गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमी साजरी केली जाते. हरतालिकेप्रमाणेच ऋषी पंचमीचे सुद्धा एक महत्वाचे व्रत केले जाते. ऋषीपंचमीच्या व्रताचे खूप महत्व आहे. या दिवशी सप्तऋषींची पूजा करून त्यांना वंदन केले जाते. ऋषीपंचमीचे व्रत हे महिला करतात. या व्रताला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाचा पाचवा दिवस ज्याला ऋषीपंचमी असे म्हटले जाते. यंदा ऋषिपंचमी गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. मान्यतेनुसार, गणपतीची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, तर ऋषीपंचमीच्या दिवशी सप्तर्षींची पूजा केल्याने ज्ञान, संस्कृती आणि आत्मशुद्धीचा आशीर्वाद मिळतो. (Ganesh Chaturthi)
ऋषीपंचमीच्या दिवशी गंगेत किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. यावेळी ऋषीपंचमीच्या पूजेसाठी गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.५ ते दुपारी १.३९ पर्यंत मुहूर्त राहील. याकाळात सप्तऋषींची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. (Rishi Panchami)
हिंदू संस्कृतीत पाप पुण्य याला एक वेगळे महत्त्व आहे. त्यामुळेच या दिवशी सप्तऋषींची पूजा केली जाते. ऋषि पंचमीचे व्रत केल्याने आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते, हे व्रत हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या सप्तर्षीं असणाऱ्या कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ ऋषींच्या कार्याला केले जाणारे वंदन आहे. हे व्रत केल्याने व्यक्तीला शुद्धता, पवित्रता आणि सात्विकतेचा लाभ होतो आणि पूर्वजन्मातील दोषांपासूनही मुक्ती मिळते. (Marathi News)
ऋषिपंचमीचे व्रत महिलांनी करायचे असते. पुराणांनुसार स्त्रीयांनी उपवास करुन हे व्रत केल्यास त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. संपूर्ण घराला सुखशांती मिळते. अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी सप्त ऋषींचे स्मरण केले जाते. या व्रताने मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने कमी होतो असं म्हणतात. मान्यता आहे की, मुलगी वयात आली की लगेच तिने हे व्रत करण्यास सुरुवात करायची असते. (Todays Marathi Headline)
=======
Ganeshotsav : ‘या’ गावात चक्क मशिदीमध्ये केली जाते गणपतीची प्रतिष्ठापना
=======
ऋषिपंचमी पूजाविधी
या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आघाड्याच्या काड्यांनी दात घासावे. नदीवर जाऊन स्नान करून पूजा मांडावी. सात ऋषी, एक गणपती आणि एक अरुंधती अश्या नऊ सुपाऱ्या मांडाव्या. मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी व्रत करत असल्याचा संकल्प करावा. एका ताम्हनामध्ये तांदळावरती या सुपाऱ्या मांडाव्या आणि त्यांची मनोभावे पूजा करावी. सात पत्री, सात फुले, एक नारळ, आठ जानवे, एक पंच्या, नऊ खारका, नऊ खोबऱ्याचे तुकडे, नऊ बदाम, बांगड्या, २५ विड्याची पाने, गुळ, पंचामृत आणि अत्तर. हे सर्व साहित्य अर्पण करावे. पूजा झाल्यानंतर मनोभावे ऋषीपंचमीची कहाणी वाचावी. (Top Marathi Headline )
लक्षात घ्या या दिवशी काही ठिकाणी उपवास केला जातो. शिवाय बैलाच्या कष्टानी तयार झालेले अन्न खाऊ नये. काही ठिकाणी म्हशीचे दूध प्यायले तर चालते. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून घराबाहेर न जाता आधी काहीतरी खाऊन उपवास सोडावा. अशी मान्यता आहे की उपवास सोडण्याच्या आधी कुत्र्याचे तोंड बघू नये. या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा. वयाच्या पन्नाशीनंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही. उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते. ऋषिपंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, पडवळ, शिराळं, मक्याचे कणिस, काकडी, कोवळा माठ (भाजी) या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. (Top Trending Marathi News)
ऋषीपंचमीचे कहाणी
ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी! दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. (Marathi Latest Headline)
एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा सैंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला? खिरींचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल. म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कंबरेत मारलं, तो सैंपाक टाकून दिला, पुन्हा सैंपाक केला, ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्टं देखील घातलं नाही. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली, आणि आक्रोश करून रडू लागली. (Top Trending News)
बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं. तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दु:खी झाला. (Top Marathi News)
दुसरे दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल, ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. (Latest Marathi News)
==========
Rishi Panchami 2025 : ऋषीपंचमी का साजरी करतात? जाणून घ्या तारखेसह महत्व
Ganesh Chaturthi : गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’च का म्हणतात?
==========
तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषिपंचमीचं व्रत कर! ते व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखांतली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावं, मग अंघोळ करावी. धुतलेली वस्त्र नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुधंतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्षं करावं शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिलं कार्य होतं. मुलानं ते व्रत केलं. त्याचं पुण्य आईबापांना दिलं. (Top Stories)
त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics