Home » Girnar Yatra : श्री गिरनार यात्रा – प्रभू दत्तात्रयांचे अक्षय निवासस्थान

Girnar Yatra : श्री गिरनार यात्रा – प्रभू दत्तात्रयांचे अक्षय निवासस्थान

by Jyotsna Kulkarni
0 comment
Girnar Yatra
Share

आपल्या देशात जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, विविध पंथांना मानणारे अगणित लोकं आहेत. नाथ पंथ, वारकरी पंथ आदी अनेक पंथांबद्दल आपण ऐकले असेल. यातलाच एक पंथ म्हणजे दत्त पंथ किंवा दत्त संप्रदाय. श्री दत्तात्रयांना मानणाऱ्या लोकांना दत्त संप्रदायातील म्हटले जाते. कुरवपूर, पिठापूर, गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, कारंजा आदी ठिकाणं श्री दत्तला समर्पित आहे. या आणि अजून अनेक दत्ताच्या ठिकाणांबद्दल भक्तांमध्ये एक खास स्थान आहे. जमेल तेव्हा आणि खास दिवशी अनेक जणं या ठिकाणांना भेट देऊन सद्गुरू दत्ताचे दर्शन घेतात. मात्र यासोबतच अजून एक श्री दत्तांना समर्पित असणारे अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध ठिकाणं म्हणजे ‘गिरनार’. गिरणार पर्वत हे दत्त भक्तामध्ये सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेले ठिकाण आहे. (Girnar Yatra)

दत्त भक्तांसाठी हे ठिकाणं नवीन नाही. कारण अनेकदा या ठिकाणी जाऊन दत्तप्रभूंचे दर्शन घेतले जाते. गिरनार यात्रा अतिशय प्रसिद्ध आणि मोठ्या तीर्थयात्रांमध्ये गणली जाते. गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर आहे. गुजरात राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात उभा आहे. गिरनार हे शाक्त, दत्त व जैन पंथीयाचे फार पवित्र क्षेत्र आहे. या गिरनार पर्वताच्या सर्वात उंच आणि शेवटच्या टोकाला दारं प्रभूंचे मंदिर आहे. भगवान दत्तात्रेयांनी त्यांच्या प्रत्यक्ष निवासाने या पर्वताला पवित्र आणि पूजनीय केले आहे. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने सुशोभित केलेले आणि बारा हजार वर्षे तपश्चर्या करून सिद्ध केलेला असा हा गिरनार पर्वत. याच पर्वताला रेवताचल पर्वत, रैवत,रेवताचल, कुमुद, उज्जययंत असे म्हणून देखील ओळखले जाते. (Marathi Top News)

Girnar Yatra

सौराष्ट्र म्हणजेच गुजरात मध्ये असलेल्या या पर्वताला पौराणिक कथांमध्ये हिमालय पर्वताइतकेच महत्व आहे. गिरनार हा भारताच्या गुजरात राज्यातील सर्वात उंच पर्वत आहे. या पर्वताचा विस्तार १६ गावांपर्यंत आहे. पर्वतावर जाण्यासाठी दहा हजार पायऱ्या आहेत. गुजरात मधील जुनागड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर हा पर्वत आहे . या ठिकाणी सद्गुरु दत्तात्रेय यांनी गोरक्षनाथ यांना अनुग्रह दिला असल्यामुळे हे स्थान दत्तभक्तामध्ये प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान आहे. या स्थानावर बसून श्री दत्तप्रभूंनी बारा हजार वर्षे कठोर तपश्चर्या केली होती आणि तेथूनच ते अंतर्धान झाले. १०,००० पायऱ्या चढुन जाणे हे शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारे जरी असले तरी दत्तभक्तांनी किंबहुना सगळ्यांनीच इथे एकदा तरी जायलाच पाहिजे असे हे अद्भुत ठिकाण आहे. (Marathi Latest News)

भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच पूर्व इतिहास व परिसर गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे. अशी मान्यता देखील दत्त भक्तामध्ये आहे. दहा बाय बारा अशा चौरस फूट जागेमध्ये दत्तप्रभूंच्या पादुका, एक सुबक मूर्ती आणि आणि थोडी जागा एवढेच येथे असलेल्या मंदिरात आपल्याला पाहायला मिळते. येथून पुढे जाण्यासाठी कुठलाही रस्ता नसल्याने आपण आलो त्याच वाटेने आपणास खाली उतरावे लागते. (Marathi Top News)

या गिरनार पर्वतावर सद्गुरु दत्तात्रेय यांच्या पादुका आजही स्थापित असून येथे नेहमी सद्गुरु दत्तात्रेय यांचा निवास असतो अशी भक्तांमध्ये श्रद्धा आहे. अनेक संत महात्म्यांना श्री गुरुदत्तात्रेय यांनी येथे साक्षात दर्शन दिल्याचे सांगितले जाते. प्रभू राम आणि पाच पांडव यांचेही या पर्वतावर वास्तव्य होते असे पुराणांमध्ये पुरावे आढळतात. तसेच पुराणांमध्ये श्वेताचल, श्वेतगिरी असा उल्लेखही या गिरणार पर्वताचा केलेला आढळतो. अनेक साधुसंतांनी आणि सिद्धयोगी लोकांनी येथील गुहांमध्ये कठोर तपचर्या आणि साधना करत प्रत्यक्ष गुरु दत्तात्रेयांचे दर्शन घेतले आहे. ही भूमी योगी सिद्ध महात्मे यांनी संपन्न असून आजही अनेक महात्मे या ठिकाणी तपश्चर्या करताना आपल्याला पाहायला मिळतात. गिरनार पर्वत हे निसर्गरम्य, वन्यप्राणी, विविध औषधी वनस्पतीने समृद्ध असा परिसर आहे. (Top Trending NEws)

Girnar Yatra

बाबा किनाराम अघोरी, श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, नारायण महाराज, रघुनाथ निरंजन, या संतांना प्रत्यक्ष दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिले आहे. गिरनार पर्वताच्या पायथ्याला भवनात मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथे दरवर्षी शिवरात्रीच्या मेळाव्यात या कुंडाजवळ १० ते १२ लाख लोकांचा जमावडा असतो. या मृगी कुंडाच्या संदर्भात एक आख्यायिका आहे की, स्वयं देवाधिदेव महादेव या कुंडात स्नानासाठी येतात. या परिसरात जुना आखाडा, निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा, असे अनेक आखाडे आहे. इथे श्री शेरनाथबापू संचलित आश्रम बघण्यासारखे आहे. (Social Update)

गिरनार पर्वताला उजव्या बाजूने प्रदक्षिणा करण्याच्या पद्धतीलाच गिरनार परिक्रमा असे म्हणतात. फार पूर्वीपासून या परिक्रमेची प्रथा असून आजही अनेक जण येथे गिरणार परिक्रमा करतात. गिरनार पर्वताच्या आजूबाजूला मोठे जंगल असल्यामुळे येथे फक्त परिक्रमा काळातच पाच दिवस भक्तांना परिक्रमा करण्यास प्रवेश दिला जातो. हा परिक्रमा करण्याचा कालावधी कार्तिकी एकादशी ते त्रिपुरा पोर्णिमा इथपर्यंत पाच दिवस असतो. (Top Stories)

परिक्रमा करत असताना बारा किलोमीटर अंतरावर जिना बाबा की मढी हे भक्तांचे श्रद्धास्थान आहे. तसेच परिक्रमा करत असताना वाटेत अनेक श्रद्धास्थाने आहेत. गिरनार पर्वतावर येणारे सर्व भाविक येथील शक्य होईल तेवढ्या तीर्थक्षेत्रांचा आणि पर्यटन स्थळाचा अनुभव घेतात. ही परिक्रमा पूर्ण करणे प्रत्येकालाच शक्य असते असे नाही. सकाळी ७ ला ही परिक्रमा सुरु केली तर संध्याकाळी ७ पर्यंत पूर्ण होऊ शकते. (MArathi Top Trending News)

=========

हे देखील वाचा : Panchen Lama : 30 वर्ष बेपत्ता आहेत पंचेन लामा !

=========

कमंडलू कुंड तिर्थ आख्यायिका
असे सांगितले जाते की, गिरनारवर श्रीदत्तगुरूंची तपस्या चालू होती. त्यावेळी गिरनारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला. सामान्य जीवांचे प्रचंड हाल होऊ लागले. हा दुष्काळ बरेच दिवस होता. अखेर माता अनुसूयेला हे बघवेना. त्या गिरनारवर श्रीदत्तगुरूंना तपस्येतून जागृत करायला आल्या. दत्तगुरु तपस्येत तल्लीन होते. मातेने त्यांना जागृत करायला प्रारंभ केला आणि दत्तगुरु तपस्येतून जागृत होताना त्यांच्या कमंडलूला धक्का लागला आणि ते कमंडलू खाली पडले. खाली पडल्यावर त्याचे दोन भाग झाले. एक भाग जिथे पडला तिथे गंगा अवतीर्ण झाली तर दुसरा भाग जिथे पडला तिथे अग्नी उत्पन्न झाला. तेव्हापासून दुष्काळ संपुष्टात आला. ते तीर्थ आणि अग्नी अजूनही गिरनारवर उपस्थित आहे. आता तिथे छोटासा छान आश्रम निर्माण झाला आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.