ज्या सणाची आपण सर्वच वर्षभर वाट बघत असतो, असा गणेशोत्सव आजपासून अखेर सुरु झाला आहे. आता पुढचे दहा दिवस फक्त आणि फक्त बाप्पाचेच असणार आहेत. आज घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले. वाजत गाजत बाप्पा आज आपल्याकडे विराजमान झाला आहे. कलेची, विद्येची देवता असलेला गणपती बाप्पा सुखकर्ता आणि दुःखहर्ता देखील आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. आज गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र गणेशाचा जन्मोत्सव म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण बाप्पाच्या जन्माची कथा जाणून घेऊया. (Ganesh Chaturthi)
शिवपुराणानुसार देवी पार्वतीने आपल्या अंगावरील हळदीचा एक पुतळा तयार केला होता. त्यांनी नंतर पुतळ्यात प्राण आणले. अशा प्रकारे गणेशाचा जन्म झाला. यानंतर माता पार्वतीने गणेशाला घराच्या दारातून कोणालाही आत येऊ देऊ नये, अशी आज्ञा केली. गणेशजी दारात उभे असतानाच शिवाचे आगमन झाले. गणेशाने शिवाला ओळखले नाही आणि गणेशाने शंकराला आत जाण्यास नकार दिला. त्या दोघांमध्ये युद्ध देखील झाले, मात्र गणेश शंकरांना आत जाऊ देत नव्हता. तेव्हा यावर शिवाने क्रोधित होऊन गणेशाचे डोके त्रिशूलाने धडा वेगळे केले. (Latest Marathi Headline)
गणेशाचे मस्तक उडवल्यानंतर एकच गोंधळ झाला. पार्वती बाहेर आली आणि आपल्या पुत्राला पाहून आक्रोश करू लागली. तेव्हा शंकरांना समजले कि गणेश त्यांचा पुत्र आहे. पार्वतीने शंकरांना गणेशाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले. तेव्हा शिवाने गरुडाला उत्तर दिशेला जाण्याची आज्ञा दिली आणि सांगितले की, जी आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली आहे, त्या बाळाचे डोके आणा. तेव्हा गरुडाने हत्तीच्या बाळाचे डोके आणले. भगवान शिवांनी ते मुलाच्या शरीराला जोडले. त्यात त्यांनी प्राण आणले. अशा प्रकारे गणेशाला हत्तीचे शीर मिळाले. (Top Trending News)
=========
Ashtavinayak : अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती – मयुरेश्वर गणपती
=========
गणेश पुन्हा जिवंत झाल्यानंतर त्याला सर्व देवी देवतांकडून विशेष आशीर्वाद देखील प्राप्त झाले. गणरायाला कोणत्याही कामाच्या आधी सुरूवातीला पूजले जाते, तो प्रथमपुज्य म्हणून ओळखला जातो. गणेश चौसष्ट विद्या आणि १४ कलेचा देवता मानला जातो. सर्वात बुद्धिमान देव म्हणून गणरायाला मान आहे. आजच्या दिवशी अर्थात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला अभिषेक करणे लाभदायक मानले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेशाला अभिषेक केल्याने त्यांचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो. गणेशाच्या अभिषेकानंतर गणपती अथर्वशीर्षाचा पाठ अवश्य करावा. शास्त्रात गणेश यंत्राचे वर्णन अतिशय चमत्कारिक साधन म्हणून केले आहे. चतुर्थीच्या दिवशी त्याची स्थापना विशेष फलदायी असते. घरामध्ये या यंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics