आपल्याकडे एक म्हण खूपच प्रसिद्ध आहे ती म्हणजे, ‘”लवकर निजे लवकर उठे त्यासी, ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे”. अर्थात जो व्यक्ती रात्री लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो त्याला ज्ञान, आरोग्य आणि संपत्ती मिळते. मात्र सध्याच्या काळात सर्वच रात्री मोबाइल बघत जागरण करतात आणि उशिरा झोपतात. उशिरा झोपल्यामुळे उशिरा उठतात. यातही काही लोक रात्री उशिरा झोपले तरी ऑफिस, शाळा, कॉलेज आदी कारणांच्या निमित्ताने सकाळी लवकर उठतात. मात्र असे करणे आरोग्याच्या दृष्टीने अजिबातच चांगले नसते. रात्री लवकर झोपून सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठणे कधीही लाभदायकच ठरते. (Marathi News)
आपल्या घरातील वयस्कर व्यक्ती आपल्याला अनेकदा सकाळी लवकर उठण्याबद्दल किंवा ब्रह्मा मुहूर्तावर उठण्याबद्दल सांगतात. मात्र आपल्या त्याकडे कानाडोळा करतो. पूर्वीच्या काळी लोकं पहाटे लवकर उठायचे म्हणूनच ते आजही फिट आणि निरोगी आहेत. मात्र ब्रह्म मुहूर्त म्हणजे नक्की काय? आणि या ब्रह्म मुहूर्तावर उठल्याचे नक्की कोणते फायदे शरीराला होतात? चला पाहूया. (Health)
ब्रह्म मुहूर्त हा दोन शब्दांचा मिळून बनलेला आहे. ज्यामध्ये ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ. म्हणजे देवाचा काळ. हा मुहूर्त रात्रीच्या शेवटच्या तासात होतो, म्हणजे जेव्हा रात्र संपते आणि सकाळ सुरू होते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार पहाटे चार ते साडेपाच ही वेळ ब्रह्म मुहूर्त मानली जाते. थोडक्यात सूर्योदयाच्या दीड तास आधीच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हटले जाते. (Todays Marathi Headline)
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, ब्रह्म मुहूर्तावर उठून, स्नान, ध्यान आणि उपासना केल्याने आपली प्रार्थना थेट परमात्म्यापर्यंत पोहोचते. याशिवाय या शुभ मुहूर्तावर उठण्याचे अनेक आरोग्य फायदेही सांगण्यात आले आहेत. यामुळे सकाळी ताजी हवा मिळते, ज्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. या वेळेत उठल्याने माता लक्ष्मीची नेहमी विशेष कृपा असते. ब्रह्म मुहूर्तावर उठून काही विशेष उपाय केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. धार्मिक मान्यतेनुसार, ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने जीवनात अपार यश मिळते. (Marathi Headline)
शरीरात सकारात्मक ऊर्जा राहते. हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. ब्रह्म मुहूर्त हा सर्वोत्तम काळ मानला जातो. पौराणिक काळातील ऋषीमुनींनी ही वेळ ध्यान करण्याची योग्य वेळ मानली. यावेळी केलेली देवपूजा लवकर फळ देते आणि आपली प्रार्थना थेट देवापर्यंत पोहचते असे आपल्या ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. ब्रह्म मुहूर्तावर मंदिरांचे दरवाजेही उघडले जातात. पुराणानुसार या वेळेची निद्रा ब्रह्म मुहूर्ताचे पुण्य नष्ट करते. (Latest Marathi News)
ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे फायदे
– धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी देवी देवता आणि पूर्वज आपल्या घरी येतात, त्यामुळे आपल्या घराची प्रगती होते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. (Top Trending News)
– ब्रह्म मुहूर्तामध्ये संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि ही उर्जा आपल्या शरीरात असणाऱ्या उर्जेत मिसळयानंतर आपल्या मनात चांगले विचार येतात आणि उत्साहाचा संचार होतो. या वेळेत बाहेर फिरायला गेल्यावर शरीरात नवीन ऊर्जा संचारतो.
– ब्रह्म मुहूर्तामध्ये केलेल्या ध्यानाचा सराव हा आत्मविश्लेषण आणि ब्रह्मज्ञानाचा सर्वोत्तम काळ समजला जातो.
– ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने शरीरात शक्ती आणि तग धरण्याची क्षमता निर्माण होते.
– जो व्यक्ती ब्रह्म मुहूर्तावर उठतो त्याला उत्तम आरोग्य, शक्ती, बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते.
– ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने केल्याने मानसिक तणाव, चिंता, निद्रानाश आणि निराशा यासारखे विविध मानसिक आजार दूर होतात. शिवाय जे ब्रह्म मुहूर्तावर उठतात ते जीवनात अधिक यशस्वी होतात.
======
Chhattisgarh : या मंदिराला ‘एक दिवसाचे मंदिर’ म्हणतात !
======
– तज्ज्ञांच्या मते ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी वातावरण प्रदूषणमुक्त असते. शुद्ध वातावरणात ऑक्सिजन वायूची टक्केवारीही जास्त असते.
– शीख धर्मात ब्रह्म मुहूर्ताला ‘अमृत वेला’ असे म्हटले जाते. आपण जसे पाहिले देवाच्या भक्तीसाठी सर्वश्रेष्ठ वेळ आहे. यावेळी आपले मन शांत आणि शरिर पवित्र होते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics