Home » Dholavira 5000 वर्षांपूर्वी हरवलेलं रहस्यमयी शहर !

Dholavira 5000 वर्षांपूर्वी हरवलेलं रहस्यमयी शहर !

by Team Gajawaja
0 comment
Dholavira | Marathi News
Share

ब्रिटिशांना नेहमी वाटायचं की, भारताचा इतिहास जास्तीत जास्त गौतम बुद्धांच्या काळापर्यंत जातो, त्याच्या आधी या देशाचं काहीच अस्तित्व नव्हतं. त्यामुळे ब्रिटीश आपल्या भारतीयांना षंढ आणि अडाणीच मानायचे… पण १९२० च्या दशकात भारतात दोन असे शहर सापडले, ज्यामुळे अख्ख जगच हादरलं… भारताचा इतिहास थेट १० हजार वर्ष मागे फेकला गेला. (Dholavira)

जी लोकं, ग्रीक, मेसोपोटामिया, चायनीज संस्कृतीला सर्वात जूनं मानत होती, ती आता पार चाट पडली होती… ती शहरं म्हणजे हडप्पा आणि मोहनजोदडो आणि ती संस्कृती म्हणजे सिंधू सरस्वती संस्कृती… भारतात चक्क एक भली मोठी संस्कृती नांदत होती, जी लोकं प्रचंड प्रगत तर होतीच पण यासोबतच त्यांचा जगभरात व्यापारसुद्धा सुरु होता. (Top Stories)

आता भारताकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टीकोन बदलला होता. त्यानंतर अशी अनेक प्राचीन शहर सापडत गेली. पण त्यानंतर काही वर्षांनी, म्हणजे 1956 मध्ये, गुजरात कच्छच्या रण भागात एक असं शहर सापडलं ज्याने भारताचा इतिहास आणखीनच बदलला. त्या शहराचं नाव होतं धोलावीरा ! तसं हे काही साधंसुधं शहर नव्हतं, हे हडप्पा सभ्यतेचं पाचवं सगळ्यात मोठं शहर होतं, तब्बल 100 हेक्टरपेक्षा जास्त पसरलेलं. आणि इथल्या गोष्टी आजही आपल्याला थक्क करतात. आशियातलं सगळ्यात मोठं जलाशय, मॉडर्न टाउन प्लॅनिंग आणि बरेच रहस्य, हे शहर नक्की होतं काय? इथं काय सापडलं? आणि हे शहर कसं हरवलं? चला, जाणून घेऊ. (Dholavira)

Dholavira

गुजरात कच्छच्या रण भागात, 120 किलोमीटर अंतरावर, वसलेलं आहे धोलावीरा. 5000 वर्षांपूर्वी, हे धोलावीरा वसवण्यात आलं होतं आणि काही वर्षानंतर हे एक भलंमोठं शहर बनलं होतं. मातीच्या भक्कम भिंतींनी घेरलेलं, मोठमोठ्या दगडांनी सजलेलं, आणि दोन भव्य प्रवेशद्वार असं हे शहर होतं. इथली टाउन प्लॅनिंग हडप्पाच्या इतर शहरांपेक्षा खूपच वेगळी होती.– एक चार भिंतींनी घेरलेला भाग आणि दुसरा खुल्या मैदानाचा भाग. चार भिंतींच्या भागात तीन उपविभाग होते – सिटेडल म्हणजे किल्ला, मिडल टाउन आणि लोअर टाउन. लोअर टाउनमध्ये माणसं मण्यांचे दागिने, शंख आणि मातीची भांडी बनवायचे. इथल्या प्रवेशद्वारांसाठी त्या भागात उपलब्ध असलेल्या चुनखडीचा वापर झाला होता, आणि हे शहर प्रॉपर प्लॅनिंगने वसवण्यात आलं होतं की ते पाहून थक्क व्हायला होतं! (Top Stories)

धोलावीरा दोन नद्यांच्या मध्ये  वसलेलं होतं – मन्सर आणि मन्सरंगा. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून इथल्या लोकांनी कमाल केली होती. त्यांनी नद्यांचं पाणी अशा पद्धतीने साठवलं होतं की सगळे जलाशय एकमेकांशी जोडलेले होते. म्हणजे कुठंही पाण्याची कमतरता येणार नाही! याचबरोबर, नद्यांचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी चेक डॅम्स बनवले होते. या जलाशयांची खोली तब्बल 7 मीटर होती, आणि त्यांच्या स्वच्छतेसाठी पायऱ्यांची सोयही होती. खरंच, धोलावीराचं जलाशय हे दक्षिण आशियातलं सगळ्यात मोठं जलाशय आहे! (Dholavira)

इथली सोसायटीसुद्धा खूपच सभ्य होती. माणसं वेगवेगळ्या वर्गांत विभागलेली होती – व्यापारी, शेतकरी, इंजिनीअर्स, शिक्षक. सगळ्यांनी मिळून हे शहर उभं केलं होतं. इथं दोन मोठी मैदानं होती – एक बाजारासाठी आणि दुसरं खास प्रसंगांसाठी. याचबरोबर, हडप्पा सभ्यतेतलं सगळ्यात मोठं आणि जुनं स्मशान इथं सापडलं, जे 3200 ते 2600 बीसीपर्यंत वापरलं गेलं म्हणजे आजपासून 4600 ते 5200 वर्षांपूर्वी. खाणकामात इथं एक पूर्ण मानवी सांगाडा सापडला, ज्याचं डोकं आणि दात अगदी व्यवस्थित होते. त्याच्याबरोबर 100 हून जास्त बांगड्या, शंखाचे मणी, मातीची भांडी, आणि कार्नेलियनसारखे दगड सापडले, ज्याचा वापर मणी बनवण्यासाठी व्हायचा. (Top Stories)

================

हे देखील वाचा :  Indian Laws : परवाना असलेल्या बंदुकीने हत्या केल्यास काय शिक्षा होते? काय सांगतो भारतीय कायदा?

================

मग हे शहर हरवलं कसं इथली लोकं कुठे गेली? असं म्हणतात, की हडप्पा सभ्यतेच्या इतर शहरांप्रमाणे धोलावीरा चाही ऱ्हास झाला. याचं सगळ्यात मोठं कारण होतं जलवायू परिवर्तन. घग्गर आणि हाक्रा नद्या हळूहळू सुकायला लागल्या, आणि पाण्याची कमतरता भासू लागली. शेवटी, लोकांना हे भव्य शहर सोडून जावं लागलं, जे त्यांनी इतक्या मेहनतीने उभं केलं होतं. (Dholavira)

आज धोलावीरा भारतातलं सगळ्यात प्रगत हडप्पा साईट मानलं जातं. इथली टाउन प्लॅनिंग, ड्रेनेज सिस्टीम, जलाशयं – सगळं काही खास आहे. पुढे कदाचित अजून काही पुरावे सापडतील, जे हडप्पा सभ्यतेचे रहस्य उलगडतील. पण तोपर्यंत, ही आहे धोलावीरची गोष्ट! ती तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.