Home » Trump : डोनाल्ड ट्रम्प क्रॉनिकल व्हेनस इनसफीशियन्सी आजाराने ग्रस्त, जाणून घ्या या आजाराबद्दल

Trump : डोनाल्ड ट्रम्प क्रॉनिकल व्हेनस इनसफीशियन्सी आजाराने ग्रस्त, जाणून घ्या या आजाराबद्दल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Trump
Share

डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून सतत विविध कारणांमुळे चर्चेत येत आहेत. त्यांनी अनेक विचित्र आणि नवनवीन नियम लागू करत केवळ अमेरिकेत नाही तर संपूर्ण जगामध्ये लाइमलाइट मिळवले आहे. मात्र सध्या ट्रम्प हे एका वेगळ्याच कारणामुळे गाजत आहे. झाले असे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही आठवड्यांपासून एका गंभीर आजाराने त्रासले आहे. त्यांना काही दिवासांपासून पायांच्या खालच्या भागात सतत सूज येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी या सूज आणि वेदनेमागील कारण शोधण्यासाठी त्यांच्या काही चाचण्या केल्या. अखेर त्यांच्या सर्व तपासणीनंतर त्यांना क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी आजार असल्याचे लक्षात आले आहे. (Marathi News)

व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्या आजाराबद्दल माहिती देताना सांगितले की, ७९ वर्षीय ट्रम्प हे क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी नावाच्या आजाराने ग्रस्त असून या आजारामुळे त्यांच्या पायांना सूज आणि हातांवर जखमा दिसत आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, हा आजार नक्की काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यावर उपचार शक्य आहेत का, आणि असतील तर ते कोणते? या आजाराचा धोका कोणाला असू शकतो? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून जाणून घेऊया. (Top Trending News)

क्रॉनिक व्हेनस इन्सुफिशिन्सी म्हणजे काय?
एका माहितीनुसार क्रॉनिक व्हेनस इन्सुफिएंसी हा एक प्रकारचा रक्तवहिन्याशी संबंधी विकार आहे. जेव्हा पायांच्या नसा खराब होतात आणि त्या योग्यरित्या काम करणे थांबवतात, तेव्हा निर्माण होणाऱ्या समस्येला क्रॉनिक व्हेनस इन्सुफिशिन्सी असे म्हणतात. या आजाराने पीडित व्यक्तीच्या पायांच्या नसा हृदयाकडे योग्यरित्या रक्त वाहून नेऊ शकत नाहीत.(Todays Marathi HEadline)

Trump

यामुळे रक्त हृदयाकडे जाण्याऐवजी पायांमध्ये जमा होऊ लागते. यामुळे नसांमध्ये दाब वाढू शकतो. यामुळे सूज येणे किंवा जखम होणे यासारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये ही समस्या जास्त आढळून येते. भारतात देखील या आजाराचे अनेक रुग्ण आहेत. जगातील १० ते ३५% प्रौढांना ही समस्या असते. भारतातही, प्रत्येक तीन प्रौढांपैकी एकाला क्रॉनिक व्हेनस इन्सफीशियन्सी असते, तर ४-५% लोकांमध्ये त्याची लक्षणे गंभीर स्वरूपात दिसून येतात. (Latest Marathi News)

क्रॉनिक व्हेनस इन्सफीशियन्सी आजारावर उपचार केले नाहीत तर पायांच्या नसांमधील दाब खूप जास्त वाढतो आणि यामुळे सर्वात लहान रक्तवाहिन्या म्हणजेच केशिका फुटू लागतात. यामुळे, त्वचेवरील त्या भागाचा रंग लाल-तपकिरी होऊ लागतो आणि तो भाग थोडीशी दुखापत किंवा ओरखड्याने देखील फुटू शकतो. जर केशिका फुटल्या तर त्या भागात सूज येऊ शकते, त्वचेच्या आतील भागाला नुकसान होऊ शकते, त्वचेवर उघडे फोड येऊ शकतात. भविष्यात सेल्युलायटिस होण्याची देखील भीती असते. वेळेवर उपचार न केल्यास ही स्थिती धोकादायक बनू शकते. (Top Stories)

========

हे देखील वाचा : Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लाल टायच का घालतात?

========

क्रॉनिक व्हेनस इनसफीशन्सची लक्षणे कोणती?
पायांमध्ये तीव्र वेदना, जडपणा किंवा मुंग्या येणे, सुई टोचल्यासारखे वाटणे, दिवसाच्या शेवटी किंवा बराच वेळ उभे राहिल्यानंतर पाय किंवा घोट्यांमध्ये सूज येणे रात्री पायात पेटके येणे, पायाच्या त्वचेचा रंग बदलणे, त्वचेला खाज सुटणे, त्वचा कडक होणे, त्वचेवर सालासारखा थर येणे.

क्रॉनिक व्हेनस इनसफीशन्सचा धोका टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी, नियमित व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे, जास्त वेळ उभे राहणे किंवा बसणे टाळणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.