डिप्रेशन, मानसिक आजार यामुळे एखाद्याच्या आयुष्यवर किती वाईट परिणाम होऊ शकतो, याचं एक उदाहरण म्हणजे नवी मुंबईतील जुईनगर येथे घडलेली घटना. सेक्टर २४ मधील घरकुल सोसायटीत एका NGOची काही माणसं सेक्टर एका फ्लॅटमध्ये आत शिरले, तेव्हा मोठी दाढी आणि केस वाढलेला एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसला. त्याच्या आजूबाजूला सगळीकडे कचरा साठला होता, फ्लॅटमधून घाण वास येत होता, त्याच्या पायाला खूप जखमा झाल्या होत्या, त्यामुळे त्याच्या पायाला इन्फेक्शन झालं होतं आणि याच अवस्थेत अनुप कुमार नायर नावाचा माणूस घराचा दरवाजा बंद करून राहत होता. (From Rags to Riches)
जेव्हा या गोष्टीचा तपास झाला, तेव्हा काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अनुपने स्वतःला ३ वर्ष फ्लॅटमध्ये कोंडून घेतलं होतं. त्याचा बाहेरच्या जगाशी काहीच संबंध नव्हता. फक्त डिलीवरी बॉय जेवण घेऊन यायचा, तेवढाच काय तो त्याचा संबंध बाहेरच्या माणसाशी व्हायचा. आणखी एक गोष्ट म्हणजे तो इंजीनियर होता आणि सहा वर्षांपूर्वी तो सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर म्हणून काम करायचा. आता सध्या तो एक आश्रमात सुरक्षित आहे, पण अनुपने स्वतःची अशी हालत करून घेण्यामागचं नेमकं कारण काय? चौकशीत नेमक्या कोणत्या गोष्टी समोर आल्या? हे सगळं आपण जाणून घेऊ. (Top Stories)
अनुप कुमार नायर, वय वर्ष ५५, हा जुईनगरमधल्या घरकुल सोसायटीमध्ये राहायचा. त्याची आई इंडियन एयर फोर्सच्या टेलीकम्यूनिकेशन ब्रांच मध्ये काम करायची आणि त्याचे वडील मुंबईच्या टाटा हॉस्पिटल मध्ये काम करायचे. साधारण ६ वर्षांपूर्वी त्याच्या आई वडिलांचं निधन झालं. त्याला एक भाऊ सुद्धा होता. पण त्याने २० वर्षांपूर्वी आत्महत्या करून स्वतःचं आयुष्य संपवलं. या दोन्ही घटनांचा, परिणाम अनुपच्या मानसिकतेवर व्हायला लागला. त्याला डिप्रेशन यायला लागलं. त्यातच त्याने स्वतःला कोंडून घेतलं आणि एकटाच त्याच्या फ्लॅट मध्ये राहायला लागला. त्याने जगाशी संपर्क तोडून टाकला. तो फक्त ऑनलाइन फूड ऑर्डर करायचा आणि फूड डीलीवरी बॉय यायचा, तेवढ्यापुरतं तो दार उघडायचा, एवढंच काय तो त्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क. त्याला त्याच्या नातेवाइकांनी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण अनुपने सगळ्यांशी संपर्क तोडला आणि एकटा राहायला लागला. तब्बल तीन वर्ष त्याने डिप्रेशनमध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं. (From Rags to Riches)
या अनुपच्या सिचुएशनबद्दल पनवेलच्या सोशल अँड इव्हँजेलिकल असोसिएशन फॉर लव्ह (SEAL) या संस्थेला माहिती मिळाली. ही संस्था मुंबई आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर आणि रस्त्यांवर आढळणाऱ्या बेघर, हरवलेल्या, आजारी लोकांना त्यांच्या दुरवस्थेतून बाहेर काढते, त्यांची काळजी घेते आणि त्यांचं पुनर्वसन करते. त्यांना अनुपची माहिती मिळाल्याबरोबर NGOचे कार्यकर्ते त्याला त्याच्या दयनीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी जुईनगरमधील घरकुल सोसायटीतील त्याच्या फ्लॅटवर पोहोचले. (Top Stories)
NGOची माणसं जेव्हा घरात शिरली, तेव्हा घरभर फक्त कचरा, घाण वास होता. खुर्चीवर बसलेल्या अनुपचे पाय बघवणार नाहीत असे झाले होते. त्याच्या दोन्ही पायांना इन्फेक्शन झालं होतं. अनुपच्या शेजाऱ्याने सांगितलं की, “आम्हाला, सोसायटीच्या सदस्यांना कधी कधी त्याला कचरा बाहेर काढायला मदत करायला मनवावं लागायचं, आम्ही त्याच्या आई वडिलांची फिक्स्ड डिपॉजिटची रक्कम त्याच्या खात्यात ट्रान्सफर करायला त्याला मदत केली होती.” त्यानंतर ते असंही म्हणाले, त्याच पैशावर तो ऑनलाइन ऑर्डर करायचा आणि पोट भरायचा.(From Rags to Riches)
================
हे देखील वाचा : South Korea : कोरियन लोकांचं कनेक्शन अयोध्यासोबत !
================
आता सुदैवाने NGOच्या लोकांनी अनुपला त्याच्या फ्लॅटमधून सुखरूप बाहेर काढलं. तो आता SEALच्या पनवेल येथील आश्रमात आहे. त्याच्यावर उपचार सुरू झालेत. उपचारादरम्यान अनुप म्हणाला, “सध्या माझे कोणी मित्र नाहीत आणि आई-वडील आणि भाऊ यांचा आधीच मृत्यू झाला आहे, माझ्या खराब आरोग्यामुळे मला नवीन नोकरी मिळू शकत नाही. माझी तब्येत चांगली नाही. त्यामुळे नवीन सुरुवात करण्याची संधी नाही.” त्याच्या मानसिक आरोग्यात सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टर आणि NGO काम करत आहे. उपचारामुळे त्याच्यात काही प्रमाणात चांगले बदल झालेत. पण त्याची मानसिक अवस्था अजूनही नाजुक आहे. लवकरच त्याच्या मानसिक आरोग्यात सुधारणा होईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या प्रकरणानंतर त्यांनी लोकांना असंही आवाहन केलं की, अनुप सारख्या प्रकरणांकडे दुर्लक्ष करू नका. शारीरिक आरोग्य तर महत्त्वाचं आहेच, पण मानसिक आरोग्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोणी एकटेपणात, दुखात किंवा निराशेत असेल, तर त्यांच्याशी बोला, त्यांना आधार द्या. समाजात या बाबतीत जनजागृती वाढली पाहिजे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics