Home » BJP : भाजपचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांची माहिती

BJP : भाजपचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांची माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Share

जुलै महिन्यात अचानक जगदीप धनखड यांनी त्यांच्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आरोग्याचे कारण सांगत आपला राजीनामा सादर केला. येत्या त्यामुळे ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर पडेल याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात होते. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून बीजेपी कोणाला उभे करणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर बीजेपीने त्यांचा उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेत सीपी राधाकृष्णन यांचे नाव उपराष्ट्रपती उमेदवारासाठी घोषित केले आहे. (BJP)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संसदीय बोर्डाच्या बैठकीत सर्व सहमतीने हा निर्णय घेण्यात आला. सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहे. याआधी त्यांनी झारखंडच्या उपराज्यपाल पदाची देखील जबाबदारी सांभाळली आहे. तसेच ते दोनदा लोकसभेचे खासदार म्हणूनही निवडून आले आहेत. राधाकृष्णन हे तामिळनाडूमधील अनुभवी व ज्येष्ठ नेते असून त्यांनी भाजपमध्ये दीर्घकाळ विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सीपी राधाकृष्णन कोण आहेत आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे जाणून घेऊया. (Marathi News)

सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन आहे. राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. त्यांनी कोइम्बतूर येथील चिदंबरम कॉलेजमधून बीबीए केले आहे. राधाकृष्णन १९७३ मध्ये वयाच्या १ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. कालांतराने ते जनसंघात सामील झाले आणि सक्रिय राजकारणात आले. ते सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. (Todays Marathi Headline)

सी. पी. राधाकृष्णन यांनी तामिळनाडूमधील V. O. चिदंबरम कॉलेज येथे शिक्षण घेतले आणि बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन पदवी संपादन केली. बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या शिक्षणामुळे त्यांच्यात व्यवस्थापन, धोरण आखणी आणि संघटनकौशल्य विकसित झाले. या शिक्षणाचा उपयोग त्यांनी राजकीय व प्रशासकीय कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात केला. कोयर बोर्डच्या अध्यक्षपदावर असताना निर्यातीतील विक्रमी वाढ किंवा राज्यपाल म्हणून प्रशासनाशी प्रभावी संवाद साधतात त्यांना त्यांच्या शिक्षणाचा खूप उपयोग झाला. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी कोइम्बतूरच्या व्ही.ओ. चिदंबरम कॉलेजमधून बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) केले आहे. राधाकृष्णन हे त्यांच्या कॉलेजमध्ये टेबल टेनिस चॅम्पियन आणि लांब पल्ल्याचे धावपटू होते. त्यांना क्रिकेट आणि व्हॉलीबॉल खेळायलाही आवडते. (Top Marathi News)

बराच काळ कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतर, १९९४ मध्ये त्यांना तामिळनाडू भाजपचे सचिव म्हणूनही नियुक्त करण्यात आले. १९९८ आणि १९९९ असे दोन वेळा ते निवडून गेले होते. मात्र त्यानंतर २००४, २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांना लागोपाठ तीन वेळा कोईंबतूर मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता. २००७ मध्ये ते तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यावेळेस त्यांनी राज्यात ९३ दिवसांची १९,००० किलोमीटरची यात्रा केली होती. यात त्यांनी मुख्यत: नदी जोडो, दहशतवाद, समान नागरी कायदा, अस्पृश्यता आणि व्यसनाचे दुष्परिणाम यासारख्या मुद्द्यांवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर देखील त्यांनी २८० किलोमीटर आणि २३० किलोमीटरच्या दोन यात्रा काढल्या होत्या. (Top Trending News)

१८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सी. पी. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. सीपी राधाकृष्णन यांची दक्षिण भारतातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांमध्ये गणना केली जाते. तामिळनाडू आणि केरळसह इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गेल्या पाच दशकांपासून ते आरएसएस, जनसंघ आणि भाजपाशी जोडलेले आहेत. त्यांच्या राजकीय अनुभवाची दखल घेत त्यांना २०२३ साली झारखंडचे राज्यपाल बनवण्यात आले होते. (Latest Marathi News)

तमिलिसाई सुंदरराजन यांच्या राजीनाम्यानंतर १९ मार्च २०२४ पासून त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. अवघ्या चार महिन्यांत त्यांनी राज्यातील सर्व २४ जिल्ह्यांना भेट देऊन थेट नागरिक आणि प्रशासनाशी संवाद साधला. तसेच, त्यांनी तेलंगणा आणि पुद्दुचेरीमध्ये अतिरिक्त कार्यभार सांभाळला. राधाकृष्णन हे ३१ जुलै २०२४ पासून महाराष्ट्राचे २४ वे आणि सध्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. (Top Marathi stories) 

========

हे देखील वाचा : Religions : सर्वच धर्म इथे नांदतात, इतरांपेक्षा भारत युनिक कसा?

=========

दरम्यान उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट २०२५ असून, उपराष्ट्रपती पदाची निवडणुक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. एनडीएनं उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णनन यांचे नाव जाहीर केले आहे. एनडीएकडे ३९२ या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त संख्याबळ आहे. एनडीएच्या खासदारांचे संख्याबळ ४२७ आहे. आता त्यांच्याविरोधात इंडिया आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार ते पाहणे महत्वाचे असेल. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.