इराण म्हटलं की, इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते, अयातुल्ला खामेनी यांचे चित्र पुढे येते. मात्र बरोबर 54 वर्षापूर्वी इराणमध्ये राजेशाही होती. इराणवर मोहम्मद रझा शाह यांचे राज्य होते. त्यांचे शिक्षण पाश्चिमात्य देशात झाले होते. त्यांच्यावर पाश्चिमात्य विचारसरणीचा प्रभाव होता. त्यामुळेच तेव्हा इराणमध्ये बुरखा चक्क बॅन होता. महिला पाश्चिमात्य पेहराव घालत असत. इराणधील विद्यापिठांमध्ये मुलांसोबत मुलींनाही प्रवेश होता. इराणमध्ये आता जो धार्मिक कट्टरवाद आहे, त्याचा कुठलाही लवलेश तेव्हाच्या समाजजीवनावर नव्हता. मात्र 54 वर्षापूर्वी मोहम्मद रझा शाह यांनी एक शाही पार्टी आयोजित केली. ही शाही पार्टी, जगात आत्तापर्यंत झालेल्या सर्व पार्टीपेक्षा वेगळी होती. या पार्टीच्या तयारीसाठी तब्बल वर्षभराचा काळ लागला. (Iran)
इराणचे वैभव दाखवण्यासाठी झालेल्या या पार्टीत जगभरातले राजे-राण्या हजर होत्या. त्यांच्यासाठी इराणच्या वाळवंटात तात्पुरती पण खर्चिक निवासस्थाने उभारण्यात आली. फारकाय झाडं आणि पक्षी-प्राणीही अयात करण्यात आले. पाण्यासारखी दारू या पार्टीमध्ये होती. तर स्विझर्लंडचे खास आचारी या पार्टीसाठी आणले गेले होते. या पार्टीसाठी मोहम्मद रझा शाह यांनी त्यावेळी 100 दहशलक्ष डॉलर्सहून अधिक खर्च केला. हे सर्व होत असतांना दुसरीकडे इराणची जनता गरीबीत होती. पिण्यासाठी स्वच्छ पाणीही उपलब्ध होत नव्हतं. अशावेळी शाही पाहुण्यांवर होणारा अनाठायी खर्च पाहून इऱाणमध्ये राजघराण्याविरुद्ध असंतोष वाढला. त्याचीच परिणिती 1971 च्या इराणी क्रांतीमध्ये झाली. या क्रांतीनं इराणमधून राजेशाही संपुष्ठात आणली गेली, आणि खामेनींच्या हाती इराणची सत्ता आली. यानंतर इराणचे सर्व रुपच बदलले. जिथे बुरख्याला बंदी होती, त्याच इराणमध्ये बुरखा न घालणा-या महिलांवर भरचौकात चाबकाची फटके मारण्यात येऊ लागले. (International News)
जगातील सर्वात महागडी पार्टी कुठली, या प्रश्नाला 54 वर्षानंतरही इराणचे नाव घेतले जाते. इराणचे राजा मोहम्मद रझा शाह यांनी दिलेल्या पार्टीपुढे आत्ताच्या पार्ट्याही फिक्या पडाव्यात इतकी ती पार्टी शाही होती. 1941 मध्ये इराणची सूत्रे मोहम्मद रझा शाह यांच्या हाती आली. मोहम्मद रझा यांना इराणचे आधुनिकीकरण करण्याचे होते. त्यांनी पाश्चात्य पद्धती स्वीकारल्या. महिलांना स्वातंत्र दिले. हिजाबवर बंदी घातली. मात्र हे सगळं करत असतांना त्यांचे इराणच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. इराणमध्ये पिण्यासाठीही शुद्ध पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे जनतेमध्ये शाह विरोधात वातावरण तयार झाले. (Iran)
अशातच 1971 मध्ये त्यांनी पर्शियन साम्राज्याची 2500 वर्षे साजरी करण्यासाठी एक भव्य पार्टी करणार असल्याचे जाहीर केले. यासाठी पर्सेपोलिसच्या वाळवंटात जागा निश्चित करण्यात आली. येथेच प्राचीन राजा सायरस द ग्रेटची कबर होती. या पार्टीसाठी 65 देशांतील मान्यवरांना आमंत्रणे पाठवण्यात आली. त्यात देशभरातील राजे, देशाच्या राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व आणि हॉलिवड स्टारचाही समावेश होता. या पार्टीसाठी एवढी मोठी योजना तयार करण्यात आली की, ती योजना प्रत्यक्षात येण्यासाठी एक वर्षाचा अवघी लागला. यासाठी वाळवंटात एक अलिशान शहर उभारण्यात आले. यावर तब्बल 843 कोटी रुपये खर्च झाले. पार्टी शाही होती, त्यामुळे त्यासाठी कुक स्विझर्लंडमधून आणले गेले. पार्टीसाठी 18 टन अन्न शिजवण्यात आले. त्यात देश-विदेशातील पदार्थांचा समावेश होता. 25,000 दारुच्या बाटल्या या पार्टीसाठी आणल्या गेल्या. 180 प्रशिक्षीत वेटरही पॅरीसहून आले. त्यातच राजधानी तेहरानमध्ये हॉटेल्सची संख्या कमी होती. (International News)
यामुळे, वाळवंटात तंबूंचे एक तात्पुरते शहर उभारण्यात आले. हे सर्व तंबू राजवाड्यासारखे होते. येथे रस्ते बांधण्यात आले. हे शहर जिथे होतं, तिथे वाळवंट असल्यानं पाहुण्यांना हिरवाई दिसण्यासाठी झाडं आणि 50,000 पक्षीही आणले गेले. अर्थात उष्णतेमुळे यातील बहुतांशी झाडं मरुन गेली, आणि पक्षीही मेले. या सर्वांसाठी 40 ट्रक आणि 100 विमानं तैनात ठेवण्यात आली होती. सर्व वाहतूक या विमानांमार्फतच करण्यात आली. पाहुण्यांनाही विमानानं आणलं गेलं. या पार्टीसाठी लागणारी सर्व कटलरी पॅरीसहून अशाच लष्करी विमानांतून आणण्यात आली. या शाही पार्टीनं अवघ्या जगाला इराणच्या राजघराण्याचं वैभव बघता आलं. जगभर याच पार्टीची चर्चा पुढचे काही महिने चालू राहिली. मात्र इराणची सत्तास्थाने या पार्टीनं बदलून गेली. पार्टीच्या वैभवानं इराणमधील जनतेमुळे असंतोष वाढला. शाहला आपल्या समस्यांची जाणीव नाही, ही भावना जनतेमध्ये वाढीस लागली. इराणच्या लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. अयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये क्रांती झाली. जनतेने शाह यांना सत्तेवरून आणि देशातूनही बाहेर काढले. यानंतर इराणमध्ये खामेनींची सत्ता आली. त्यांनी देशाला इस्लामिक प्रजासत्ताक घोषित केले. (Iran)
===========
हे देखील वाचा : 1941 And 2025 : बापरे…1941 या वर्षाची तुलना का होत आहे !
===========
आता इराणचे माजी शाह मोहम्मद रेझा पहलवी यांचे पुत्र रेझा पहलवी यांना इराणमधील सध्याच्या अस्थिरतेमुळे पुन्हा इराणमध्ये सत्तेत येण्याची आशा वाटू लागली आहे. 1967 मध्ये रेझा पहलवी यांना अधिकृतपणे क्राउन प्रिन्स म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 1978 मध्ये, वयाच्या 17 व्या वर्षी, ते इराणच्या बाहेर गेले आहेत, तेव्हापासून ते अमेरिकेत निर्वासीत म्हणून रहात आहेत. रेझा पहलवी यांना नूर पहलवी, इमान पहलवी आणि फराह पहलवी या तीन मुली आहेत. या तिनही मुली उच्चशिक्षित आहेत. इराणच्या पहनवी राजघराण्याच्या वारसदार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics