Home » ‘पिंकीची विषय असो’ मालिकेत दिसणार ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा भाऊ

‘पिंकीची विषय असो’ मालिकेत दिसणार ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा भाऊ

by Team Gajawaja
0 comment
Pinkycha Vijay Aso
Share

स्टार प्रवाहवर नव्याने सुरु झालेल्या ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये  उत्सुकता आहे… या मालिकेत पिंकीचा अगदी जवळचा मित्र, जो कालांतराने पिंकीवर एकतर्फी प्रेम करताना दिसेल असं बंटी हे पात्र पाहायला मिळणार आहे. बंटी हा एक मस्तमौला तरुण आहे. याच बंटी या तरुणाचं पात्र साकारणार आहो अधोक्षज कऱ्हाडे. नानावरुन तुमच्या लक्षात आलंच असेल की अधोक्षज कऱ्हाडे हा संकर्क्षण कऱ्हाडेचा भाऊ आहे. संकर्षण कऱ्हाडेला आपण सध्या झी मराठी वरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत समीर ही भूमिका साकारताना पाहतोय. अधोक्षज हा संकर्षणचा लहान भाऊ आहे. यापूर्वी तो झी मराठीवरील अक्टिंग रिअॅलिटी शोमध्ये सहभागीही झालेला. तसंच त्याने छोटी मालकीण आणि लक्ष्य या मालिकांमध्येही त्याने काम केलंय.

या अनोख्या भूमिकेविषयी सांगताना अधोक्षज म्हणाला, ‘बंटी हे अतिशय कलरफुल पात्र आहे.. पिंकीवर मनापासून प्रेम करणारा आणि सतत तिच्यासाठी धडपडणारा असा हा बंटी. मालिकेची टीम खूप भन्नाट आहे. त्यामुळे काम करताना मजा येतेय. आम्ही साताऱ्यातल्या एका गावात काम करतोय. बंटी साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असेल.’

पिंकीचा विजय असो या मालिकेत शरयु सोनावणे पिंकीच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने शरयु मालिकासृष्टीत पदार्पण करणार आहे. शरयु उत्तम नृत्यांगना आहे.

आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अश्या ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.