Home » Vladimir Putin : पुतिन की पुतिनचा डुप्लिकेट ?

Vladimir Putin : पुतिन की पुतिनचा डुप्लिकेट ?

by Team Gajawaja
0 comment
Vladimir Putin
Share

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये अलास्कामध्ये झालेल्या ऐतिहासिक बैठकीमध्ये युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत चर्चा झाली. अर्थात त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या या शिखर परिषदेच्या अपयशानंतर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले आणि व्लादिमीर पुतिन मॉस्कोमध्ये. पण आता जगभर या बैठकीबाबतचे पुरण दळले जात आहे. राजकीय जाणकार या बैठकीत कोणाचा वर्चस्मा होता, याची चर्चा करत आहेत. युक्रेनचे पाठिराखे यातून युक्रेनला कसा लाभ झाला, याच्या चर्चा करत आहेत. मात्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या बाबत एक रंजकदार चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा आहे, डुप्लिकेट पुतिन यांच्याबाबत. होय, अलास्का येथे झालेल्या शिखर परिषदेत खरे व्लादिमीर पुतिन आलेच, नव्हते, असा दावा पुतिन यांना जाणणा-यांकडून केला जात आहे. (Vladimir Putin)

अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतिन यांची बैठक होणार म्हणून तिथे जगभरातले पत्रकार आणि मिडिया माध्यमातील जाणकार गेल्या आठवड्यापासून मुक्कामी आहेत. आता या सर्वांकडून या बैठकीच्या सर्व व्हिडिओ आणि फोटोंचे परिक्षण करण्यात येत आहे. त्यातून हा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे. यातील पुतिन यांच्या फोटोंचा आणि व्हिडिओचा अभ्यास करण्यात येत असून अलास्कामध्ये आलेल्या पुतिन यांचे पत्रकार परिषदेला उभे असतांना पाय लटपटतांना दाखवण्यात आले आहे. त्यावरुन अनेक राजकीय जाणकार पुतिन यांनी अलास्काला आपला डुप्लिकेट पाठवल्याची चर्चा रंगली आहे. यापूर्वीही पुतिन यांच्याबाबत दावे करण्यात आले आहेत. पुतिन यांचे रशियामध्ये तब्बल 11 डुप्लिकेट असून पुतिन त्यांना सार्वजनिक स्थळी पाठवतात. सार्वजनिक स्थळी सुरक्षेसाठी पुतिन असे डुप्लिकेट पाठवून काळजी घेत असल्याची माहिती आहे. आत्ताही अलास्काबाबत त्यांनी तोच प्रकार केल्याचे जाणकारांचे मत आहे. (International News)

पुतिन आणि ट्रम्प यांच्या अलास्का येथील भेटीमधून काहीही फलित निघालं नाही, मात्र आता या भेटीतील अनेक आश्चर्यकारक गोष्टींवर आता चर्चा सुरु आहे. त्यातील सर्वात मोठी चर्चा ही अलास्कामध्ये खरे पुतिन आले होते की खोटे, अशी आहे. कारण काही राजकीय अभ्यासक पुतिन यांनी ट्रम्पला भेटण्यासाठी अलास्कामध्ये बॉडी डबल पाठवले असल्याचे सांगतात. 15 ऑगस्ट रोजी झालेल्या या बैठकीमध्ये युक्रेनमधील युद्धबंदीवर चर्चा झाली. ही बैठक जिथे झाली ती जागा अमेरिकेचा एक भाग आहे. या अलास्काला प्रत्यक्ष खरे पुतिन गेलेच नव्हते. ते मास्कोमध्ये बसून त्यांनी पाठवलेल्या डुप्लिकेट पुतिनच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं संपर्कात होते. याचे उदारहण म्हणून पत्रकार परिषदेत, पुतिन यांनी पुढची मिटीग मॉस्कोमध्ये असे सांगितले तेव्हा स्वतः ट्रम्पही गोंधळल्याचे दिसत होते. पुतिन यांनी काही क्षणात पुढची मिटींग मॉस्कोमध्ये असे सांगितले होते. त्यामुळे अलास्कामध्ये असलेल्या पुतिन यांना कोणातरी बोलायला सांगत असल्याचे मत तज्ञ व्यक्त करीत आहेत. हे कोणीतरी म्हणजे, मॉस्कोमध्ये बसलेले खरे पुतिन या अलास्कामधील पुतिनला प्रॉम्पिटींग करत असल्याचे काहींना वाटत आहे. (Vladimir Putin)

व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत या डुप्लिकेट पुतिनच्या चर्चा सुरु झाल्या, यासाठी अलास्कामधील बैठकीदरम्यान पुतिन यांच्या चेह-यावरील हावभाव दाखवण्यात येत आहेत. अलास्कामध्ये ट्रम्पला भेटलेल्या व्यक्तीचे गाल भरलेले होते आणि तो आवश्यकतेपेक्षा जास्त आनंदी दिसत असल्याचे एका तज्ञानं सांगितलं आहे. तर दुस-या एका जाणकारानं अलास्कामध्ये आलेले पुतिन हे पुतिनचे बॉडी डबल नंबर 5 असल्याचे सांगितले आहे. पुतिन यांच्याकडे असे 11 डुप्लिकेट आहेत. त्यातील पाच नंबरच्या डुप्लिकेटला त्यांनी अलास्काला पाठवल्याची थेअरी काहींनी सांगितली आहे. यानुसार अलास्कामधील पुतिन ख-या पुतिनसारखे दिसत नव्हते. खरे पुतिन अनेकदा चालतांना आपला उजव्या हात स्थिर ठेवतात. ही शैली प्रत्यक्षात त्याच्या केजीबी प्रशिक्षणाशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की, सोव्हिएत सुरक्षा एजन्सीमध्ये, एजंटना शस्त्राचा हात नेहमी जवळ आणि स्थिर ठेवण्यास शिकवले जाते. (International News)

================

हे देखील वाचा : Donald Trump : RIC ची ताकद ट्रम्पना रोखणार !

================

जेणेकरून गरज पडल्यास बंदूक ताबडतोब बाहेर काढता येईल. पण अलास्कामधील पुतिनचे दोन्ही हात सारखे हलत होते. याशिवाय पुतिनचे गाल जाड असल्याचेही काही फोटोमधून दाखवण्यात आले आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत अनेक गुढ कथा सांगितल्या जातात. त्यापैकीच त्यांच्या डुप्लिकेटची कथा आहे. मुळात गुप्तहेर असलेले पुतिन हे आपल्या सुरक्षेसाठी कायम सतर्क असतात. यासाठीच त्यांनी आपल्यासारख्याच दिसणारे डुप्लिकेट त्यांनी गोळा केले आहेत. जिथे पुतिन यांच्या जीवाला धोका असेल, तिथे हे डुप्लिकेट पुतिन पाठवण्यात येतात. आता अशाच एका डुप्लिकेटला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादेमिर पुतिन म्हणून अलास्काला पाठवण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. (Vladimir Putin)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.