathi Headline)
सौर उर्जा वापरण्याचे व त्या उर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान त्यांना प्राप्त होते. सूर्य शक्तिचा वापर करून त्यांनी विष्णू, शिव व इंद्रासाठी अनुक्रमे सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजय रथ निर्माण केला. ते हरहुन्नरी होते. शस्त्रे व अस्त्रे, अलंकार, पुष्पक विमान आदींची निर्मिती त्यांनी केली. हजारो यंत्र-तंत्र, शस्त्रास्त्रे व साधनांची त्यांनी निर्मिती केली. सोनार, लोहार, सुतार, कुंभार, कासार समाजबांधव त्यांना आपले दैवत मानतात. कलियुगातही विश्वकर्मा यांचे पूजन अत्यंत लाभदायक मानले गेले आहे. जाणून घेऊया. विश्वकर्मांनी इंद्रासाठी इंद्रलोक, सुतलनामक पाताळलोक, श्रीकृष्णासाठी द्वारका नगरी, वृंदावन, राक्षसांसाठी लंका तसेच पांडवांसाठी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ, गरूड भवन आदींची निर्मिती केली. (Latest Marathi Headline)
विश्वकर्मा यांनी श्रीरामांना सहकार्य केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान, विश्वकर्मा पुत्र नल व नील यांनी रामसेतू बांधला. विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास, वैकुंठ, ब्रम्हपुरी, इंद्रपुरी, स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक आदींची रचना केली. याशिवाय जगन्नाथ पुरी येथील भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती, लंका, श्रीकृष्णांची द्वारका अशा अनेकविध दिव्य वास्तूंची निर्मिती विश्वकर्मांनी केली होती. (Top Marathi Headline)
विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सर्व शस्त्रांची, दररोज उपायोगात येणारी यंत्रे, तंत्रे यांचे पूजन केले जाते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण लॅपटॉप, मोबाइल आणि टॅबलेट ही देखील यंत्रे आणि शस्त्र आहे. त्यामुळे या यंत्रांचे पूजन करावे. भाद्रपद वद्य संक्रांतीला असलेल्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त घर आणि कारखाना किंवा कार्यालयात वापरल्या जाणाऱ्या अवजारे, शस्त्र, हत्यारे, यंत्रे यांचे पूजन केले जाते. सर्व अवजारे, शस्त्रे, हत्यारे, यंत्रे यांची स्वच्छता केली जाते. त्याला तेल-पाणी, ग्रीसिंग केले जाते. यानंतर विश्वकर्मा पूजन केले जाते. (Latest Marathi News)
विश्वकर्मा यांच्या जन्माची कथा
विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. एका शास्त्रानुसार, ब्रह्म देवाचे पुत्र धर्म, धर्माचे पुत्र वास्तूदेव आहे. वास्तूदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. स्कंद पुराणाप्रमाणे, धर्म ऋषींचे आठवे पुत्र प्रभास होते. प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींच्या भगिनी भुवना ब्रह्मवादिनी यांच्याशी झाला. भुवना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. तर, महाभारतातही विश्वकर्मांचा उल्लेख आढळतो. वराह पुराणानुसार, ब्रह्म देवांनी विश्वकर्मा यांना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. (Top Trending News)
===========
Ekadshi : पितृपक्षात येणारी, पितरांना मोक्ष प्रदान करणारी इंदिरा एकादशी
Sankashti Chaturthi : पितृपक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे महात्म्य
===========
एका मान्यतेनुसार असुर माल्यवान, सुमाली आणि माली यांनी विश्वकर्मा यांना असुरांसाठी एक विशाल भवन बांधण्याची विनंती केली होती. या तीन असुरांची प्रार्थना ऐकून विश्वकर्माजींनी समुद्रकिनारी असलेल्या त्रिकुट नावाच्या पर्वतावर सोन्याची लंका बनवली. अजून एका मान्यतेनुसार, सुवर्ण लंकेचे राजा कुबेर देव होते. रावण हा कुबेर देवाचा सावत्र भाऊ होता. जेव्हा रावण शक्तिशाली झाला तेव्हा त्याने त्याचा भाऊ कुबेरकडून सुवर्ण लंका हिसकावून घेतली. विश्वकर्माजींनी कुबेरसाठी पुष्पक विमानही बनवले होते, हे विमानही रावणाने हिसकावले होते. (Top Stories)
तर श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीबद्दल सांगितले जाते, भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून द्वारका शहराची निर्मिती द्वापर युगात श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर कंसाचा सासरा जरासंध भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी मथुरेवर वारंवार हल्ले करू लागला. श्रीकृष्ण आणि बलराम प्रत्येक वेळी त्याचा पराभव करत असत, परंतु जरासंधचे आक्रमण वाढू लागले तेव्हा श्रीकृष्णाने मथुरेचे रक्षण करण्यासाठी मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने विश्वकर्मा यांना सुरक्षित ठिकाणी स्वतंत्र नगर वसवण्यास सांगितले होते. त्यानंतर विश्वकर्माजींनी द्वारका शहर वसवले. यानंतर श्रीकृष्ण-बलराम आणि यदुवंशी द्वारका नगरीत राहायला गेले. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics