Home » Tea : भारतीयांसाठी अमृततुल्य असलेल्या चहाची गोष्ट

Tea : भारतीयांसाठी अमृततुल्य असलेल्या चहाची गोष्ट

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tea
Share

आपल्या भारतीय लोकांना सकाळी उठल्यावर सर्वात आधी लागतो तो चहा. चहाशिवाय आपल्या लोकांचा दिवसच सुरु होत नाही. चहा म्हणजे भारतीय लोकांसाठी अमृतच आहे. ऊन, पाऊस, थंडी ऋतू कोणताही असो चहा पिणे कधीही बदलत नाही. कधी कधी लोकांची चहाबद्दलची आवड पाहून वाटते या चहाचा अविष्कार जणू भारतीयांसाठीच झाला आहे. जर चहा नसता तर आपल्या लोकांचे काय झाले असे देव जाणे. शरीरात तरतरी आणणारा हा चहा लहानांपासून मोठ्यांपर्यत सगळ्यांच्याच आवडीचे पेय आहे. आज ह्याच चहाच दिवस आहे. अर्थात आज २१ मे रोजी जागतिक चहा दिवस साजरा होत आहे. (Tea)

चहाचा इतिहास
सांगितले जाते की, २७०० इसवी सन पूर्व चीनचा शासक नुंग हा त्याच्या बागेत बसून पाणी पित होता. तेव्हा अचानक त्याच्या पाण्यात पान पडलं आणि त्यानंतर त्याच्या पाण्याचा रंग बदलला. नुंगने जेव्हा त्या पाण्याची चव घेतील तेव्हा त्याला ती खूप आवडली. त्यानंतर त्याने त्या पानाचे झाड शोधले आणि तेव्हापासून चहाचा शोध लागला असं म्हटलं जातं. (Marathi News)

आज जरी चहा भारतीयांच्या अंगात भिनलेला असला तरी चहा हे मूळचे भारतीय पेय नाही. असं म्हटलं जातं की भारतात चहाचा शोध एका बौद्ध भिक्षूंनी लावला. सहाव्या शतकात एक भारतीय बौद्ध भिक्षू चीनच्या हुनान प्रांतात न झोपता ध्यान करायचे. ते ध्यान करताना जागृत राहण्यासाठी एक वनस्पती चघळायचे. ही वनस्पती नंतर चहाची वनस्पती म्हणून ओळखली जाऊ लागली. (Marathi Top News)

Tea

भारतात चहा सोळाव्या शतकात ब्रिटीशांनी आणला. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात चहाच्या उत्पादनाची सुरुवात केली. ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये पहिली चहाची बाग सुरु केली आणि त्यानंतर भारतात चहाचा व्यापार वाढत गेला. भारतात दार्जिलिंग, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रामुख्याने चहाची लागवड केली जाते. तसेच भारतीय चहाला जगभरातून मागणी आहे. चहा उत्पादनामध्ये आणि त्याच्या सेवनामध्ये भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. एका आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी ८,३७,००० टन चहा सेवन केला जातो. (Marathi Latest News)

आंतरराष्ट्रीय चहा दिन २१ मे रोजी साजरा करण्याचे कारण म्हणजे मे महिना हा चहा उत्पादनासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो, कारण या काळात बहुतांश चहा उत्पादक देशांमध्ये चहाचा हंगाम सुरू होतो. भारताच्या प्रस्तावावरून संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) २१ डिसेंबर २०१९ रोजी २१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून घोषित केला. यापूर्वी काही देश १५ डिसेंबर रोजी चहा दिन साजरा करत होते, परंतु मे महिन्यातील हवामान आणि चहाच्या लागवडीसाठी अनुकूल परिस्थितीमुळे हा दिवस २१ मे रोजी निश्चित करण्यात आला. चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. (Social News)

========
========

२००५ पासून भारत, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनेशिया, बांगलादेश, केनिया, मलावी, मलेशिया, युगांडा आणि टांझानिया यासारख्या चहा उत्पादक देशांमध्ये १५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो. चहा हा जगभरातील अनेक संस्कृतींचा अविभाज्य भाग आहे. हा दिवस चहाच्या सांस्कृतिक वारशाला आणि आर्थिक योगदानाला अधोरेखित करतो. भारत, चीन, श्रीलंका, आणि केनिया यासारख्या देशांमध्ये चहा उद्योग हा ग्रामीण भागातील भूक आणि गरिबीविरुद्ध लढण्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण तो लाखो लोकांना रोजगार पुरवतो. काही चहा उत्पादक देश १५ डिसेंबर रोजी जागतिक चहा दिवस साजरा करतात. हा दिवस चहा उत्पादकांना योग्य किंमत मिळवून देण्यावर आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करतो. (Marathi Trending News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.