Success Story : नेसकॅफे (Nescafé) ही जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉफी ब्रँड्सपैकी एक आहे. तिची सुरुवात १९३० च्या दशकात झाली आणि ही संकल्पना साकारली नेस्ले (Nestlé) या स्वित्झर्लंडमधील बहुराष्ट्रीय खाद्यपदार्थ कंपनीने. त्या काळात ब्राझीलमध्ये कॉफीचं प्रचंड उत्पादन होतं, मात्र त्याचा साठा नासू लागला होता. त्यामुळे ब्राझील सरकारने नेस्ले कंपनीला विनंती केली की, कॉफीचा दीर्घकाळ टिकणारा आणि सोपा पर्याय विकसित करावा. या मागणीनंतर नेस्लेच्या शास्त्रज्ञांनी सातत्याने संशोधन सुरू केलं.
१९३८ मध्ये नॅसकॅफेचा जन्म झाला. नेस्लेचे अन्नतज्ज्ञ मॅक्स मॉर्गेंटालर (Max Morgenthaler) यांनी अखेर एक अशा प्रकारची प्रक्रिया विकसित केली, ज्यामुळे कॉफीचे द्रव स्वरूप वाळवून त्याचा पावडर तयार करता आली. ती पावडर गरम पाण्यात मिसळताच अगदी ताजी कॉफी मिळू लागली. याचं नाव ठेवलं गेलं “नेसकॅफे”, जे “नेस्ले” आणि “कॅफे” या दोन शब्दांपासून तयार करण्यात आले आहे.

Success Story
नेसकॅफेला सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर यश आलं नाही, पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैनिकांना झटपट आणि टिकाऊ कॉफीची गरज होती. त्याच वेळी नेसकॅफेने बाजारात जोरदार तग धरला. युद्ध संपल्यानंतरही सैनिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात नेसकॅफेचा वापर सुरूच ठेवला. त्यामुळे नेसकॅफे घराघरात पोहोचला आणि लोकप्रिय झाला. त्यानंतर वेगवेगळ्या देशांमध्ये नेसकॅफेने विविध प्रकारच्या स्वादांसह उत्पादने सादर केली – जसं की क्लासिक, गोल्ड, कॅपुचिनो, कोल्ड कॉफी, इत्यादी.
==========
हे देखील वाचा :
Success Story : नावावरुनच प्रसिद्ध झाला टुथपेस्टचा ब्रँड, वाचा Colgate च्या यशाची कथा
सुपम माहेश्वरी यांनी असा उभारला FirstCry चा व्यवसाय, वाचा Success Story
Success Story : ‘मसाला ते लज्जतदार लोणच्यांपर्यंत’, वाचा पुण्यातील बेडेकर कुटुंबाची यशोगाथा
=========
आज नेसकॅफे ही फक्त एक ब्रँड नाही, तर अनेक लोकांसाठी “एक दिवसाची सुरुवात” आहे. विविध जाहिराती, सोशल मीडिया मोहिमा, आणि जागतिक दर्जाचे उत्पादन यामुळे नेसकॅफेने आपला जागतिक ब्रँड म्हणून ठसा उमटवला आहे. विशेषतः तरुणांमध्ये “नेसकॅफे कॉर्नर” आणि “#ItAllStartsWithNescafe” सारख्या कॅम्पेनने नवा उत्साह निर्माण केला.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics