Home » Salman Khan : सलमान खान अनेक वर्षांपासून करतोय ‘या’ गंभीर आजाराचा सामना, स्वतःच केला खुलासा

Salman Khan : सलमान खान अनेक वर्षांपासून करतोय ‘या’ गंभीर आजाराचा सामना, स्वतःच केला खुलासा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Salman Khan
Share

बॉलिवूडचा दबंग खान नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असतो. सध्या जरी सलमानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाल दाखवू शकले नसले तरी त्याची क्रेझ यत्किंचितही कमी झालेली नाही. सलमान नेहमीच मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर गाजत असतो. त्याचा अभिनय, त्याचे सिनेमे यासोबतच सलमानची अजून एक खास ओळख आहे, ती म्हणजे सलमान खानची पिळदार शरीरयष्टी. सलमान खान बॉलिवूडमधला सर्वात फिट अभिनेता म्हणून ओळखला जातो. मात्र त्याच्या या दमदार व्यक्तिमत्वामागे सलमानचा मोठा आणि गंभीर आजार. (Salman Khan)

सलमान खान एका गंभीर आजाराने त्रस्त असून, त्याचा हा आजार अतिशय दुर्मिळ आणि त्रासदायक आहे. सलमान खान मागील अनेक वर्षे एका आजाराशी झगडत आहे. हा आजार इतर आजारांसारखा नसून खूपच वेगळा आणि दुर्मिळ आहे.या आजारामध्ये होणाऱ्या वेदना म्हणजे जणू मरणयातनाच आहेत. या आजाराच्या वेदना इतक्या गंभीर स्वरूपाच्या असतात की रुग्णाला यातनांचा वेळी मरण यावे असेच वाटते. सलमानने त्याच्या या आजाराचा खुलासा कपिल शर्मा शो च्या एका भागात केला आहे. (Marathi News)

नुकताच कपिल शर्माचा लोकप्रिय शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सिझनची सुरुवात झाली. या सिझनचा पहिला भाग २२ जुन रोजी रात्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या नवीन सिझनचा पहिला पाहुणा होता अभिनेता सलमान खान. या एपिसोडमध्ये सलमान खान त्याच्या नेहमीसारख्याच मस्तीच्या मूडमध्ये दिसला. या भागात सलमान खानने त्याच्या लग्नापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक गोष्टींबद्दल खुलासे करत त्याचे विचार मांडले. यावेळीच सलमानने बोलताना त्याच्या आजाराबद्दल सर्वांना सांगितले.  (Top Stories)

आजाराबद्दल बोलताना सलमान म्हणाला की. “मी ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या आजाराशी लढत आहे. ज्यामुळे माझ्या तोंडात तीव्र वेदना होतात. एवढेच नाही तर माझ्या मेंदूमध्ये अ‍ॅन्युरिझम आहे आणि AVM (अर्जिओव्हेनस मॅलफॉर्मेशन) वरही उपचार सुरू आहेत. मी दररोज माझ्या हाडांना मालिश करुन घेत आहे. मला बऱ्याच शारीरीक अडचणी येत आहेत. तरीही माझे काम सुरू आहे. ‘एव्ही मालफॉर्मेशन’ आहे, तरी चालत आहे.” (Bollywood News)

Salman Khan

सलमान खानने या आजारामुळे त्याला काय काय सहन करावे लागते या आजारामुळे सलमानला चालणे, बोलणे आणि इतर सामान्य आयुष्यातील विविध कृती करणे देखील अवघड जात आहे. तरीसुद्धा सलमान काम करत आहे. शूटिंगमध्ये विविध स्टंट्स करतो, डान्स करतो, प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याबद्दल तो म्हणतो, “वेदना असल्या तरी शो थांबू देऊ नये” असे त्याला वाटते. (Top Marathi Headline)

सलमान खानची तब्येत जवळपास १३/१४ वर्षांपासून बिघडलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार २००७ च्या सुमारास जेव्हा तो पार्टनर सिनेमाची शूटिंग करत होता, तेव्हा त्याला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आजाराची लक्षणे दिसू लागली. त्याला अनेक वर्षे या आजाराचा त्रास सहन करावा लागत असला आणि तरीही तो सतत काम करत होता आणि अजूनही आहे. २०११ मध्ये तो त्याच्या उपचारासाठी अमेरिकेला देखील गेला होता. (Todays Marathi Headline)

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आजार नक्की आहे काय? 

ट्रायजेमिनल न्यूराल्जियाबद्दल सांगायचे झाले तर, या आजाराला “सुसाइड डिजिज” असे देखील म्हटले जाते. कारण या आजाराच्या व्यक्तीला चेहऱ्यावर तीक्ष्ण विद्युत शॉकसारखी वेदना होते. ब्रेन एन्युरिझम म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिनीत फुगवटा निर्माण होणे. जर हा फुगवटा फुटला तर तो प्राणघातक ठरू शकतो. दुसरीकडे, एव्ही विकृती म्हणजे मेंदूतील रक्तवाहिन्यांचे एक असामान्य नेटवर्क असते, ज्यामुळे झटके येणे आणि मेंदूत रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. हे आजार रक्तवाहिन्या आणि मेंदूशी संबंधित आहे. (Celebrity News)

ब्रेन एन्युरिझमचा सर्वात मोठा धोका किंवा दोष म्हणजे या आजाराची लक्षणे बरेच दिवस स्पष्ट समजून येत नाही. अनेकदा लोकं डोकेदुखी, थकवा किंवा डोळ्यांचा ताण याला सामान्य ताण मानून दुर्लक्ष करतात. मात्र जेव्हा परिस्थिती गंभीर होत जाते तेव्हा त्याला या आजाराचे गांभीर्य लक्षात येते. हा आजार लवकर लक्षात येणे खूपच आवश्यक असते. (Latest Marathi News)

ब्रेन एन्युरिझम आजाराची लक्षणे कोणती?
* अचानक आणि खूप तीव्र डोकेदुखी
* मानेत कडकपणा
* मळमळ किंवा उलट्या
* डोळ्यांमागे वेदना किंवा दाब
* दुहेरी दृष्टी किंवा अंधुक दृष्टी
* शुद्ध हरपणे किंवा झटके येणे

Salman Khan

या आजाराचा जास्त धोका कोणाला आहे?
* उच्च रक्तदाबाने ग्रस्त लोक
* धूम्रपान करणारे
* जास्त मद्यपान करणारे लोक
* कुटुंबात ब्रेन एन्युरिझमचा इतिहास
* ४०-६० वयोगटातील लोक

==============

हे देखील वाचा : The Story of Mana Village : भारतातील शेवटच्या गावाबद्दल माहितेय का ?

Blaise Metreweli : ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा कुठल्या महिलेच्या हातात ! 

==============

या आजारावर उपचार आहेत का?
तज्ज्ञांच्या मते, या आजारामुळे होणाऱ्या वेदना खूपच गंभीर आणि जास्त असतात. यादरम्यान वेदना इतकी असह्य असते की दात घासताना देखील त्रास होतो. तर चेहऱ्याची त्वचा इतकी संवेदनशील होते की त्याला स्पर्श केल्यानेही विजेचा झटका येतो. या आजारावर उपचार तसे आहेत. जर एन्युरिझम खूप लहान असेल तर शस्त्रक्रियाविरहित देखरेख करून आजार बरा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. शिवाय एंडोव्हस्कुलर कॉइलिंग नावाची एक कमीत कमी आक्रमक प्रक्रिया करून जिथे फुगा निर्माण झाला त्याला प्लॅटिनम कॉइलने सील केले जाते. तर सर्जिकल क्लिपिंग नावाची एक शस्त्रक्रिया करून कवटी उघडली जाते आणि रक्त प्रवाह थांबवण्यासाठी शिरावर एक क्लिप ठेवली जाते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.