1953 साल होतं. अमेरिकेत एक माणूस, ह्यूग हेफनर, आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडत होता. त्याने कसंबसं 8000 डॉलर जमवले आणि आपल्या किचन टेबलवर बसून एक मॅगझिन तयार केलं. या मॅगझिनच्या कव्हरवर होती हॉलीवुडची सुपरस्टार मर्लिन मुनरो, जी त्या काळात सगळ्यांनाचं वेड लावलं होतं, पण या मॅगझिनने लोकांना आणखी वेड लावलं मॅगझिनचं नाव होतं ‘प्लेबॉय’. आणि त्याची टॅगलाइन? ‘एंटरटेनमेंट फॉर मेन’. बस, ही मॅगझिन मार्केटमध्ये आली आणि धमाका झाला! अवघ्या काही दिवसांत या मॅगझिनचा इतका गाजावाजा झाला की त्याच्या 50,000 कॉपीज विकल्या गेल्या. कारण काय तर लोकांच्या हातात ही मॅगझिन होती आणि त्यात मर्लिन मुनरो हीचे न्यूड फोटोस. पण ही फक्त सुरुवात होती. ह्यूग हेफनर यांच्या मॅगझिनने एका नव्या इंडस्ट्रीला जन्म दिला – ती इंडस्ट्री म्हणजे Porn Industry आणि हा बिझनेस पुढे जाऊन बनला 60 बिलियन डॉलरचा म्हणजेच चार लाख कोटींचं साम्राज्य. या Porn Industry बद्दलच जाणून घेऊ. (Porn Industry)
1953 मध्ये ह्यूग हेफनरने एक मॅगझिन बनवलं, जी जगातली पहिली adult मॅगझिन होती. या मॅगझिनच्या कॉपीज विकून, त्यातल्या जाहिरातींमधून पैसे कमवले जायचे. पण 1980 च्या दशकात टेक्नॉलॉजीने या इंडस्ट्रीला नवं वळण दिलं. कारण तेव्हा आलं होतं वीएचएस टेप. आता अडल्ट कॉन्टेंट फक्त मॅगझिनमधून नाही, तर व्हिडिओ कॅसेटमधूनही लोकांच्या घरी पोहोचू लागला. लोकांना आता अडल्ट कॉन्टेंट पाहण्यासाठी थिएटरमध्ये लपतछपत जायची गरज नव्हती. आपल्या घरात, टीव्हीवर, बंद दाराआड हे कॉन्टेंट बघता येऊ लागलं. (Top Stories)

मग 1990 च्या दशकात आलं इंटरनेट. आणि इंटरनेटने तर सगळा गेमच बदलला. आता अडल्ट कॉन्टेंट एका क्लिकवर उपलब्ध झालं. सुरुवातीला या वेबसाइट्स सब्सक्रिप्शन बेस्ड होत्या. म्हणजे, पैसे भर, सब्सक्रिप्शन घे आणि मग जितकं पाहिजे तितकं बघ. नेटफ्लिक्ससारखं. पण यात एक ट्विस्ट होता. या वेबसाइट्सवर थोडं कॉन्टेंट फ्रीही असायचं, मूवीच्या ट्रेलरसारखं . हे फ्री कॉन्टेंट पाहून लोकांना पूर्ण व्हिडिओ पाहायची लालसा व्हायची आणि मग ते सब्सक्रिप्शन घ्यायचे. पण याच फ्री कॉन्टेंटमुळे पुढे या इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला.
2005 साली युट्यूब आलं आणि त्याच्यासोबत आल्या ट्यूब साइट्स. या साइट्सवर कोणीही येऊन व्हिडिओ अपलोड करू शकत होतं. आणि मग काय, लोकांनी पायरेटेड अडल्ट कॉन्टेंट या साइट्सवर टाकायला सुरुवात केली. जे कॉन्टेंट आधी सब्सक्रिप्शन घेऊनच मिळायचं, ते आता फ्रीमध्ये उपलब्ध झालं. यामुळे ओरिजिनल कॉन्टेंट बनवणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसला. या पायरेसीमुळे या इंडस्ट्रीला दरवर्षी 2 बिलियन डॉलरचं नुकसान होतं. पण याच ट्यूब साइट्सनी या इंडस्ट्रीला पैसे कमवायचं नवं मॉडेल शिकवलं – ते म्हणजे ads.(Porn Industry)
आता इथे एक कंपनी समोर आली – MindGeek. ही कंपनी अडल्ट इंडस्ट्रीचा युट्यूब म्हणून ओळखली जाते. MindGeek ने फ्री ट्यूब साइट्स आणि सब्सक्रिप्शन बेस्ड साइट्स दोन्ही आपल्या ताब्यात घेतल्या. म्हणजे बऱ्याच मोठं मोठ्या sides आणि प्रोडक्शन हाऊसेस विकत घेतले. आता तुम्ही फ्री कॉन्टेंट बघायला गेलात किंवा सब्सक्रिप्शन घेतलतं, या दोन्ही वेळी तुम्ही MindGeek चाच revenue वाढवत आहात.
पण हा बिझनेस इतके कोट्यवधी रुपये कसे कमावतो? याचं उत्तर आहे – ads आणि सब्सक्रिप्शन. ट्यूब साइट्सवर तुम्ही फ्री कॉन्टेंट बघायला जाता, पण तिथे तुमच्यावर ads चा मारा होतो. या ads तुम्हाला प्रीमियम साइट्सकडे, सेक्स टॉईजकडे किंवा इतर सर्व्हिसेसकडे घेऊन जातात. उदाहरणच द्यायचं तर, जगातली 12व्या क्रमांकाची वेबसाइट जी आहे ती एक adult कंटेंट website आहे , जी Amazon पेक्षाही पुढे आहे. आणि ही साइट एकटीच वर्षाला 450 मिलियन डॉलर कमावते, म्हणजे जवळपास 4000 कोटी रुपये.(Top Stories)
===============
हे देखील वाचा : Preity Zinta : पंजाब किंग्जची सहमालकीण असलेल्या प्रीती झिंटाकडे आहे, तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती
===============
या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या लोकांचं काय? अडल्ट कॉन्टेंट स्टार्सची कमाई त्यांच्या पॉप्युलॅरिटी, वय आणि सीनवर अवलंबून असते. म्हणजे एखाद्या popular अॅक्ट्रेसला एका सीनसाठी लाखों रुपये मिळतात. पण नवख्या कलाकारांना यापेक्षा कमी मिळतात. टॉप actresses वर्षाला 3 कोटींपर्यंत कमावते, तर टॉप actors 85 लाखांपर्यंत कमवतात.(Porn Industry)
ह्यूग हेफनरच्या किचन टेबलपासून सुरू झालेला हा बिझनेस आज इंटरनेटवर साम्राज्य गाजवतेय. पण या इंडस्ट्रीचा वाईट परिणाम काय आहे? तर पॉर्न पाहणं हे हेरॉईनसारख्या ड्रग्सच्या व्यसनासारखं आहे, पॉर्न पाहण्याचं व्यसन लागलं की, ते सोडायला खूप त्रास होतो. यामुळे पाहणाऱ्याला नेहमी आणखी आक्रमक आणि नवीन कॉन्टेंट पाहण्याची गरज वाटते. त्याशिवाय खऱ्या आयुष्यात आपल्या पार्टनरसोबत येणारा लैंगिक अनुभव कमी आकर्षक वाटू शकतो. त्यामुळे industryचा revenue दिवसंदिवस वाढत जरी असला तरी ते थोड्याप्रमाणात का असेना पण घातक आहे.
