हिंदू धर्मामध्ये तीर्थयात्रेला मोठे महत्व आहे. विविध देवस्थळांना जाऊन देवाचे दर्शन घेण्याला तीर्थयात्रा म्हटले जाते. भारतात अनेक अशी तीर्थक्षेत्रं आहेत, ज्यांचे महात्म्य, नावलौकिक खूप मोठा आहे. प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी या तीर्थक्षेत्री जाऊन देवाचे दर्शन घेतलेच पाहिजे असे सांगितले जाते. यात चारधाम यात्रा, १२ ज्योतिर्लिंग यात्रा, अष्टविनायक यात्रा, शक्तीपीठ यात्रा, विविध देवस्थानांच्या यात्रा यांचा समावेश होती. यातलीच एक अतिशय पवित्र आणि महत्वाची यात्रा म्हणजे कैलास मानसरोवर यात्रा. (Kailas Parvat)
कैलास मानसरोवर यात्रेला अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. भगवान शिव शंकराचे स्थान मानल्या जाणाऱ्या कैलास पर्वताचे दर्शन आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या मानसरोवराचे दर्शन घेणे म्हणजे जणू मनुष्य जन्माचे सार्थक करणेच. हिंदू धर्मातील महत्वाची देवता म्हणजे महादेव. सृष्टीचा संहार करणारे भगवान शंकर म्हणजे सगळ्याच हिंदू लोकांचे आराध्य दैवत आहे. याच शिव शंभोचे वास असलेल्या कैलास पर्वताचे दर्शन घेणे म्हणजे प्रत्यक्षात शिवाचे दर्शन घेण्यासारखेच आहे. आपल्या पुराणांमध्ये, धार्मिक ग्रंथांमध्ये कैलास पर्वताचे महत्व विशद करण्यात आले आहे. (Marathi News)
अशा या कैलास पर्वताचे दर्शन घेण्याची इच्छा अनेकांची असते, मात्र हे वाटते तितके सोपे अजिबातच नाही. कैलास पर्वत हा तिबेटच्या पठारावर, हिमालय पर्वतरांगेत आहे. हा पर्वत तिबेटच्या न्गारी प्रांतामध्ये, चीनच्या हद्दीत आहे. त्यामुळे आपल्याला या पर्वताचे दर्शन घ्यायचे म्हणजे चीनची परवानगी घेणे आवश्यक असते. काही वर्षांपूर्वी चीन आपल्या भारतीय लोकांना यासाठी परवानगी द्यायचा मात्र मधल्या काही काळापासून आपले संबंध बिघडले आणि ही यात्रा बंद झाली. (Marathi Latest News)
सध्या भारत आणि चीनचे संबंध फारच चांगले आहेत असे नाही मात्र तरी या यात्रेला चीनने मान्यता दिली आहे. मागील काही वर्षांपासून कैलास मानसरोवर यात्रा सरकारकडून थांबवण्यात आली होती. पण आता हीच यात्रा पुन्हा सुरु करण्यात येत आहे. भारत सरकारने देखील त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून याबद्दल माहिती दिली आहे. कैलास पर्वत हा हिंदूंसोबतच जैन आणि बौद्ध धर्मासाठी पवित्र मानला जातो, आणि त्याला भगवान शिवाचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे याची देही याची डोळा या पर्वताचे दर्शन घेण्याची संधी भारतीयांना तब्बल ५ वर्षांनी मिळत आहे. येत्या ३० जून पासून ही यात्रा सुरु होत आहे. (Marathi Trending News)
कैलास मानसरोवर यात्रेसाठी यात्रेकरूंचे १५ गट उत्तराखंड आणि सिक्कीम मार्गे कैलास मानसरोवरला जाणार आहेत. पुढे उत्तराखंडहून लिपुलेख खिंड ओलांडून ५०-५० प्रवासी असलेले ५ गटात मानसरोवरला जातील. त्याच वेळी, १० बॅचमध्ये प्रत्येकी ५० प्रवाशांचे गट सिक्कीमहून नाथुला मार्गे प्रवास कारणात आहेत. कैलास मानसरोवर चीनव्याप्त तिबेटमध्ये आहे. दरवर्षी या सहलीचे आयोजन परराष्ट्र मंत्रालयामार्फत केले जाते. मात्र गेल्या पाच वर्षांपासून चीन भारतीयांना कैलास मानसरोवरला जाऊ देत नव्हता. सीमा वाद आणि कोविड या कारणांमुळे ही यात्रा स्थगित केली होती. (Top Stories)
कैलास मानसरोवर मार्गावर प्रवाशांसाठी विश्रांतीगृह बांधले जात आहेत. सिक्कीमहून मानसरोवरला जाणाऱ्या प्रवाशांना दोन ठिकाणी विश्रांतीगृहे असतील. पहिला १६व्या मैलावर म्हणजेच १०,००० फूटवर असेल तर दुसरे विश्रांतीगृह कुपुप रोडवरील हांगू तलावाजवळ १४,००० फूटवर असेल. येथे प्रत्येक केंद्रातील दोन इमारतींमध्ये पाच बेड आणि प्रत्येकी दोन बेडची सुविधा दिली जाणार आहे. (Marathi Top News)
आता ५ वर्षांनंतर प्रवास पुन्हा सुरू होणार आहे. भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याचा हा एक प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या करारानुसार दोन्ही देशांनी डेमचोक आणि डेपसांग येथून आपले सैन्य मागे घेतले होते. कैलास मानसरोवरचा अधिकाधिक भाग तिबेटमध्ये असून, चीन तिबेटवर आपला हक्क सांगत आहे. कैलास पर्वतरांग काश्मीरपासून भूतानपर्यंत पसरलेली आहे. या भागात ल्हा चू आणि झोंग चू नावाच्या दोन ठिकाणांमध्ये एक पर्वत आहे. या पर्वताला येथे दोन जोडलेली शिखरे आहेत. यापैकी उत्तरेकडील शिखर कैलास म्हणून ओळखले जाते. (Marathi Trending News)
या शिखराचा आकार एका विशाल शिवलिंगासारखा आहे. हे ठिकाण उत्तराखंडमधील लिपुलेखपासून फक्त ६५ किलोमीटर अंतरावर आहे. सध्या कैलाश मानसरोवरचा मोठा भाग चीनच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथे जाण्यासाठी चीनची परवानगी आवश्यक आहे. हिंदू धर्मात असे मानले जाते की भगवान शिव त्यांच्या पत्नी पार्वतीसह कैलास पर्वतावर राहतात. म्हणूनच हे हिंदूंसाठी एक अतिशय पवित्र स्थान आहे. जैन धर्मात असे मानले जाते की पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांना येथून मोक्ष मिळाला होता. (Social News)
कैलास पर्वत जेवढा पवित्र आणि महत्वाचा आहे, तितकाच तो रहस्यमयी देखील आहे. या पर्वताची अनेक अशी रहस्ये आहेत, जी आजही अनुत्तरित आहे. जगातील अनेक मोठमोठे शास्त्रज्ञ देखील ही रहस्ये सोडवण्यात असमर्थ आहेत. जसे की, कैलास पर्वताची संरचना कंपासच्या चार बाजूंप्रमाणे असल्याचे सांगितले जाते. जगातील सर्वांत उंच पर्वत असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर आतापर्यंत सुमारे ७ हजारपेक्षा अधिक जणांनी यशस्वी चढाई केली आहे. मात्र, माऊंट एव्हरेस्टपेक्षा २ हजार मीटर कमी उंची असलेला कैलास पर्वत आजपर्यंत कोणीही सर करू शकलेले नाही. (Social Update)
कैलाशमानसरोवराबद्दल देखील एक रहस्य आहेत, कैलास पर्वताच्या बाजूला शुद्ध नैसर्गिक पाण्याचा झरा मानससरोवर आहे. दुसऱ्या बाजूला क्षारांनी भरलेले व मनुष्याच्या पिण्यालायक नसलेल्या पाण्याचा स्त्रोत असून, त्याला राक्षस सरोवर म्हटले जाते. मानससरोवराचा आकार सूर्याप्रमाणे आहे, तर राक्षस सरोवराचा आकार चंद्राप्रमाणे आहे. दोन्ही सरोवरांमधून अगदी एक लहानसा भाग आहे, जो या सरोवरांना वेगळे करतो. रावणाने या ठिकाणी बसून महादेवांची उपासना केली होती आणि वरदान प्राप्त करून घेतले होते. म्हणून क्षारयुक्त सरोवराला राक्षस तळे म्हटले जाते, अशी मान्यता आहे. सिंधू, ब्रम्हपुत्रा व सतलज या महत्त्वाच्या नद्या कैलास पर्वतावर उगम पावतात, असे सांगितले जाते.