Home » Miyazaki Mango : जगातला महाग आंबा होतोय बिहारमध्ये !

Miyazaki Mango : जगातला महाग आंबा होतोय बिहारमध्ये !

by Team Gajawaja
0 comment
Miyazaki Mango
Share

पिवळा धम्मक आंबा बघितल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. पण हाच आंबा लाल रंगात दिसला तर. अशा लाल रंगाचा आंबा जपानमध्ये तयार होतो. त्याला मियाझाकी आंबा म्हणतात. जपानच्या ग्रामीण भागात या आंब्याला सूर्याचे अंडे म्हटले जाते. हा लाल आंबा जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून ओळखला जातो. त्याची चव ही सर्वोत्तम समजली जाते. मियाझाकी आंब्यांचा रंग गडद लाल किंवा जांभळा असतो. या आंब्याची चव मधासारखी असते. हा मियाझाकी आंबा औषधी मानला जातो. (Miyazaki Mango)

कारण त्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. या आंब्यामध्ये असलेल्या उच्च प्रोटीनमुळे त्याची किंमत प्रति किलो 2 ते 3 लाखांपर्यंतही जाते. आंब्याचा गडद लाल रंग आणि त्याचा आकार यानुसार ही किंमत बदलते. एवढा महाग खरेदी करणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. मुळात या आंब्याची लागवडी जपानमध्ये फार कमी होते. त्यामुळे त्याची किंमत तिथे कायम लाखात असते. पण हाच महागडा आंबा आता भारतातही उपलब्ध आहे. जपानमधून मियाझाकी आंबा आयात केलेला नाही, तर चक्क तो भारताच्या मातीमध्ये तयार झालेला आहे. भारताच्या बिहार राज्यात सध्या या मियाझाकी आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. प्रायोगिक तत्वावर येथे काही वर्षापूर्वी मियाझाकी आंब्याची काही कलम लावण्यात आली होती. (Marathi News)

हा प्रयोग यशस्वी झाल्यावर आता जगातला सर्वात महाग मियाझाकी आंबा बिहारमध्ये तयार होऊ लागला आहे. बिहारमधील मसौरी येथील आंबा प्रसिद्धीच्या झोकात आला आहे. जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून ओळखला जाणारा मियाझाकी आंबा मसौरी येथे तयार होत आहे. वास्तविक बिहारचा मुळ आंबा म्हणून लंगडा आणि मालदा आंबे ओळखले जातात. सोबतच बिहारमध्ये जर्दालू, चौंसा, पांढरा, गुलाबखास, फजली सारखे आंबेही तयार होतात. मात्र यासोबतच बिहारच्या आंबे उत्पादकांनी जगातील सर्वात महागड्या आंब्याची लागवड येथे केली आहे. मियाझाकी नावाचा हा आंबाही आता येथील मसौरीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून लाखो रुपयांना विकल्या जाणा-या या आंब्याला परदेशातून मोठी मागणी आली आहे. बिहारची राजधानी पाटणा जिल्ह्यातील मसौरी ब्लॉकमधील कोरियावान गावात हा लाल रंगाचा मियाझाकी आंबा तयार झाला आहे. विशेष म्हणजे जपानमध्ये जशी मियाझाकी आंब्याची चव आहे, तशीच चव या मसौरीमधील मियाझाकी आंब्याची आहे. (Miyazaki Mango)

मियाझाकी आंब्याची गुणवत्ता आणि त्याची वाढती मागणी पहात बेंगळुरु येथील नर्सरीमध्ये या आंब्याची कलमे तयार कऱण्यात आली आहेत. या कलमाची बिहारमधील आंबा बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यांची लावगड कऱण्यासाठी जेवढी काळजी घेण्यात आली, त्यापेक्षा अधिक काळजी आता या फळ लागलेल्या मियाझाकी आंब्याच्या झाडाची घेण्यात येत आहे. या आंब्यासाठी शेड आवश्यक ठरते. कारण तीव्र उन्हाळा असेल तर या आंब्याचे फळ तग धरु शकत नाही. शिवाय पाऊसचा माराही या आंब्याचे फळ सहन करु शकत नाही. त्यामुळे हा आंबा जिथे लावला जातो, तिथे त्याच्याभोवती शेड उभारावी लागते. आणि मध्य उष्ण वातावरण त्याभोवती ठेवावे लागते. अन्यथा या आंब्याचा रंग बदलतो, आणि त्याच्या चवीमध्येही फरक येतो. त्यावरुनच या आंब्याला लाखाचा भाव मिळतो, या एवढ्या किंमतीमुळे आंब्याच्या रक्षणासाठी स्वतंत्र सुरक्षा रक्षक ठेवण्यात आला आहे. (Marathi News)

=======

हे देखील वाचा :  Uttar Pradesh : चला देशातल्या पहिल्या विस्टाडोम ट्रेनच्या प्रवासाला

Langada Mango : लंगडा चालला युरोपला !

=======

शिवाय या आंब्याच्या बागेमध्ये जागोजागी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मसौरीसोबत नालंदा मधील बागायतदारांनीही या महागड्या आंब्याला बिहारच्या मातीमध्ये रुजवले आहे. सध्या बिहारमध्ये जो मियाझाकी आंबा तयार होत आहे, त्याचे वजन 250 ग्रॅम प्रति फळ आहे. त्यामुळे एका किलोमध्ये तीन किंवा चार फळे बसत आहेत. याचीच किंमत लाख रुपये मिळत आहे. त्यामुळेच आता बिहारमधील अन्य आंबा बागायतदारांनीही मियाझाकी आंब्याची कलमे लावण्याची तयारी सुरु केली आहे. भारतामध्ये बिहारपाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही मियाझाकी आंबा लावण्यात येत आहे. यासाठी काही शेतक-यांनी थेट जपानमधून मियाझाकी आंब्याची कलमे आयात केली आहेत. (Miyazaki Mango)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.