फुलं कोणाला आवडत नाही. सगळ्यांनाच फुलं प्रचंड आवडत असतात. ही फुलं आपल्या आजूबाजूला असली की आपल्या देखील छान ताजेतवाने वाटते. त्यातही फुलांचा गजरा म्हटला की तो तर आपल्या भारतीय महिलांचा वीक पॉइंटच आहे. प्रत्येक स्त्रीला केसांमध्ये गजरा माळायला आवडत असते. काही जणी रोज गजरा माळतात तर काही खास कार्यक्रमांमध्ये आवर्जून केसांमध्ये गजरा माळतात. गजरा स्त्रीचे सौंदर्य अधिकच खुलवतो. त्यामुळे गजरा हा प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी नुसते फुलं नाही तर एक दागिनाच असतो. (Top News)
मात्र जर हा गजराच तुम्हाला अडचणीत आणत असेल तर? आता तुम्ही म्हणाल काहीही काय…सुंदर, सुवासिक गजरा कोणाला, कोणत्या अडचणीत आणू शकतो? अडचण म्हणजे थोडी थोडकी नाही तर तब्बल १ लाख रुपये दंड भरावा लागेल एवढी मोठी. खोटे वाटते ना…? पण असे घडले आहे. ते ही एका प्रसिद्ध भारतीय अभिनेत्रीसोबत. हा संपूर्ण प्रकार घडला आहे, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नव्या नायरसोबत.ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये मल्याळम अभिनेत्री असलेल्या नव्याला तब्बल १९८० ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १.१४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Actress Navya Nair)
अभिनेत्री नव्या नायरही मल्याळी असोसिएशन ऑफ व्हिक्टोरियाने आयोजित केलेल्या ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी मेलबर्नला जात होती. त्यादरम्यान, तिच्यावर हा दंड ठोठावण्यात आला. तिने किंबहुना कोणीच कधी विचारही केला नसेल की, गजऱ्यामुळे १ लाखांचा दंड भरावा लागेल. तिने स्वतः तिच्या या कोची ते मेलबर्न या विमानप्रवासादरम्यान आलेल्या विचित्र अनुभवाबद्दल माहिती दिली आहे. (Marathi News)
नव्याने दिलेल्या माहितीनुसार कोची सोडण्यापूर्वी तिच्या वडिलांनी तिला दोन चमेलीचे गजरे खरेदी करून दिले होते. त्यांनी तिला गजरा केसांमध्ये पाळण्यास सांगितले. नव्याने एक गजरा केसांमध्ये घातला तर दुसरा गजरा तिच्या पर्समध्ये एका प्लस्टिकच्या पिशवीत ठेवला. तिने तिच्या बॅगेत सुमारे १५ मिटर लांब गजरा ठेवला होता. (Todays Marathi Headline)
नव्याने गजऱ्याचा एक भाग कोचीहून सिंगापूरला जाणाऱ्या विमान प्रवासादरम्यान केसांत माळला होता, मात्र ती सिंगापूरला पोहोचेपर्यंत त्या गजऱ्यातील फुलं कोमेजली होती. म्हणून तिने गजऱ्याचा दुसरा भाग जो तिने आधीच कॅरी बॅगमध्ये पॅक करून तिच्या पर्समध्ये ठेवला होता, तो ती सिंगापूरला पोहोचल्यावर घालणार होती. पण ऑस्ट्रेलियाला अशा प्रकारे फुलं घेऊन जाणे हे कायद्याच्या विरोधात आहे हे नव्याला माहीत नव्हते. त्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी तिची बॅग तपासली तेव्हा चमेलीची फुले पाहून त्यांनी तिला थांबवले आणि लगेच तिला दंड ठोठावला. ओणम सेलिब्रेशनदरम्यान व्यासपीठावरून नव्याने हा संपूर्ण प्रकार सांगितला आणि ती म्हणाली, ‘मला माहित आहे की मी चूक केली आहे, पण ती जाणूनबुजून केलेली नाही. मी फक्त माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून गजरा घेऊन जात होते. त्यांनी मला २८ दिवसांच्या आत दंड भरण्यास सांगितले आहे’ असेही यावेळी नव्या म्हणाली. (Entertainment News)
ऑस्ट्रेलियाचे नियम काय आहेत?
ऑस्ट्रेलियाचा जैव-सुरक्षा कायदा खूप कडक आहे. सरकारी परवानगीशिवाय ‘वनस्पती, फुले आणि बिया’ यांसारखे जैविक साहित्य देशात आणण्यास मनाई आहे. कारण हे पदार्थ कीटक, रोग आणि जैविक असंतुलन निर्माण करू शकतात. ऑस्ट्रेलियाच्या कृषी, वनीकरण आणि मत्स्यव्यवसायाच्या विभागानुसार, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कापलेली फुले किंवा पाने आणण्यास मनाई करण्यात आलेली आहे. (Latest Marathi Headline)
यासाठी, सर्वात आधी तेथील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. त्यानंतर अधिकारी ही फुले किंवा पाने तपासतात. जेणेकरून कीटक किंवा रोगांचा धोका राहणार नाही. या विभागाच्या मते, प्रवाशांनी त्यांच्या कार्डवर वनस्पतीशी संबंधित माहिती देणे आवश्यक आहे. नाहीतर, त्यांना ६६०० ऑस्ट्रेलियन डॉलर्स (३.८१ लाख रुपये) पर्यंत दंड होऊ शकतो. यासोबतच, खटला देखील दाखल केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर त्यांचा व्हिसा देखील रद्द केला जाऊ शकतो. (Top Marathi News)
या घटनेमुळे सर्वच लोकं आश्चर्य व्यक्त करत आहे. सोशल मीडियावर देखील ही घटना कमालीची गाजत आहे. त्याचबरोबर हा अनुभव इतरांसाठी एक मोठा धडा ठरला आहे. परदेशात प्रवास करताना स्थानिक कायद्यांची माहिती असणं किती आवश्यक आहे, हेच या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. (Top Trending News)
========
Asha Bhosle : मेलोडी क्वीन ‘आशा’
========
दरम्यान, अभिनेत्री नव्या नायर ही एक प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री आहे, जी मल्याळम आणि कन्नड सिनेमांमध्ये काम करते. नव्याने २००० साली आलेल्या ‘इष्टम’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. नव्याने तिच्या अभिनयासाठी अनेक लहान मोठे पुरस्कार जिंकले आहेत. तिला दोन वेळा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार आणि दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics