Home » Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर देखील आहे कोट्यवधी संपत्तीचा धनी

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर देखील आहे कोट्यवधी संपत्तीचा धनी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Arjun Tendulkar
Share

सचिन तेंडुलकरच्या लेकाचा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला. याबद्दल मीडियामध्ये बातम्या येताच चर्चांना उधाण आले आहे. टीव्हीपासून सोशल मीडियापर्यंत सर्वच ठिकाणी फक्त आणि फक्त अर्जुन आणि सानिया यांच्याबद्दलच्याच बातम्या ऐकायला, पाहायला मिळत आहेत. सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या दमदार खेळाने संपूर्ण जगामध्ये लोकप्रियता मिळवली. याच खेळाने त्याला ‘क्रिकेटचा गॉड’ ही ओळख देखील दिली. सचिनचा मुलगा आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. (Arjun Tendulkars)

सचिनने त्याच्या खेळाने लोकप्रियता मिळवत कोट्यवधींची संपत्ती देखील जमा केली आहे. मात्र आता त्याचा मुलगा अर्जुन लाइमलाईट्मधे आला आहे. अर्जुन देखील क्रिकेटमध्ये त्याचे करियर जमवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या अर्जुन गोव्याकडून रणजी क्रिकेट खेळत असून, तो आयपीएलमध्ये देखील मुंबई इंडियन्सकडून खेळतो. अर्जुनने देखील आता बऱ्यापैकी संपत्ती कमावली आहे. (Marathi News)

अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा सानिया चांडोकशी झाला आहे. दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला आहे. अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून वडिलांप्रमाणेच अर्जुननेही लहानपापासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे. अर्जुन मुंबईत त्याच्या आईवडिलांसोबत आलिशान घरात राहतो, तर त्याच्या वडिलांचे लंडनमध्येही एक आलिशान घर आहे. (Todays Marathi Headline)

Arjun Tendulkar

माध्यमांच्या वृत्तानुसार, अर्जुन तेंडुलकरची एकूण संपत्ती सुमारे २२ कोटी आहे. IPL मधून त्याने सर्वाधिक कमाई केली आहे. IPL २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला बेस प्राईस २० लाखांमध्ये घेतले. २०२२ मध्ये पुन्हा ३० लाखांना विकत घेतले. गेल्या ५ वर्षांत अर्जुनने IPL मधून सुमारे १ कोटी ४० लाख कमावले आहेत. रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 मध्येही तो गोव्यासाठी खेळतो. घरगुती क्रिकेटमधून तो दरवर्षी सुमारे १० लाख कमावतो. त्याची वार्षिक कमाई अंदाजे ५० लाख आहे, ज्यात ७५-८०% उत्पन्न IPL मधून येते. मुंबईतील ६००० स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या घरात अर्जुन आपल्या वडिलांसोबत राहतो. 2007 मध्ये 39 कोटींना विकत घेतलेल्या या घराची आजची किंमत सुमारे 100 कोटी झाली आहे. तसेच सचिन तेंडुलकरकडे लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडजवळ अपार्टमेंट असून, तिथे कुटुंबीय उन्हाळ्यात सुट्टीसाठी जातात. (Latest Marathi News)

अर्जुन तेंडुलकरकडे एकापेक्षा एक अशा शानदार कारचे कलेक्शन आहे. त्याचे वडिल सचिन तेंडुलकर यांच्याकडेही एकापेक्षा एक लग्जरी कार आहेत. रिपोर्टनुसाार अर्जुन आणि सचिनकडे किआ कॅरेन्स, पोर्श कायेन, बीएमडब्ल्यू i8, निसान GTR, फेरारी मोडेना, मर्सिडीज एएमजी C36 सह आणखीही महागड्या कार आहेत. (Top Trending News)

तर दुसरीकडे अर्जुनच्या होणाऱ्या बायकोच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, सानिया चंडोक ही एक प्राण्यांची चाहती आहे. तिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स बिझनेस मॅनेजमेंटमधून पदवी मिळवली. सानिया चंडोकने एक मोठे लग्जरी पेट स्पा ओपन केले आहे. या स्पा सेंटरचे नाव Mr. Paws Pet Spa & Store LLP असे असून, यातून सानिया एका वर्षात जवळपास ९० लाखांची कमाई करते. (Top Marathi News)

==========

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने उरकला साखरपुडा; जाणून घ्या कोण त्याची होणारी बायको?

Tendulkar : तेंडुलकरांचे व्याही होणाऱ्या कुटुंबात व्यवसायावरून आहे मोठा वाद

==========

या स्पा सेंटरमध्ये कुत्रा आणि मांजरसारख्या पाळीव प्राण्यांवर उपचार केले जातात. कोरियन आणि जापनीज पद्धतीने पाळीव प्राण्यांवर उपचार केले जातात, तसेच उपचार या स्पा सेंटरमध्ये करता येतात. सानिया स्वत: पेट्स स्पा सेंटरमध्ये असते, तिला पाळीव प्राण्यांची काळजी घ्यायला आवडते. दरम्यान तिचे कुटुंब मुंबईतील नामवंत व्यावसायिक आहेत. तिचे आजोबा रवी घई हे ग्रॅव्हिस ग्रुपचे मालक आहेत. ते मिळून अनेक व्यवसाय चालवतात. हाच ग्रुप ब्रुकलिन क्रीमरी आणि बास्कीन-रॉबिन्स इंडिया नावाचे आइस्क्रीम ब्रँड चालवतो. तिच्या कुटुंबाचं इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल देखील आहे. त्यांनी असंख्य कोटींची उलाढाल आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.