मराठी सिनेसृष्टीला विनोदाचे किंग अशी ओळख असलेले हास्यसम्राट अशोक सराफ सर्वच प्रेक्षकांचे दैवत आहे. अशोक सराफ यांचा सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन हे सर्वश्रुत होते. अनेक दशकं अशोक मामांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांनी हाती घेतलेला प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा कायमच पूर्ण केला. अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांचा भारत सरकारने पद्मश्री हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला. (Ashok Saraf)
२७ मे रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात संपन्न झालेल्या सोहळ्यात अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे संपूर्ण महाराष्ट्राला अत्युच्च आनंद झाला. मामांचा एवढा मोठा सन्मान झाल्यामुळे सर्वच मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर अशोक मामा यांनी एका मुलाखतीमध्ये या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करत आपल्या जवळच्या आणि खास मित्राबद्दल देखील खास भावना व्यक्त केल्या आहेत. (marathi News )
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे किती जवळचे मित्र होते हे तर सर्वांनाच माहित आहे. अशोक आणि लक्ष्या ही जोडी तर मराठी चित्रपटांमध्ये हिट होती. या जोडीचा सिनेमा म्हणजे सुपरहिटच हे समीकरण होते. मात्र लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर ही जोडी तुटली. पण असे असले तरी प्रत्येक वेळी अशोक सराफ नेहमीच या स्पेशल मित्राची आठवण काढत असतात. त्यांचे किस्से, आठवणी देखील शेअर करत असतात. अशोक सराफ यांना एवढ्या मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर मामांनी आपल्या आवडत्या मित्राची आठवण नाही काढली तरच नवल. (Celebrity News)
पद्मश्री मिळाल्यानंतर अशोक सराफ यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या या मित्राबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांना विचारण्यात आलं होतं की, ‘पद्मश्री मिळाला तो क्षण तुमच्यासाठी खास होता. या क्षणी तुम्हाला तुमचे जवळचे मित्र असलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांची किती आठवण येते?’ यावर उत्तर देताना अशोक सराफ भावूक होतं म्हणाले की, “मला त्याची खूप आठवण येते. आम्ही दोघांनी मिळून मराठीमध्ये तब्बल ५० चित्रपट केले. त्यातील अर्ध्याहून जास्त सिनेमे सुपरहिट झाले आहेत. आजही प्रेक्षक या सिनेमांचे चाहते आहेत. आमची जोडी चांगलीच जमली होती. (Marathi Top News)
माझं जे टायमिंग होतं, तेच त्याचं होतं. तो मला तसा फार ज्युनियर होता. आमच्या दोघांचं टायमिंग एकत्र जुळायचं आणि त्यामुळे प्रेक्षकांना ते पाहायला खूप आवडायचं. ते नंतर राहिलं नाही, आमची जोडी होती. मराठी चित्रपटसृष्टीचा जेव्हा पडता काळ होता तेव्हा आम्ही दोघांनी लोकांना चित्रपटगृहापर्यंत येण्यास भाग पाडलं होतं.” (Marathi Top HEadline)
पद्मश्री पुरस्काराबद्दल विचारताच अशोक सराफ म्हणाले, “एकंदर माझा आतापर्यंतचा जो प्रवास आहे आणि मी करिअरसाठी जे काही समर्पित केलं होतं त्यावर हा पुरस्कार म्हणजे एक शिक्कामोर्तब आहे. याचा मला फार आनंद झाला. लोकांनी त्याचं कौतुक करावं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.”