आम्ही नेहमीच आमच्या लेखांच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या देशातील नवनवीन, हटके, जुन्या, विशिष्ट परंपरा असलेल्या मंदिरांबद्दल सांगत असतो. आजवर आपण देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक मंदिरांबद्दल माहिती जाणून घेतली आहे. आज देखील आम्ही तुम्हाला एका नवीन मंदिराबद्दल माहिती देणार आहोत. लाखो मंदिरं असलेल्या भारतामध्ये मंदिरांशी संबंधित विविध परंपरा आणि इतिहास पाहायला मिळतो. आजच्या घडीला प्रत्येक चौकात आपल्याला एक मंदिर पाहायला मिळते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत जे भारताच्या सीमेवर अनेक दशकांपासून भारताचे आणि भक्तांचे रक्षण करत आहे.(Temple)
मागील काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान हा विषय खूपच गाजत आहे. याच भारत-पाकिस्तान सीमेवर हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर आहे तनोट माता मंदिर. तनोट मंदिर एक रहस्यमयी मंदिर असल्याचे सांगितले जाते. या मंदिराशी संबंधित अनेक चमत्काराच्या कथा ऐकिवात आहेत. स्थानिक सामान्य लोकांपासून ते भारतीय सैन्यातील लोकांपर्यंत सर्वांनीच या मंदिराची महती अनुभवली आहे. या मंदिराबद्दल अनेक अशा गोष्टी आहे, ज्याचा उलगडा आजही झालेला नाही. अनेक चमत्कार घडताना लोकांनी इथे पाहिले आहे. (Marathi News)
राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर वसलेले हे तनोट माता मंदिर एक रहस्यमयी मंदिर आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धांदरम्यान पाकिस्तानी सैन्याने या मंदिरावर हजारो बॉम्ब टाकले, परंतु एकही बॉम्बचा परिणाम मंदिरावर झाला नाही. विशेष बाब म्हणजे, मंदिराच्या परिसरात पडलेल्या काही बॉम्बचा स्फोट देखील झाला नसल्याचे सांगितले जाते. या चमत्कारिक गोष्टींमुळे तनोट माता मंदिराची ख्याती सर्वत्र पसरली. (Marathi Latest News)
जैसलमेरपासून १३० किमी दूर भारत-पाक सीमेवर १२०० वर्ष जुने ते तनोट माता मंदिर आहे. या मंदिरात पोहोचण्यासाठी पर्यटकांना वाळवंटातून जावे लागते. जैसलमेर-बाडमेर प्रदेशातील चरण समुदायाची कुलदेवता तनोट माता आहे. आवड माता मंदिर या नावानेही ते ओळखले जाते. अश्विन व चैत्र नवरात्रीला येथे प्रचंड मोठी यात्रा भरते. बलुचिस्तानातील हिंगलाज मातेचेच हे रूप असल्याचे सांगितले जाते. हिंगलाज माता मंदिर हे देवी सतीच्या ५२ शक्तिपीठातील एक स्थान आहे. असे सांगितले जाते की, या मंदिरावर ३००० बॉम्ब टाकण्यात आले. परंतु एकाही बॉम्बचा स्फोट मंदिराला हानी पोहोचवू शकला नाही. यापैकी ४५० बॉम्बचा तर स्फोटच झाला नाही. हे बॉम्ब आजही तनोट माता मंदिरातील संग्रहालयात जतन केलेले आहेत. या मंदिराची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे आहे व तेथे त्यांची चौकी पण आहे. (Trending News)
४ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर लोंगोवालमधून आक्रमण केले. या मंदिरापासूनच जवळ हे स्थान आहे. पाकिस्तानी रणगाडे जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा लोंगोवाल चौकीवर अवघे १२० जवान होते. मात्र देवी मातेच्या आशीर्वादामुळे सीमा सुरक्षा दल आणि भारतीय जवानांनी पाकिस्तानी रणगाडय़ांना पाळता भुई थोडी केली. या पराक्रमानिमित्त तनोट माता मंदिरात एक विजयस्तंभ उभारला गेला आहे. दरवर्षी १६ डिसेंबरला तेथे शहीद जवानांच्या स्मरणार्थ उत्सव साजरा केला जातो. सकाळी ६ ते रात्री ८ वाजताच्या सुमारास मंदिराला भेट देऊ शकता. इथे जायचे असल्यास जैसलमेर आणि जोधपूर विमानतळांवरून तनोट माता मंदिराला भेट देता येते. जैसलमेरहून टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने तनोट माता मंदिरापर्यंत पोहोचता येते. (Marathi TOp News)
=========
हे देखील वाचा : Indian Spy : शत्रूने कापले होते ज्यांचे स्तन अशा भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर नीरा आर्य
=========
असे मानले जाते की माता तनोट ही देवी आवडचे रूप आहे, ज्यांचा जन्म माड प्रदेशात झाला होता. ९ व्या शतकात भाटी राजा तनुरावाने या मंदिराची स्थापना केली. आजही येथील ज्योत दिव्य स्वरूपात तेवत असते, जी युद्धकाळातही विझू दिली गेली नाही. या मंदिराच्या कथा केवळ आस्थेच्याच नव्हे तर भारताच्या लष्करी शक्ती आणि आत्मबळाच्या प्रेरणाही आहेत. तनोट माता मंदिर आजही भारतीय सीमांच्या रक्षणाचे प्रतीक म्हणून अढळ उभे आहे. (Social News)