Hair Care Tips : केस गळतीची समस्या काही कारणांपासून सुरू होऊ शकते. पाण्यामध्ये बदल, केसांसाठी चुकीच्या प्रोडक्ट्सचा वापर, पोषण तत्त्वांची कमतरता अथवा केसांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्याने केस गळतीची समस्या उद्भवू शकते. केस कमी प्रमाणात गळणे सामान्य बाब असून अत्याधिक प्रमाणात गळत असल्यास ही एक गंभीर समस्या आहे. केस गळतीवर वेळीच उपचार केल्यास लांबसडक केस होण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया केसांसाठी कोणत्या प्रकारच्या तेलांचा वापर करावा याबद्दल सविस्तर…
1 नारळाचे तेल
नारळाच तेल हे आयुर्वेदीक आणि पारंपरिक आहे औषध शास्त्रामध्ये याला खूप महत्वाचे मानले जाते. हे तेल केसांना खोलवर पोषण देते. केसांची मूळ हाइड्रेट राहण्यासह फंगल आणि बॅक्टेरिया पासून संरक्षण होते. नारळाचे तेल तुम्ही रात्री झोपण्या पूर्वी लाऊ शकता.
२ बदामाचं तेल
बदामाचं तेल हे आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी अत्यंत लाभदायक मानलं जात. यामध्ये व्हिटमिन इ, फॅटी अॅसिड, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. कोरड्या केसांच्या मूळांसाठी बदामाचे तेल फायदेशीर मानले जाते.
३ भृंगराज तेल
पारंपरिक आयुर्वेदात केशरज म्हणून ओळखल जाणार भृंगराज तेल आजच्या काळातही केसांच्या अनेक समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून वापरले जाते. केसांची वाढ होणे, अकाली केस पांढरे होणे, केस गळती अशा काही केसांसंबंधित समस्यांवर हे तेल अत्यंत लाभदायक मानाल जाते. भृंगराज तेलामुळे डोक्याच्या त्वचेमधील रक्ताभिसारणात वाढ होते, ज्यामुळे केसांची वाढ अधिक वेगाने होते.
४ एरंडीचे तेल
एरंडीच्या तेलात रिकिनोलेक नावाचे एक विशेष घटक असते, जे केसांच्या वाढीसाठी आणि टाळुच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. हे तेल केसांच्या मुळापर्यंत पोहचून कोरडेपणा, कोंड्याची समस्या आणि केसगळतीची समस्या कमी होऊ शकते.
५ ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल हे केसांच्या काळजीसाठी एक प्रभावी नैसर्गिक पर्याय मानला जातो. संशोधनाच्या आधारे असे समोर आले आहे की, ऑलिव ऑइलमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटमिन इ आणि ओमेगा -३ फॅटी अॅसिडस असतात, जे केसांना पोषण देतात आणि केसांच्या मूळांना मजबूती मिळते. तज्ञांच्या मते ह्या तेलाचा नियमित वापर केल्यास केसांची चमक वाढवते.
केसांना मसाज कधी आणि कसा करावा?
सध्या केसांच्या नैसर्गिक देखभालीसाठी चंपी अर्थात केसांची तेलाने मालिश पुन्हा एखादा लोकप्रिय ठरत आहे.
* कधी करावी?
केसांना मसाज करण्यासााठी सर्वोत्तम वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी, त्यामुळे तेल केसांमध्ये चांगलं शोषून घेतलं जातं आणि सकाळी शॅम्पू केल्यावर केस मऊ आणि चमकदार वाटतात. आठवड्यातून १-२ वेळ चंपी करणे पुरेसे आहे.(Hair Care Tips)
================================================================================================
हेही वाचा :
शरीराला व्हिटॅमिन P महत्वाचे, या गोष्टींनी पूर्ण करा पोषण तत्त्वाची कमतरता
वजन कमी करण्यासाठी डब्रो डाएट म्हणजे काय?
=================================================================================================
* कशी करावी?
थोडं तेल गरम करून बोटांच्या टोकांनी टाळूवर लक्ष केंद्रित करुन मुळांपर्यंत तेल जाण गरजेचं आहे. केसांच्या टोकांवरही थोडं तेल लावल्यास ते तुटण्यापासून वाचतात.
* किती वेळ करावी?
10 ते 15 मिनिटे हलक्या हाताने चंपी करावी, यानंतर तेल कमीत कमी १ तास तरी केसांमध्ये ठेवावं. वेळ असल्यास रात्रभर ठेवावं ते अधिक फायदेशीर ठरत. नियमित चंपी केल्यास केस मजबूत, मऊ आणि आरोग्यद्यायी रहातात.