रशियन कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात कर लादला आहे. पण भारताला टेरिफ कार्डानं धमकवणा-या ट्रम्प यांनी रशियाकडून भारतापेक्षा अधिक कच्चे तेल खरेदी करणा-या चीनवर सवलतींचा पाऊस पाडला आहे. अमेरिकेच्या या दुपट्टीपणावर भारतानं टीका केली आहे. अमेरिकेच्या या दुटप्पी वृत्तीबद्दल अमेरिकेतच प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यामुळे ट्रम्प प्रशासनानं भारताच्या रशियासोबतच्या व्यापारानं युक्रेन युद्ध चालू असल्याचे कारण पुढे केले आहे. अर्थात या सर्वात अमेरिकेची दुहेरी भूमिका पुन्हा पुढे आली आहे. (America)

एकीकडे आपल्या देशाच्या नागरिकांसाठी मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणणारे ट्रम्प, भारताला मात्र त्याच्या जनतेच्या फायद्याचे निर्णय घेण्यापासून रोखत आहेत. ट्रम्प यांच्या दुटप्पी भूमिकेबाबत सर्वत्र टीका होत असतांना आता ट्रम्प यांच्या मनात भारताविषयी द्वेष निर्माण करणा-या व्यक्तीचे नाव पुढे आले आहे. ट्रम्प यांच्या मनात टेरिफ कार्डाचे विष कालवून भारत-अमेरिका मैत्रीमध्ये दुरावा आणणा-या या व्यक्तीचे नाव पीटर नवारो आहे. पीटर हे ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादण्याची घोषणा केल्यापासून या दोन्ही देशांच्या मैत्रीमध्ये कटुता आली आहे. मात्र या सर्वांसाठी पीटर नवारो यांना जबाबददार धरण्यात येत आहे. (International News)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार म्हणून पीटर नवारो काम करतात. गेल्या काही दिवसापासून हे पीटर नवारो महाशय भारताबद्दल कठोर शब्दांत टीका करत आहेत. भारताला संधीसाथू देश असल्याचे त्यांनी वक्तव्य केले आहे, तसेच रशिया आणि चीनबरोबर भारत मैत्री वाढवत असून त्याद्वारे अमेरिकेच्या आर्थिक धोरणावर आघात करण्याचा भारताचा डाव असल्याचे पीटर यांनी सांगितले आहे. पीटर नवारो हे भारताचा एवढा द्वेष का करतात, याबाबत आता विचारणा होत आहे. नवारो हे एक अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक आहेत. पीटर यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममध्ये सहभागी होण्यापूर्वी पीटर हे डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक होते आणि उदारमतवादी अर्थशास्त्रावर विश्वास ठेवत होते. मात्र आता पीटर ट्रम्प यांच्या अमेरिकेला प्रथम स्थान देणाऱ्या धोरणांचे समर्थक बनले आहेत. त्यामुळेच ट्रम्प यांच्या टीममध्ये पीटर यांचे स्थान सध्या सर्वात वरचे आहे. (America)
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात पीटर हे व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रीय व्यापार परिषदेचे संचालक म्हणून कार्यरत होते. आता पीटर ट्रम्प यांचे व्यापार आणि उत्पादनासाठी वरिष्ठ सल्लागार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अवघ्या जगाला ज्या टेरिफ कार्डाचा धाक धरुन वेठिस ठेवले आहे, त्याची मुळ कल्पना या पीटर नवारो यांचीच आहे. पीटर नवारो यांचे व्यक्तीमत्व वादग्रस्तही आहे. विशेषतः अमेरिकेतील उद्योगजगातामध्ये त्यांच्या धोरणाबाबत नाराजी आहे. ट्रम्प यांचे काही काळ जिगरी मित्र असणारे उद्योगपती, एलोन मस्क यांनी तर पीटर यांचा उल्लेख मूर्ख असा केला आहे. पीटर यांच्या वादग्रस्त भूमिकेमुळे ते कधीही कुठल्याही पदावर फारकाळ राहू शकले नाहीत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना मात्र त्यांच्या विचारांची सध्या मोहीनी पडल्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्यापाठोपाठ या पीटर नवालो यांचा दबदबा असल्याची माहिती आहे. (International News)

भारतासोबत पीटर हे चीनचेही विरोधक मानले जातात. नवारो यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यापैकी एक डेथ बाय चायना, हे सर्वात प्रसिद्ध पुस्तक आहे. यामध्ये चीनवर बेकायदेशीर निर्यात अनुदाने, चलन हाताळणी आणि आर्थिक आक्रमकतेचा आरोप करण्यात आला आहे. 2012 मध्ये त्यांनी त्याच नावाचा एक माहितीपटही बनवला. त्यामुळे पीटर अमेरिकेच्या राष्ट्रवादींमध्ये लोकप्रिय झाले. ट्रम्प यांनी पीटर यांच्या मतांमुळेच त्यांना आपल्या टीममध्ये समाविष्ट केल्याची चर्चा आहे. पण पीटर यांच्या धोरणांवर अमेरिकेमध्येही टीका होत आहे. पीटर यांनी टेरिफ कार्डामुळे अमेरिकेत नोकऱ्या वाढवतील आणि अर्थव्यवस्था मजबूत होतील असा दावा केला होता. मात्र अमेरिकेतील अर्थतज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे. (America)
==============
हे देखील वाचा : Melania Trump : चर्चा फक्त मेलानियाच्या पत्राची !
============
पीटर यांच्या धोरणानुसार आयात वस्तूंवर कर लागून या वस्तू महाग होणार आहेत. टेरिफ कार्डाबाबत पीटर यांनी दिलेल्या अहवालात, दरवर्षी $600 अब्ज, महसूल टेरिफमुळे निर्माण होईल, असे सांगितले आहे. परंतु टॅक्स फाउंडेशन आणि येल युनिव्हर्सिटीच्या बजेट लॅबसारख्या संस्थांनी पीटर यांचा आकडा फसवा असल्याचे सांगितले आहे. याशिवाय पीटर यांच्या धोरणांनी अमेरिकेपासून त्यांचे मित्र देश दूर होत असल्याचीही टीका आहे. मात्र या सर्वात पीटर यांचा भारतावर विशेष राग आहे. भारताचे स्वदेशी धोरण हे अमेरिकेला हानीकारक असल्याचे मत त्यांचे आहे. त्यातूनच अमेरिकेतील दूध आणि दूग्धजन्य पदार्थ खरेदी करावेत असा दबाव भारतावर टाकण्यात येत आहे. भारतानं याला ठामपणे नकार दिल्यामुळे पीटर आता भारताला संधीसाधू म्हणत आहेत. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
