तंत्रज्ञानाचा देश म्हणून ओळखल्या जपानमध्ये सध्या दोन भविष्यवाणींनी कर्फ्यू सारखी परिस्थिती ओढवली आहे. जपानमधील पर्यटन व्यवसाय 80 टक्के बंद असून येथे येणा-या परदेशी पर्यटकांची संख्या जवळपास 10 टक्यांवर आली आहे. यासह जपानच्या सोशल मिडियावरही याच भविष्यवाणींचा धुमाकूळ चालला असून येथील जनताही आता भयभीत होऊ लागली आहे. यातील पहिली भविष्यवाणी आहे, बाबा वेंगा यांची. बाबा वेंगा यांनी जुलै महिन्यात जपानमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप येणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. याला जोड म्हणून नवीन बाबा वांगा म्हणून ओळखल्या जाणा-या रियो तात्सुकी या मंगा कलाकाराच्या भाकीतानंही जपानमध्ये अस्थिरता निर्माण केली आहे. त्यांनी आहे. या दोन्ही भाकीतांतनी जपानमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. (Japan)
परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की, या भाकितामुळे, जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीदरम्यान जपान आणि हाँगकाँगहून इतर देशांना जाणाऱ्या विमानांच्या बुकिंगमध्ये 83 टक्के घट झाली आहे. जपानसह त्याच्या आसपासच्या देशांमध्येही अशीच परिस्थिती आहे. अर्थातच या सर्वांवर जपानच्या हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनीही या सर्व अफवा आणि खोटी माहिती असल्याचे सांगितले आहे. पण असे असले तरी, सध्या जपानी सोशल मिडियामध्येही या दोन्ही भाकितांबद्दल अनेक व्हिडिओ येत असून त्यामुळे येथील समुद्रकिना-यावरील हॉटेल आणि निवासस्थानेही खाली करण्यास सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात काय होणार, हा प्रश्न सध्या जपानमध्ये विचारला जात आहे. कारण नवीन बाबा वेंगा यांनी जपानबाबत एक भयानक भाकीत सांगितले आहे, त्यामध्ये जपानचा विनाश होणार असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे बहुतांश जपानी नागरिक याच भाकीताच्या भीतीखाली सध्या वावरत आहेत. (International News)
नवीन बाबा वेंगा हे जपानमधील मंगा कलाकार रियो तात्सुकी यांना म्हटले जाते. त्यांनी आत्तापर्यंत जी भाकीते सांगितली आहेत, ती खरी ठरल्यामुळे अनेक जपानी नागरिक त्यांच्या भाकीतांवर विश्वास ठेवतात. त्यापैकीच एक भाकीत 5 जुलैचे आहे. 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘द फ्युचर आय सॉ’ या पुस्तकात हे भाकीत करण्यात आले आहे. यामुळे जपानसह आशियायी देशांमध्ये सध्या चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रियो तात्सुकी यांनी लिहिले आहे की, 5 जुलै रोजी, जपान आणि फिलीपिन्स दरम्यान समुद्राच्या तळाखाली एक मोठी भेगा पडणार आहे. त्यातून लाव्हा बाहेर येईल. हा धक्का एवढा मोठा असेल की, त्यामुळे किनाऱ्यावर तोहोकू भूकंपापेक्षा तिप्पट उंच लाटा येतील. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही रियो तात्सुकी यांनी सांगितले आहे. (Japan)
1999 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द फ्युचर आय सॉ’ या पुस्तकाच्या माध्यामतून रियो यांनी अशी अनेक भाकीतेही सांगितली आहेत. अर्थात ती भाकीते खरी ठरल्यानं 5 जुलैच्या भाकीताबद्दल भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी 2011 च्या तोहोकू भूकंप आणि त्सुनामीसारख्या घटनांचे भाकीत केले होते. शिवाय राजकुमारी डायनाचा मृत्यू, फ्रेडी मर्क्युरीचा मृत्यू आणि कोविड-19 साथीचा आजार या त्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. या सर्वांचा जपानच्या पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. जपानला विमान तिकिटे बुक करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. (International News)
===========
हे देखील वाचा : Nicholas Aujula : ही भयानक भविष्यवाणी खरी झाली तर !
===========
ज्या पर्यटकांनी आधीच बुकिंग केले होते तेही आपले बुकिंग रद्द करत आहेत. हे बुकींग रद्द करण्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की, हाँगकाँग एअरलाइन्सने जुलै आणि ऑगस्टसाठी कागोशिमा आणि कुमामोटो सारख्या दक्षिण जपानी शहरांसाठी उड्डाणे स्थगित केली आहेत. आत्ताही जपानकडे जाणा-यांची संख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे विमान चालवणाऱ्या कंपन्यांच्या उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढले आहे. पुढच्या आठवड्यात ही सर्व उड्डाने रद्द होण्याची शक्यता आहे. वास्तविक जपानी चेरी ब्लॉसम काळात येथे येणा-या पर्यटकांची संख्या मोठी असते. पण या भाकीतांमुळे विमान कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. या सर्वात मियागी प्रांताचे गव्हर्नर योशिहिरो मुराई यांनी लोकांना अफवांकडे दुर्लक्ष करून शांत राहण्याचे आवाहन केले. जपान हवामान संस्थेचे संचालक रयोइची नोमुरा यांनीही असेच आवाहन केले आहे. (Japan)
सई बने