तिबेटमध्ये बौद्ध धर्मातील दुसरे सर्वात मोठे धार्मिक नेते पंचेन लामा यांच्या बेपत्ता होण्याबाबत पुन्हा एकदा आवाज उठू लागला आहे. 11वे पंचेन लामा हे वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून गायब झाले आहेत. त्या घटनेला आता तीस वर्ष होऊन गेली आहेत. चीन सरकारनं 11 वे पंचेन लामा यांना ताब्यात घेतल्याची माहिती येते. मात्र चिननं याबाबत कायम मौन बाळगलं आहे. तिबेटमध्ये दरवर्षी या पंचेन लामांबाबत आंदोलन करण्यात येतं. आता अमेरिकेमध्येही असेच आंदोलन करण्यात आले असून पंचेन लामा यांना चीननं परत द्यावे अशी मागणी त्यांचे पाठिराखे करीत आहेत. तीस वर्षापूर्वी या पंचेन लामा यांना चीन सरकारनं ताब्यात घेतलं. मात्र त्यानंतर या घटनेमध्ये आपला सहभाग असल्याचे चीन सरकारनं नाकारलं. त्यामुळे 11 वे पंचेन लामा हे कुठे गायब झाले, याचे गुढ वाढत चालले आहे. तिबेटी बौद्ध धर्माच्या उत्तराधिकाऱ्यांवरून चीन विरोधात पुन्हा तिबेटी समुदाय एकत्र होत आहे. गेली तीस वर्ष चीनसोबत पंचेन लामा यांच्यासाठी झगडणा-या तिबेटला यावेळी अमेरिकेची साथ लाभली आहे. (Panchen Lama)
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी 11 वे पंचेन लामा गेधुन चोएकी निज्मा यांची चीननं तात्काळ सुटका करावी अशी मागणी केली आहे. शिवाय व्हाईट हाऊसच्या पुढे पंचेन लामा यांचे छायाचित्र असलेले बॅनरही लावण्यात आले आहे. वय वर्ष सहा असलेल्या पंचेन लामांना चीनी गुप्तहेरांनी ताब्यात घेतल्याचा आरोप कायम तिबेटकडून कऱण्यात येतो. आता तीस वर्षानंतर त्यांच्या या आरोपाला अमेरिकेनं साथ दिल्यामुळे तिबेटी नागरिकांच्या आंदोलनाला धार आली आहे. 11 वे पंचेन लामा निजमा यांचा जन्म 25 एप्रिल 1989 रोजी तिबेटमध्ये झाला. सर्वोच्च धार्मिक गुरु दलाई लामा यांनी त्यांना 11 वे पंचेन लामा ही पदवी दिली. दलाई लामा नंतर, पंचेन लामा हे तिबेटी बौद्ध धर्मातील दुसरे सर्वात मोठे धार्मिक नेते मानले जातात. मात्र या सर्वाला चीनचा विरोध आहे. मुळात चिननं दलाई लामा यांनाही सर्वोच्च धार्मिक नेते म्हणून मान्यता द्यायला नकार दिला आहे. (International News)
चिनी नेत्यांना दलाई लामा निवड प्रक्रियेमध्ये प्रवेश हवा होता. मात्र ही सर्व प्रक्रिया अत्यंत गोपनीय आणि धार्मिक असते. तिबेटी गुरुंनी चीनची मागणी फेटाळल्यामुळे संतप्त झालेल्या चीनी अधिका-यांनी चक्क पंचेन लामा यांचेच अपहरण केले. गेली तीस वर्ष पंचेन लामा चीनच्या कैदेत असल्याची माहिती आहे. आत्तापर्यंत असलेले हे सर्वात मोठे मानवधिकार कायद्याचे उल्लंघन असल्याची टिका दलाई लामा यांनी केली. मात्र या सर्वांत चीननं पंचेन लामा यांना आपण कैद केल्याचेच नाकारले आहे. त्यामुळे गेल्या तीस वर्षापासून 11 वे पंचेन लामा कुठे गायब झाले आहेत, हे एक रहस्य राहिले आहे. तिबेटमध्ये मात्र पंचेन लामा हे चीनच्या तावडीत असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी दरवर्षी तिबेटमध्ये आंदोलन छेडण्यात येते. यावेळी हे आंदोलन अमेरिकेमध्येही कऱण्यात आले. या आंदोलनात त्यांना अमेरिकेचे मंत्री रुबियो यांचे सहकार्य लाभले आहे. (Panchen Lama)
यासंदर्भात रुबियो यांनी एक निवेदन जाहीर केले आहे. त्यात 30 वर्षापूर्वी चिनी अधिका-यांनी पंचेन लामा यांचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. चिनी लष्कराच्या अधिका-यांनी 17 मे 1995 रोजी पंचेन लामा आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या आधी तीन दिवस दलाई लामा यांनी पंचेन लामांवर धार्मिक विधी केले होते. त्यानंतर चिडलेल्या चिननं पंचेन लामा आणि त्यांच्या कुटुंबाचे जबरदस्तीनं अपहरण केल्याचे रुबियो यांनी सांगितले आहे. (International News)
=======
हे देखील वाचा : Temple : भारताच्या सीमेवरील ‘ते’ मंदिर ज्याने झेलले आहेत पाकिस्तानचे अनेक हल्ले
Battisa Temple : गोल फिरणा-या शिवलिंगाचे रहस्य !
=======
यासोबत तिबेटच्या केंद्रीय प्रशासनानंही एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात 11 व्या पंचेन लामा निजमा यांच्या प्रकृतीची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रकृतीची माहिती चीननं सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. तिबेटमध्ये दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया ही खूप गुंतागुंतीची आहे. या सर्वात आपला प्रतिनिधी असावा अशी चीन सरकारची मागणी आहे. दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडतांना स्वप्ने आणि शकुनांवर आधारित 10 गोष्टींचा विचार होतो. ही सर्व प्रक्रिया तिबेटच्या धार्मिक नेत्यांच्या देखरेखीखाली होते. यातूनच निवडलेले 11 वे पंचेन लामा गेली तीस वर्ष गायब आहेत. आता त्यांना चीनच्या तावडीतून मुक्त कऱण्याची मोहीम तीव्र झाली आहे. (Panchen Lama)
सई बने