गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण दररोज अष्टविनायकातील एका गणपतीची माहिती, इतिहास आणि वैशिष्ट्य जाणून घेत आहोत. आज गणेश चतुर्थीचा पाचवा दिवस असून, आज जेष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे देखील आगमन होत आहे. गणपती बाप्पा येऊन पाच चार दिवस झाले देखील. बाप्पांचे आगमन म्हणजे सर्वत्र नुसते चैतन्य आणि नुसता आनंद. प्रथमपुज्य गणेशाची अष्टविनायकांमध्ये येणारी मंदिरं अतिशय जाज्वल्य समजली जातात. या सर्वच आठही मंदिरांना हिंदू धर्मामध्ये मोठे महत्व देण्यात आले आहे. आज गणेशोत्सवाचा पाचवा दिवस आणि आजचा गणपती आहे, ओझरचा विघ्नेश्वर. नावाप्रमाणेच या गणेशाची कीर्ती आहे. आल्या भक्तांची विघ्ने हरणारा असा विघ्नेश्वर. विघ्नासुर राक्षसाचा पराभव केल्यामुळे या गणपतीला विघ्नेश्वर असे म्हणतात. सर्व विघ्नांना दूर करणारा विघ्नेश्वर गणपती. शिवाय अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून देखील या गणपती मंदिराची ओळख आहे. (Ashatvinayak)
कुकडी नदीच्या किनारी विघ्नेश्वराचे मंदिर असून, बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी १७८५ मध्ये मंदिराची उभारणी केली. हे मंदिर पूर्वाभिमूख असून त्याला मोठी दगडी तटबंदी आहे. एखाद्या भूईकोट किल्ल्याप्रमाणे या मंदिराचे बांधकाम आहे. कळस आणि शिखर सोन्याचा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत. मंदिराचा सभामंडप २० फूट लांबीचा असून, गाभारा १० फूट रुंद आणि १० फूट लांब आहे. सभामंडप दोन भागांत विभागला गेला आहे. दोन्ही भागांवर छोटेखानी कळस असून, गाभाऱ्यावर उंच कळसाची रचना आहे. मंदिराबाहेरील बाजूस दोन अत्यंत रेखीव दगडी दीपमाळा आहेत. सभामंडपात आतील बाजूने आरशांच्या काचांची आकर्षक सजावट पाहायला मिळते. मंदिरात एकात एक अशी सभामंडपाची रचना असून प्रवेशद्वारातून प्रवेश करताच काळ्या पाषाणातील उंदराची मूर्ती आहे. (Todays Marathi News)
देवळाच्या भिंतींवर चित्रकाम केलेले आहे. दोन सभामंडपातून आत गेल्यावर गाभारा आहे. गाभा-यात डौलदार कमानीत बसलेली पूर्णा कृतीतील विघ्नेश्वराची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन डोळ्यात माणके तसेच कपाळावर आणि बेंबीत हिरे आहेत. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. ही मूर्ती स्वयंभू आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळ्याच्या मूर्ती आहेत. गणपतीच्या मुर्तीच्यावर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत. देवळात लहान लहान खोल्या आहेत. यांना ओवऱ्या म्हणतात. इथे बसून भक्त ध्यान करू शकतात. विशेष म्हणजे, गणेशोत्सव काळात ओझरमध्ये कोठेही घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही. (Trending Marathi Headline)
गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या विघ्नहर मंदिरात गणेशोत्सव काळात चार दिवस द्वार यात्रा आणि पालखी उत्सव सुरू असतो. गणेश प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला ओझर येथे द्वार यात्रा सुरू होते. मंदिराच्या पंचक्रोशीत असलेल्या उंब्रज, धनेगाव, शिरोली आणि ओझरची आंबेराई या चार गावांत गणेशाची पालखी भाद्रपद प्रतिपदा ते पंचमी या तिथीदरम्यान नेली जाते. यानंतर गणेशजन्माच्या काळात चार दिवस गणेशजन्मसोहळा साजरा होतो. (Top Marathi Headline)
गणेशजन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला रात्री १२ नंतर छबीना काढून, मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर गणपतीला पेशवेकालीन पोशाख घातला जातो. गावातील १२ बलुतेदारांची पालखी भाद्रपद शुद्ध पंचमीला निघते. ग्रामप्रदक्षिणेसाठी निघालेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. गणेशोत्सव काळात रात्री ११ ते १२ या वेळेत निरंतर धुपारती होते. त्या वेळी मोरया गोसावी यांची पदे आळवली जातात. गणेशजन्मोत्सव हा ओझरचा यात्रोत्सव सोहळा म्हणूनच साजरा होतो. (Latest Marathi News)
विघ्नेश्वर गणपतीची आख्यायिका
आख्यायिकेनुसार, एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्राचे पद मिळविण्याची इच्छा बाळगली आणि त्यासाठी त्याने मोठा यज्ञ केला. इंद्राला हे कळतातच ते फार चिडले आणि त्या राजाचा यज्ञ थांबविण्यासाठी विघ्नासुर राक्षसाची उत्पत्ती केली आणि त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. विघ्नासुराने त्या राजाच्या यज्ञ कार्यात फार अडथळे निर्माण केले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. पृथ्वीलोकातील सर्व लोकं ब्रह्मदेव आणि शंकराकडे मदत घेण्यासाठी गेले.त्यांनी गणपती तुझी मदत करतील त्यांच्या कडे जा असे सांगितले. (Top Trending News)
========
Ganesh Chaturthi : गणेशाला एकदंत का म्हटले जाते?
=========
सर्वानी गणेशाचे स्तवन केले. त्यांच्या प्रार्थनेला स्वीकारून त्यांच्यावर प्रसन्न होऊन गणपतीने पाराशर ऋषींच्या पुत्राच्या रूपात अवतार घेतला आणि विघ्नासुराशी युद्ध करून त्याचा प्रभाव केला आणि राजाचे सर्व विघ्न दूर केले. त्यावेळी पासून ते विघ्नेश्वर म्हणून प्रख्यात झाले. सर्वानी गणेशाचे वंदन करून त्यांचे आभार मानले.त्यांनी या ठिकाणी गणेशाच्या विघ्नेश्वर स्वरूपाची स्थापना केली. सर्वांचे विघ्न हरणारे असे हे विघ्नेश्वर आहे. (Social News)
ओझरला कसे पोहचाल
ओझर लेण्याद्रीपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून ८५ किलोमीटर अंतरावर ओझर येते. – नाशिकपासून सिन्नर – आळेफाटामार्गे १३९ किलोमीटरचे अंतर पार केल्यावर ओझर गणपतीला जाता येते.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics