Home » Dowry Act : हुंडाबंदी कायदा आणि ह्या कायद्याच्या तरतुदी

Dowry Act : हुंडाबंदी कायदा आणि ह्या कायद्याच्या तरतुदी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dowry Act
Share

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या खूपच चर्चेत आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना १६ मे रोजी घडली. तिने ही आत्महत्या केवळ सासरच्या मानसिक आणि हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून केल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ माजली आहे. एवढेच नाही तर वैष्णवीच्या शवविच्छेदन रिपोर्टमध्ये देखील तिच्या अंगावर अनेक जखमा असल्याचे समोर आले, त्यामुळे या घटनेमागे हुंडाबळी आणि कौटुंबिक छळ असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Dowry Act)

या घटनेनंतर पुन्हा एकदा हुंडाबळीचा मुद्दा समोर आले आहे. हुंड्याविरोधात सरकारकडून, सामाजिक संस्थांकडून, इतरही अनेक गोष्टींमधून सतत जनजागृती केली जात आहे. मात्र तरीही या आधुनिक काळात हुंड्यासाठी महिलांचा होणारा छळ दुःखद आहे. एकीकडे देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना अशा घटना संपूर्ण देशाला, समाजाला विचार करण्यास भाग पडतात, की खरंच आपण २१ व्या शतकात आहोत? (Marathi News)

आजच्या काळात मुली देखील भरपूर शिकून स्वतःच्या पायावर भक्कम उभ्या आहेत. अशावेळेस जेव्हा पहिल्यांदा महिला या त्रासाला सामोरे जातात, तेव्हाच त्यांनी ऍक्शन घेणे आवश्यक आहे. सहन करणे हा या छळाला किंवा प्रश्नाला उत्तर नाही. जर महिलांनी या विरोधात आवाज उठवला तर नक्कीच या गोष्टी कमी होण्यास मदत होईल. आपल्या देशात असलेल्या हुंडाविरोधी कायद्याबद्दल आजही महिला अनभिज्ञ आहेत. सरकारने आपल्या संविधानाने महिलांना अनेक अधिकार दिले आहेत. ते जाणून घेऊन गरज पडल्यास त्याचा वापर करणे नक्कीच आपले कर्तव्य आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आपण या लेखातून हुंडाबंदी या कायद्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. (Marathi Trending News)

Dowry Act

भारतीय दंड संहितेचे कलम 498 A हे हुंडाबळीशी संबंधित कलम आहे. हुंडा घेणे आणि देणे या दोन्ही गोष्टी गुन्ह्याच्या अंतर्गत येतात. जेव्हा पती आणि त्याच्या नातेवाईकांकडून मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तूंची बेकायदेशीर मागणी केली जाते तेव्हा त्याला हुंडा म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, हुंडा म्हणजे लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट अथवा अप्रत्यक्ष वस्तू देणे किंवा देण्याचे कबूल करणे. हुंड्यामध्ये स्थावर, जंगम मालमत्ता, पैसे, दागिने, करार, जमीन, सोनं यापैकी कुठल्याही स्वरूपाची देवाण-घेवाण केली जाऊ शकते. (Marathi Latest NEws)

१९६१ मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. हुंडाबंदीबाबत १० कलमं आहेत. ४९८ अ अंतर्गत हुंड्यासंबंधी सर्व प्रकरणांवर या कायद्यानुसार कारवाई केली जाते. कमीत कमी ५ वर्षं तुरुंगवास होतो. तर कमीत कमी १५ हजार रुपयांचा दंड किंवा हुंड्याच्या रक्कमेइतकी रक्कम घेतली जाते. यांपैकी जी रक्कम जास्त असेल तीच रक्कम दंडाची शिक्षा म्हणून घेतली जाते. तसेच, कलम ४०६ अन्वये मुलीचा पती किंवा सासरच्यांनी तिचे स्त्रीधन तिला देण्यास नकार दिल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. (Top Stories)

======
======

हुंडाबळी म्हणजे काय?
कलम ३०४-B अंतर्गत होणाऱ्या गुन्ह्याला हुंडाबळी असे म्हटले जाते. १९८६ मध्ये भारतीय दंड संहिता १८६० मध्ये जोडण्यात आलेल्या या तरतुदीनुसार, ज्या वेळी एखाद्या विवाहित स्त्रीचा मृत्यू विवाहापासून ७ वर्षांच्या आत झाला असेल आणि अशा मृत्यूचा रास्त संशय असेल तर कार्यकारी दंडाधिकार्‍यांकडून मृत्यूची चौकशी आणि शव परिक्षेची तरतूद करण्यात येत आहे. एखाद्या स्त्रीने विवाह झाल्यापासून सात वर्षांच्या आत आत्महत्या केली असेल आणि तिच्या पतीने/नातेवाईकाने क्रूरपणे वागविले असे सिध्द केले असेल तर तिला आत्महत्येस प्रवृत केले असे गृहित धरता येईल. हुंडासंबंधित खटले कधीही दाखल केले जाऊ शकतात, त्यासाठी कोणतीही ठराविक मुदत दिलेली नाही. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.